Indian Railway ची जेष्ठ नागरिकांसाठी दिलासादायक योजना – १ जूनपासून तिकीटामध्ये ४०% सूट!
तपशील
भारतीय रेल्वेने १ जून २०२५ पासून सीनिअर सिटीझन्ससाठी पुन्हा एकदा मोठी आणि स्वागतार्ह घोषणा केली आहे. ६० वर्षांवरील नागरिकांना रेल्वेच्या तिकीटांवर ४०% सूट दिली जाणार आहे. महिलांसाठी ही वयोमर्यादा ५८ वर्षे असून त्यांना अधिक सवलत मिळण्याची शक्यता आहे. जेष्ठ नागरिक कार्ड व आधार कार्ड हे वयाचा पुरावा म्हणून या योजनेसाठी ग्राह्य मानले जातील. ही तिकिटे रेल्वे च्या अधिकृत online site वरून ही आरक्षित करता येतील.
जुनी योजना पुनरुज्जीवित
कोरोना महामारीनंत Indian Railway च्या अनेक सवलती बंद करण्यात आल्या होत्या, ज्यामुळे वयोवृद्ध नागरिकांना आर्थिकदृष्ट्या त्रास सहन करावा लागत होता. विशेषतः ज्येष्ठ नागरिक ज्यांना वैद्यकीय उपचार, धार्मिक स्थळांची यात्रा किंवा नातेवाईकांना भेटण्यासाठी प्रवास करावा लागतो, त्यांच्यासाठी ही सवलत आवश्यक होती.
जेष्ठांबाबत आदर भावनेचे भारतीय सांस्कृतिक मूल्य
भारतीय संस्कृतीत ज्येष्ठांना ‘अनुभवाचा स्त्रोत’ मानले जाते. त्यांचा सन्मान करणं ही नैतिक जबाबदारी मानली जाते. रेल्वे ही देशाची जीवनवाहिनी असतानाच, तिच्या धोरणांमधून सामाजिक संवेदनशीलतेचाही प्रत्यय यावा, ही अपेक्षा असते. ही सूट ही केवळ एक आर्थिक मदत नाही, तर भारतीय सांस्कृतिक ,विशेषत: कौटुंबिक मूल्यांची जपणूक आहे –जी वयो वृद्धांना सन्मानाने जगण्याचा हक्क देते. Indian Railway प्रशासनाने घेतलेला हा निर्णय कौतुकास्पद आहे.
उपसंहार
:ही सवलत केवळ आकड्यांपुरती मर्यादित नसावी, तर ती प्रत्यक्ष प्रवासाच्या अनुभवातही दिसून यावी, यासाठी रेल्वे प्रशासनाने प्रभावी अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी आरक्षित सिट्स, प्लॅटफॉर्मवर सहाय्यक सेवा आणि ऑनलाइन बुकिंगमध्येही सवलतीचा पर्याय उपलब्ध करून देणं ही पुढची पावलं असतील असे अपेक्षित आहे.तुमच्या कुटुंबात सीनिअर सिटीझन्स असतील, तर ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवा आणि त्यांचा प्रवास अधिक सुलभ आणि आनंददायक करण्यास मदत करा.
अधिकृत माहिती साठी खालील Indian Railway (IRCTC) च्या वेबसाईट वर जरूर जा
Indian Railway E ticket booking







