Avinash Ghodke

Screenwriter and Lyricist with 20 years of experience in Bollywood and Marathi cinema.His creative writing examines the contradictions of lived experience, while his journalism uncovers humanism beneath headlines.

रावण … मिलके जलाओ ! Agneepath Script Development

.. “KANCHA is not a villain..he is an EVIL”


  करण मल्होत्रा मला कांचाचं brief देत होता. त्याने मला संजय दत्त चे कांचा च्या गेट-अप मधे काढलेले ‘लुक टेस्ट ‘ वाले फोटो दाखवले .. माझ्या मनात जुन्या अग्निपथ मधला Danny यांचा सुटा बुटातला तो  ‘अप टू डेट’ कांचा अजूनही घर करून होता.. या नव्या ओंगळ कांचा मधे Fear बरोबर  एक Repulsive Factor ही  होता.
 माझ्या चेहऱ्या कडे बघत करण म्हणाला ..” Kancha is not a villain … he is an Evil “..
तो म्हणाला “धर्मा च्या नावाखाली ज्या शक्ती आतंक करतात त्या शक्तींच प्रतिक म्हणजे कांचा ….”
मला आवडलं त्याच थिंकिंग. आज हे Evil भावनेचा आधार घेत साऱ्या समाजात उच्छाद मांडतय …

रावण ... मिलके जलाओ ! Agneepath Script Development

दर वर्षी  दसर्याला आपण रावणाच दहन करतो…रावणा सारख्या दुष्ट प्रवृत्ती या समाजाने एकत्र येवून एकजुटीने  कायमच्या हद्दपार कराव्यात  हाच संकेत आणी संदेश या ‘रावण-दह्नात’ असतो.   ..काही वर्षांपूर्वी आमच्या नेहरू नगरच्या घरी  दसर्याला समोरच्या ६४ नंबर इमारतीतील मुलं   ‘रावणाची वर्गणी’   मागायला आली होती.आम्ही त्या मुलांच्यावयाचे  होतो तेव्हापासून आमच्या(७४) आणि त्यांच्या इमारतीचे कार्यक्रम कधीच एकत्र झाले नव्हते .
                माझ्या मोठया भावाने म्होरक्या म्हणून पुढे उभ्या राहिलेल्या इम्रान ला ..”तुम्हारे रावण को हम
कायको वर्गणी देनेका ??”असं गमतीने विचारलं.त्यावर इम्रान ने ही समर्पक उत्तर दिलं..
म्हणाला “ऐसा कुछ नही अंकल ..रावण तो सबका है ना ..”
           खरच “रावण तो सबका है “…आज धर्माचं शस्त्र करनार हे EVIL कुठे नाही…याच्या शस्त्राच्या आघाताने  समाज दुभंगत जातो ..इमारती ,गल्ल्या, वस्त्या, प्रांत आणि देशां मध्ये..या Evil रावणाच दहन करायला हवं…कारण इम्रान म्हणाल्या प्रमाणे …. ‘रावण तो सबका हैं !!!’..


-अविनाश घोडके
सह संवाद लेखक -अग्निपथ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now