मौसमक्रिकेटऑपरेशन सिंदूरक्रिकेटस्पोर्ट्सबॉलीवुडजॉब - एजुकेशनबिजनेसलाइफस्टाइलदेशविदेशराशिफललाइफ - साइंसआध्यात्मिकअन्य

Avinash Ghodke

Screenwriter and Lyricist with 20 years of experience in Bollywood and Marathi cinema.His creative writing examines the contradictions of lived experience, while his journalism uncovers humanism beneath headlines.

Santa Claus ला पत्र पाठवायचंय? हा घ्या त्याच्या गावचा पत्ता -हो सांता personally उत्तर ही पाठवेल..

Santa Claus postal Address – Finland देशातील गाव Rovaniemi

नाताळचा सण जवळ आला की मुलांपासून थोरांपर्यंत सगळ्यांनाच ओढ लागते ती सांताक्लॉजची (Santa Claus). लाल कपडे, पांढरी शुभ्र दाढी आणि पाठीवर भेटवस्तूंचे भलेमोठे गाठोडे घेऊन येणारा सांता हे तथ्यावर आधारित असे एक कल्पित पात्र आहे.या जगप्रसिद्ध गोड संकल्पनेला फिनलंड देशाने वास्तवतेचा तितकाच गोड मुलामा दिला आहे. बच्चे कंपनी चा लाडका Santa Claus फिनलंड देशात प्रत्यक्ष एका ठिकाणी राहतो हे तुम्हाला माहीत आहे का?
हो, फिनलंडमधील रोवानिएमी (Rovaniemi) या शहरात सांताक्लॉजचे एक अधिकृत गाव आहे. विशेष म्हणजे, तुम्ही सांताला या गावी पत्र पाठवले तर तुम्हाला त्याचे उत्तरही मिळू शकते!

Santa village

Santa Claus च्या Rovaniemi गावात असते ख्रिसमस ची धूम -Santa Village

Christmas काळात Santa Claus च्या रोवानिएमी गावात(Santa Claus postal Address)उत्सवाचा माहोल असतो. दिव्यांची रोषणाई व पताका , झिरमिळ्यांनी गाव सजलेले असते. North pole जवळील हे गाव संपूर्ण बर्फाच्छादित असते. पांढर्या शुभ्र बर्फाच्या पार्श्वभूमीवर चमकदार आभूषणांनी सजलेले ख्रिसमस ट्री उठून दिसत असतात. खास ख्रिसमस निमित्त सांता ला भेटायला काही पर्यटक त्याच्या Rovaniemi गावी येतात.

❄️ सांता व्हिलेजमधील वर्षभरातील खास कार्यक्रम


सांताक्लॉजचे हे गाव (Santa Claus Village) वर्षभर पर्यटकांच्या स्वागतासाठी खुले असते. तिथे काही विशेष कार्यक्रम साजरे केले जातात:
* ख्रिसमस सीजनची सुरुवात (नोव्हेंबर): दरवर्षी नोव्हेंबरच्या मध्यात येथे ख्रिसमसच्या हंगामाची अधिकृत घोषणा होते. हा सोहळा पाहण्यासाठी जगभरातून लोक येतात.
* सांताचे प्रयाण (२३ डिसेंबर): ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला सांता आपले रेनडिअर घेऊन जगभरातील मुलांना भेटवस्तू देण्यासाठी निघतो. हा ‘Departure’ सोहळा अतिशय रंजक असतो.
* मिडसमर (जून): आर्क्टिक सर्कलमध्ये उन्हाळ्यात सूर्य मावळत नाही. या काळात ‘मिडनाईट सन’ पाहण्यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात.

📍 सांता व्हिलेजमधील मुख्य प्रेक्षणीय स्थळे


Santa Claus postal Address एकदा भेटल्यावर केवळ सांताला भेटण्यासाठीच नाही, तर निसर्गाचा आनंद घेण्यासाठीही तिथे जा:


* आर्क्टिक सर्कल (Arctic Circle Line): सांता व्हिलेजमधून आर्क्टिक सर्कलची काल्पनिक रेषा जाते. पर्यटकांना ही रेषा ओलांडण्याचा थरार अनुभवता येतो आणि त्याचे अधिकृत प्रमाणपत्रही मिळते.
* सांताचे मुख्य पोस्ट ऑफिस: येथे तुम्ही जगातील विविध देशांतून आलेली लाखो पत्रे पाहू शकता. येथून तुम्ही तुमच्या प्रियजनांना सांताच्या विशेष स्टॅम्पसह पत्र पाठवू शकता.
* रेनडिअर आणि हस्की राईड: सांताची गाडी ओढणारे रेनडिअर आणि वेगवान हस्की कुत्र्यांच्या स्लेज राईडचा आनंद येथे घेता येतो.
* स्नोमॅन वर्ल्ड (Snowman World): बर्फाचे पुतळे, आईस स्लाइडिंग आणि बर्फाच्या हॉटेलमध्ये जेवणाचा आनंद घेण्यासाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे.

💡 काही खास गोष्टी

* उत्तर ध्रुवाचा अनुभव: हे गाव आर्क्टिक सर्कलवर वसलेले असल्याने येथे वर्षभर थंडी असते. हिवाळ्यात उणे तापमानाचा अनुभव घेता येतो.
* नॉर्दर्न लाइट्स (Northern Lights): नशीब जोरावर असेल तर रात्रीच्या वेळी आकाशात चमकणारे हिरवे-निळे ‘नॉर्दर्न लाइट्स’ पाहण्याची संधीही येथे मिळते.

Northern lights

Santa Claus तुमच्या पत्राची वाट बघतोय

सांताक्लॉजचे Rovaniemi हे गाव म्हणजे स्वप्न आणि वास्तव यांचे एक सुंदर मिलन आहे. Santa Claus च्या Rovaniemi या गावी बच्चे कंपनीला घेऊन जाणे शक्य नसेल तर तुमच्या बच्चे कंपनी च्या नावाने  सांताला पत्र नक्की लिहून पहा!

🎅 सांताक्लॉजला पत्र पाठवण्यासाठी अधिकृत पत्ता खाली दिला आहे…

जगभरातील लाखो मुले सांताला आपली इच्छा आणि पत्राद्वारे शुभेच्छा कळवत असतात. सांताक्लॉजच्या मुख्य पोस्ट ऑफिसचा पत्ता Santa Claus Address खालीलप्रमाणे आहे:

Santa Claus
Santa Claus’ Main Post Office
96930 Arctic Circle
> Finland

महत्त्वाची टीप: जर तुम्हाला सांताकडून उत्तर हवे असेल, तर तुमचे पत्र स्पष्ट अक्षरात लिहा आणि तुमच्या पत्रावर स्वतःचा पूर्ण पत्ता लिहायला विसरू नका. सांताचे पोस्टमन हे पत्र सांतापर्यंत पोहोचवतात!
अधिकृत वेबसाइट: www.santaclausvillage.info

फिनलंड देशाने सांता क्लौज चे निर्माण केलेले हे Santa Claus चे अस्तित्व आभासी असले तरी लोभस आहे. हा लोभस सांता त्याच्या लालचुटुक Mail box मधे तुमचे पत्र शोधतोय…….

About The Author

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment