महाराष्ट्र मतदारांनी मतदार यादीत आपले नाव कसे तपासावे यांची माहिती..
Maharashtra Voter List Check अर्थात , महाराष्ट्रातील मतदार त्यांचे नाव Voter list मधे कसे तपासू शकतात आणि महत्त्वाच्या तारखांसाठी त्यांनी कोठे लक्ष ठेवावे, याची माहिती या ब्लॉग मधे दिली आहे.
महाराष्ट्रामध्ये सध्या स्पेशल इंटेंसिव्ह रिव्हिजन (SIR) प्रक्रिया सक्रिय नाही. महाराष्ट्र सरकारने निवडणूक आयोगास विनंती करून SIR प्रक्रिया पुढे ढकलली आहे.मात्र, याचा अर्थ असा नाही की आपण आपल्या मतदानाच्या नोंदींकडे दुर्लक्ष करावे. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आपले नाव Maharashtra Voter List Check करून पाहणे तुमच्या साठी अत्यंत आवश्यक आहे.
महाराष्ट्र मतदारांसाठी नाव तपासण्याची आणि नोंदणीची प्रक्रिया
सध्या SIR प्रक्रिया पुढे ढकलली आहे. परंतु Special Summary Revision (SSR) किंवा सामान्य नोंदणी/दुरुस्ती प्रक्रिया सुरू असते. मतदार नोंदणी किंवा दुरुस्ती करण्यासाठी तुम्ही खालील प्रमाणे ऑनलाइन सुविधांचा अवलंब करू शकता.
१. मतदार यादीत नाव कसे तपासावे?
तुमचे नाव मतदार यादीत आहे की नाही, हे तुम्ही ECINet Voter Portal हे online वापरून तपासू शकता. येथे तुम्ही तुमचा EPIC क्रमांक, नाव किंवा इतर माहिती वापरून महाराष्ट्र मतदार यादी तपासणी करू शकता.
२. ऑनलाइन अर्ज / दुरुस्ती प्रक्रिया
नवीन नोंदणी, पत्ता बदल किंवा इतर दुरुस्ती करण्यासाठी तुम्ही निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळांचा वापर करू शकता. Maharashtra Voter Registration प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन उपलब्ध आहे.
३. मदतीसाठी संपर्क
मतदार नोंदणी किंवा इतर कोणत्याही मदतीसाठी, तुम्ही टोल-फ्री हेल्पलाइनवर संपर्क साधू शकता.
टोल-फ्री हेल्पलाइन: तुमच्या STD कोडसह १९५० (उदा. मुंबईसाठी 022-1950)
४. अधिकृत माहितीसाठी अद्ययावत रहा
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर IR किंवा SSR संबंधित अद्ययावत माहिती मिळते. येथेच अधिकारिक तारखा व सूचना प्रसिद्ध केल्या जातात.
SIR प्रक्रिया महाराष्ट्रात का पुढे ढकलली?
इतर काही राज्यांमध्ये SIR प्रक्रिया सुरू असताना, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने भारतीय निवडणूक आयोगाला विशेष विनंती केली आहे.
- विनंती: SIR प्रक्रिया जानेवारी २०२६ पर्यंत पुढे ढकलण्याची विनंती.
- कारण: सध्या महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि मतदार याद्यांच्या विभागणीचे काम चालू.
- अधिकाऱ्यांची व्यस्तता: उपजिल्हाधिकारी व तहसीलदार हे RO आणि ARO म्हणून कार्यरत असल्याने त्यांना दोन मोठी कामे एकत्र हाताळणे कठीण.
महत्त्वाचा संदेश
जरी SIR प्रक्रिया पुढे ढकलली गेली असली, तरी आपले नाव मतदार यादीत आहे की नाही हे तपासणे आणि दुरुस्त्या करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. Maharashtra Voter List Check स्वतः करून आपण आपल्या Voter List नोंदणीची पडताळणी करून काही चुका असल्यास त्या वेळीच सुधारून घेवू शकता. जन्मतारीख,नावाचे स्पेलिंग,अथवा पत्त्यामधील चुका आपण स्वतः वरीलप्रमाणे online दुरुस्त करू शकता.
हे ही वाचा : तुमचे आधार-पॅन link झाले आहे की नाही status check करा







