७१ वर्षीय मल्याळी सुपरस्टार स्टार मामुटी यांना कॅन्सर झाल्याची अफवा पसरली होती. ते सुदृढ आहेत अशी शहानिशा झाल्यामुळे त्यांचे चाहते आनंदीत आहेत
Mamutty Cancer Rumour: मल्याळी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेता मामुट्टी यांच्याबद्दलची एक आनंदाची बातमी सध्या चर्चेत आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांच्या तब्येतीविषयी वेगवेगळ्या अफवा पसरल्या होत्या. आरोग्य बिघडल्यामुळे ते शूटिंगपासून दूर गेले होते. या काळात चाहत्यांना त्यांच्याबद्दल मोठी चिंता झाली होती. पण आता त्यांच्या टीमने जाहीर केले आहे की मामुट्टी पूर्णपणे बरे झाले आहेत आणि पुन्हा चित्रपटांमध्ये सक्रिय होणार आहेत.
आरोग्य समस्या आणि पुनरागमन
मामुट्टींच्या आरोग्याविषयी कॅन्सरसारख्या अफवाही पसरल्या होत्या, पण नुकतेच अधिकृत रित्या स्पष्ट करण्यात आले की त्या बातम्या खऱ्या नव्हत्या. इतर काही आरोग्य समस्यांवर उचार घेऊन आता ते पूर्णपणे तंदुरुस्त झाले आहेत. या आनंदवार्तेवर त्यांच्या सहकलाकारांनी आणि मित्रांनी मनापासून शुभेच्छा दिल्या. मोहनलालसारख्या जिवलग सहकाऱ्याने सोशल मीडियावर मामुट्टीला मिठी मारत गालावर किस देतानाचा फोटो टाकला आणि चाहत्यांचे डोळे भरून आले. प्रित्वीराज, मंजू वॉरियर यांसारख्या कलाकारांनी देखील त्यांच्या पुनरागमनाचे स्वागत केले.
चित्रपट क्षेत्रातला त्यांचा प्रवास
मामुट्टी गेली चार दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांना आपल्या अभिनयाने मंत्रमुग्ध करत आहेत. त्यांनी केवळ मल्याळी चित्रपटांतच नव्हे तर तमिळ, तेलुगू, हिंदी अशा अनेक भाषांमध्ये काम केले आहे. त्यांनी सामाजिक, ऐतिहासिक, अॅक्शन, कौटुंबिक, अशा सर्व प्रकारच्या भूमिका केल्या आहेत.सर्वात विशेष म्हणजे, त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका जब्बार पटेल दिग्दर्शित डॉ. बाबासाहेब आंबेडकर (1999) या चित्रपटात साकारली होती. ही भूमिका त्यांच्या कारकिर्दीतला एक मोलाचा टप्पा मानली जाते
अलीकडील चित्रपट आणि लोकप्रियता
अलीकडे त्यांनी Kaathal – The Core सारख्या चित्रपटात दमदार भूमिका केली होती. Bazooka, Bramayugam यांसारख्या प्रोजेक्ट्समध्ये ते विविध प्रयोग करताना दिसले. त्यांच्या आगामी चित्रपटांमध्ये Patriot (महेश नारायणन दिग्दर्शित, मोहनलालसोबत) आणि Kalamkaval या प्रकल्पांचा समावेश आहे.
पुन्हा सक्रीय झाल्या मुळे चाहत्यांमधे उत्साह
चाहत्यांसाठी मामुट्टी हे फक्त एक अभिनेता नाहीत, तर प्रेरणेचं मूर्तिमंत प्रतीक आहेत. त्यांच्या आरोग्याच्या बातम्यांनी चाहत्यांना काळजी वाटली होती, पण आता ते पुन्हा नव्या जोमाने कामाला लागणार असल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. ७१ वर्षीय मामुटी यांचे आरोग्य समस्येवर मात करून पुन्हा चित्रपटांत परतणे, ही मामुट्टींच्या जिद्दीची आणि चाहत्यांवरील प्रेमाची जाणीव करून देणारी घटना आहे. त्यांच्या आगामी चित्रपटांची उत्सुकता प्रचंड आहे. आणि त्यांच्या कारकिर्दीकडे पाहिलं तर – आंबेडकरांची भूमिका असो वा मल्याळी सिनेमा रंगवणाऱ्या विविध व्यक्तिरेखा – मामुट्टी हे खरेच भारतीय चित्रपटसृष्टीतील एक अमूल्य रत्न आहेत
हे ही वाचा:Dr Babasaheb Ambedkar : मामूट्टी आधी आंबेडकरांची भूमिका Robert de Niro करणार होते







