संस्कृत भाषेचा वापर computer coding साठी
संस्कृत (Sanskrit)भाषा ही कम्प्युटरच्या कोड लँग्वेज साठी उपयुक्त आहे का याबद्दल अनेकदा चर्चा होत असतात. अमेरिकेच्या NASA या संस्थेकडून प्राचीनतम संस्कृत चा वापर वैज्ञानिक अनुसंधानासाठी केला जाण्याची शक्यता बोलली जाते. या सर्व चर्चांच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विश्वविद्यालयाने मात्र प्रत्यक्षात एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
संस्कृत भाषेत आहे ध्वनी तंत्राचा वापर
भाषा व्यक्त होण्याचे एक प्रभावी असे साधन आहे. भाषा प्राचीन काळा पासून माणसे व माणसांचे समूह वापरत आहेत .बॅबिलॉन संस्कृतीमध्ये सर्वप्रथम लिपीचा शोध लागला असे इतिहास तज्ञ सांगतात. त्यामानाने संस्कृत भाषा ही अलीकडची, म्हणजे वेदिक काळापासून वापरात येऊ लागली संस्कृत भाषा एक प्रभावी व तंत्रशुद्ध भाषा आहे व ती ध्वनी विज्ञानाचा वापर करून बनवली गेली आहे . संस्कृत भाषा विशिष्ट ध्वनी लहरी उत्पादित करून भाव लहरी निर्माण करण्यासाठी वापरली जाते असे मानले जाते.
संस्कृतचे संवर्धन
या प्राचीन संस्कृत Sanskrit भाषे ला संवर्धित करण्याचे प्रयत्न भारत सरकार अनेक वर्षांपासून करत आहे. दिल्ली विश्वविद्यालयात मात्र ही भाषा थेट आधुनिक विज्ञानाशी जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. दिल्ली विश्वविद्यालयाने संस्कृत या भाषेला आधुनिक कम्प्युटर तंत्राशी जोडण्याचा एक कोर्सच विद्यार्थ्यांसाठी तयार केला आहे.
DU -दिल्ली विश्वविद्यालयाचा अभिनव उपक्रम
दिल्ली विश्वविद्यालयाच्या Sanskrit Department ने computer application for Sanskrit हा नवा अभ्यासक्रम डिझाईन केला आहे. हा discipline specific elactive paper असेल. यात आधुनिक संगणकीय तंत्राद्वारे टूल्स निर्माण करण्याचे प्रशिक्षण संस्कृत भाषे चा वापर करून विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे.
कसे आहे या संस्कृत मधून computer application शिकवणार्या DU कोर्सचे स्वरूप
दिल्ली युनिव्हर्सिटी (DU)अंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयात संस्कृत भाषा शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा कोर्स वैकल्पिक तत्त्वावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.प्रोफेसर सुभाष चंद्र जे दिल्ली युनिव्हर्सिटीच्या संस्कृत विभागाचे फॅकल्टी मेंबर आहेत त्यांनी हा अभिनव असा कोर्स डिझाईन केला आहे. प्रोफेसर सुभाष चंद्र हे computational linguistic हा विषय शिकवतात. Computer application for Sanskrit या कोर्स चे प्रयोजन सांगताना प्रोफेसर सुभाष चंद्र म्हणाले “या कोर्स द्वारा विद्यार्थ्यांना संस्कृत आणि आधुनिक तंत्रज्ञान यांची सांगड घालण्याचे शिक्षण दिले जाईल. आमच्या अधिकृत वेबसाईटवर संस्कृत भाषा वापरून तयार केलेले संगणकीय टूल्स आम्ही प्रदर्शित केले आहेत” असे ते म्हणाले.
हे टूल्स खालील प्रकारचे आहेत :
-Language analyser
-grammer checkers
-speech tools (speech to text tools)
-Sanskrit research database
वरील प्रकारचे टूल्स तयार करण्याची प्रशिक्षण या नवीन कोर्स द्वारा दिले जाणार आहे.
संपूर्ण कोर्स सिल्याबस मध्ये खालील विषय शिकवले जातील
-web-based tools development,
-Hypertext Markup Language (HTML) and
-webpage creation,
-Unicode typing in Devanagari,
-OCR applications,
-text digitisation and preservation.
हे विषय कव्हर केले जातील.
Text processing साठी वेगळे प्रशिक्षण युनिट व optical character recognition (OCR) साठी वेगळे प्रशिक्षण युनिट असेल. या कोर्स मधे विद्यार्थ्यांना बेसिक कोडींग आणि डिजिटल स्किल्स शिकवल्या जातील ज्या वापरून ते संस्कृत भाषेच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म साठी इंटर ऍक्टिव्ह टूल्स निर्माण करू शकतील.
संस्कृत भाषेचा वापर करू शकणाऱ्या फोर्थ सेमिस्टर च्या विद्यार्थ्यांसाठी हा कोर्स उपलब्ध आहे.
थोडक्यात
Sanskrit -संस्कृत च्या “digital possibilities” पडताळून पाहण्यासाठी या कोर्स चे प्रयोजन आहे. दिल्ली युनिव्हर्सिटी (DU) सारख्या मोठ्या विश्वविद्यालयाने संस्कृत भाषेला तांत्रिक पातळीवर मान्यता देऊन त्या भाषेतील शक्यता संशोधित करून संस्कृत ला आधुनिक कम्प्युटर विज्ञानाशी जोडण्याचा केलेला हा प्रयत्न स्तुत्य असा आहे.






