🎬 COSTAO या आगामी हिंदी चित्रपटासाठी नवाजुद्दीन मुलाखत देत होते तेंव्हा ते मराठी अभिनेत्यां बद्दल बोलले
ही मुलाखत कोणत्या कार्यक्रमासाठी होती?
ही खास मुलाखत पत्रकार पूजा तलवार यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनेल The Pooja Talwar Show साठी घेतली होती. मुलाखत नवाजुद्दीन यांच्या आगामी चित्रपट “कोस्टाओ” च्या प्रचाराच्या अनुषंगाने होती. त्यात त्यांनी केवळ चित्रपटाविषयीच नव्हे तर अभिनय, सर्जनशीलता आणि कलाकारांविषयी सखोल विचार मांडले.
नवाजुद्दीन सिद्दीकी काय म्हणाले?
“मराठी ॲक्टर खूप टॅलेन्टेड असतात, पण त्यांना पाहिजे तेवढी प्रसिद्धी मिळत नाही.” या एका वाक्यातून त्यांनी मराठी कलाकारांच्या गुणवत्ता आणि त्यांच्या संघर्षाची जाणीव प्रकट केली. त्यांच्या मतानुसार, मराठी सिनेक्षेत्रात काम करणारे कलाकार अतिशय मेहनती, सखोल अभ्यासू आणि प्रामाणिक अभिनय करणारे असतात.
मराठी अभिनेत्री प्रिया बापट COSTAO मधे पत्नी च्या भूमिकेत
‘कोस्टाओ’ चित्रपटात नवाजुद्दीन यांच्यासोबत मराठी अभिनेत्री प्रिया बापट आहेत, ज्यांनी त्यांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. प्रिया यांनीही नवाजुद्दीन यांच्याबद्दल कौतुकाचे शब्द काढले: “नवाज सर अत्यंत व्यावसायिक आहेत आणि त्यांच्या अभिनयातील प्रामाणिकपणा प्रेरणादायक आहे.” असे त्या म्हणाल्या.
मराठी कलाकारांसाठी ही स्तुती महत्त्वाची का?
नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्यासारखा दर्जेदार अभिनेता जेव्हा मराठी कलाकारांचे कौतुक करतो, तेव्हा ती केवळ स्तुती राहत नाही, तर ती एक मान्यता ठरते. यामुळे हिंदी प्रेक्षकांमध्ये मराठी कलाकारांविषयी अधिक कुतूहल आणि आदर निर्माण होतो हे निश्चित.
मुलाखत क्लिप या लिंकवर पहा
पुजा तलवार यांनी घेतलेली ही मुलाखत clip स्वरूपात
@Marathi CineNews1 या चॅनलने repost केली आहे या लिंकवर →https://youtube.com/shorts/2vqIFvUjmso?si=fQe1XciOia1QqZ14
निष्कर्ष
मुलाखतीत मराठी कलाकारांच्या साठी एक थेट दाद आहे. नवाजुद्दीन यांचे हे उद्गार मराठी सिनेक्षेत्रासाठी ऊर्जा देणारे आहेत.
हे ही वाचा
हृतिक रोशन वळतोय दिग्दर्शनाकडे : क्रिश चं करणार दिग्दर्शन







