मौसमक्रिकेटऑपरेशन सिंदूरक्रिकेटस्पोर्ट्सबॉलीवुडजॉब - एजुकेशनबिजनेसलाइफस्टाइलदेशविदेशराशिफललाइफ - साइंसआध्यात्मिकअन्य

Avinash Ghodke

Screenwriter and Lyricist with 20 years of experience in Bollywood and Marathi cinema.His creative writing examines the contradictions of lived experience, while his journalism uncovers humanism beneath headlines.

RD अर्थात पंचमदा यांचे कलकत्त्ता येथील घर वाचविण्यासाठी फॅन्सचे आंदोलन-save R D Burman’s calcutta house

आर.डी. बर्मन यांचे कलकत्ता येथील घर – एक सांगीतिक ठेवा म्हणून जतन करण्यात यावे अशी फॅन्स ची मागणी

भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात जे काही कालातीत संगीतकार होऊन गेले, त्यापैकी राहुल देव बर्मन उर्फ *पंचमदा* हे नाव विशेष महत्त्वाचे आहे. १९३९ साली कलकत्त्यात जन्मलेले पंचमदा हे सुप्रसिद्ध संगीतकार सचिन देव बर्मन यांचे पुत्र. त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीला अशा कितीतरी संगीत रचना दिल्या ज्या आजही ताज्या वाटतात . पंचमदांनी एकूण 30 चित्रपटांना संगीत दिले आणि आजही तरुणाईच्या play list मध्ये त्यांची गाणी हमखास असतात.आज पंचमदांच्या निधनानंतर तीन दशकं लोटली असली, तरी त्यांचे संगीत अजूनही रसिकांच्या मनात घर करून आहे. पण या महान संगीतकाराचं घर आज दुर्लक्षित अवस्थेत आहे. R D यांचे कलकत्त्यातील वडिलोपार्जित घर जतन करण्याची मागणी त्यांच्या चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात होत आहे असे न्यूज 18 या वाहिनीचे वृत्त आहे. नुकतीच या संदर्भात एक ऑनलाईन मोहीम सुरु झाली असून, *”Save RD Burman’s Kolkata House“* या नावाने सोशल मीडियावर एक याचिका व्हायरल झाली आहे. गेल्या एका आठवड्यात या याचिकेवर सात हजार लोकांनी सह्या केल्या आहेत.या याचिकेद्वारा पंचमदांचे चाहक असे म्हणतात की हे घर म्हणजे नुसत्या विटा आणि भिंती नाही तर हे पंचंदांचे जिवंत स्मारक आहे . हे घर जतन करून त्या ठिकाणी म्युझियम बनवणे गरजेचे आहे अशी मागणी कलकत्ता सरकार पुढे लोकांनी केली आहे.

का जतन करावे पंचमदांचे घर?

36/साऊथ एंड पार्क येथील घरात पंचांग आमचा जन्म झाला व याच घरात पुढे त्यांनी अनेक चित्रपटांची संगीत रचना केली.हे घर 1944 साली पंचमदांचे वडील व महान संगीतकार सचिन देव बर्मन यांनी बांधले होते. पंचमदा येथे 1952 पर्यंत वास्तव्यास होते. नंतर ते मुंबईला राहू लागले.पंचमदा फक्त एक संगीतकार नव्हते, ते एक प्रयोगशील विचारवंत होते. त्यांचे संगीत आजही रॉक, डिस्को, भारतीय शास्त्रीय आणि पाश्चिमात्य ध्वनींचा सुरेख संगम आहे. त्यांनी १९६० ते १९९० च्या दरम्यान अनेक नव्या ट्रेंड्स आणले. त्यांच्या संगीतातील नवाचाराचे मूळ त्यांच्या बालपणीच्या अनुभवांत होते, जे त्यांनी कलकत्त्यातील याच घरात घेतले होते.त्यांच्या चाहत्यांचे म्हणणे आहे की, हे घर म्हणजे पंचमदांच्या सुरांमागील मूळ प्रेरणास्थान आहे. या घरात त्यांनी अनेक प्रयोग केले, घरच्या भिंतींवर थाप देऊन ध्वनी तयार केले, हर्मोनियमवर बालवयात सूर साधले आणि वडिलांकडून संगीताची बारकावे आत्मसात केली. अशा ऐतिहासिक ठिकाणाला संरक्षित करण्याची आता वेळ आलेली आहे.

सांगीतिक वारसा जतन करण्याचा प्रयत्न

2021 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या घराच्या समोरील रस्त्याचे ‘संगीत सरनी‘ असे नामकरण केले होते. याचवेळी या घरालाही स्मारक रूपात संरक्षित करावे अशी चर्चा सुरू झाली होती.पश्चिम बंगाल सरकारकडे, विशेषतः कोलकाता महानगरपालिकेकडे आता जबाबदारी आहे की त्यांनी या ऐतिहासिक वास्तूचे जतन करावे. महाराष्ट्रात लता मंगेशकर यांच्या घरी संग्रहालय व्हावे ही मागणी जशी होते आहे, तशीच पंचमदांच्या घरासंदर्भातही रसिकांची भावना आहे.कलकत्ता ही पंचमदा यांची जन्मभूमी होती. त्यांच्या जीवनाचा प्रारंभ आणि सुरुवातीच्या अनेक संगीतिक कल्पनांचा उगम येथेच झाला. जर हे घर संग्रहालयात रूपांतरित झाले, तर पुढच्या पिढ्यांना पंचमदांची प्रेरणादायी कहाणी अनुभवता येईल.

याचिकेची सुरुवात

सध्या ‘Change.org’ वर आर.डी. बर्मन यांचे घर जतन करण्यासाठी हजारोंच्या संख्येने लोकांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. अनेक संगीतप्रेमी, कलाकार, पत्रकार, आणि चित्रपट सृष्टीतील नामवंत मंडळी यासाठी पुढे सरसावली आहेत. सोशल मीडियावर *#SaveRDBHouse* हा हॅशटॅग ट्रेंड होतो आहे. आर डी बर्मन यांचे नातलग अभिजीत दास गुप्ता यांनीच या अभियानाची सुरुवात केली आहे. त्यांचे असे म्हणणे आहे की 2019 ला या घराला संरक्षित करण्याबाबत सरकारकडून वचन दिले गेले पण या संदर्भात पुढे काहीच पाऊल उलले गेले नाही.

श्री स्वपन समदर, Member, Mayor-in-Council (Environment & Heritage), यांना या संदर्भात विचारणा केली असता त्यांनी “माझ्यापर्यंत अशी कुठली याचिका आली नाही व आल्यास मी योग्य पावले उचलेन” असे आश्वासन दिले आहे.

निष्कर्ष

आर.डी. बर्मन हे केवळ संगीतकार नव्हते, ते भारतीय संगीत संस्कृतीचा एक अमूल्य भाग होते. त्यांच्या वारशाचे जतन करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कलकत्त्यातील त्यांचे वडिलोपार्जित घर हे एक सांगीतिक प्रेरणास्थान बनू शकते .पंचमदा पाच वर्षाचे असताना मुंबईतील आरडी बर्मन यांच्या सायन च्या घरात दोन वर्ष राहिले होते हे ही इथे नमूद करावेसे वाटते.

हे ही वाचा

S D Burman यांचे मुंबईतले सायन येथील पहिले घर

About The Author

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment