कॅप्टन स्मित मच्छर (Captain Smit Machchhar) यांच्यावर ३० सप्टेंबर २०२६ रोजी ओमानचे (Oman) नागरिक असलेल्या सह-वैमानिकाने चाकूने जीवघेणा हल्ला केला. घायाळ असूनही कॅप्टन स्मित यांनी मोठ्या धाडसाने हा विमान अपहरणाचा प्रयत्न हाणून पाडला.. फक्त 8 मिनिटांत हे संपूर्ण नाट्य कसे घडले ते समजून घेऊया. (flydubai flight pilot what happened)
Captain Smit Machchhar यांची 8 मिनीटांची झुंज
हा विमान अपहरणाचा प्रयत्न Flydubai FZ1073 (दुबई ते तेल अवीव) या विमानामध्ये ३४,००० फूट उंचीवर घडला. Captain Smit Machchhar यांनी रक्यातबंबाळ अवस्थेत ही प्रसंगावधान राखून विमानातील तब्बल १७४ प्रवाशांचे प्राण यावेळी वाचवले. धारदार शस्त्राने डोक्यावर व हाताला झालेल्या जखमेतून रक्तस्त्राव होत होता पण अशाही परिस्थितीत कॅप्टन स्मित यांनी आतून Cockpit चे दार उघडले.
अमेरिकेतील ऐतिहासिक 9/11 च्या हल्ल्यानंतर सुरक्षेखातर जगातील सर्व विमानांचे cockpit चे दरवाजे बाहेरून उघडता येत नाहीत. कॅप्टन स्मित यांनी जर cockpit चे दार आतून उघडले नसते तर ओमानी सहवैमानिकाचा विमान अपघातग्रस्त करण्याचा हेतू सफल झाला असता.कॅप्टन स्मित यांनी दिलेली ही झुंज आठ मिनीटांची होती पण लक्षणीय व निर्णायक होती .
घटनाक्रम कसा झाला याची क्रमवार रेखाचित्रे (Illustrations) खालीलप्रमाणे आहेत.

• ३० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ७:०५ वाजता १७४ प्रवाशांना घेऊन Boing 737 Max8 विमानाने दुबईहून तेल अवीवसाठी उड्डाण केले. उड्डाणानंतरचे पहिले अडीच तास प्रवास अतिशय सामान्य आणि शांत सुरू होता.

• सकाळी ९:२१ वाजता सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत असताना कट्टरपंथी विचारसरणीने प्रेरित ओमानी सह-वैमानिकाने अचानक कॅप्टन स्मित यांच्यावर चाकू आणि कॉकपिटमधील कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला केला.

• हल्ल्यानंतर विमानाचा ताबा घेऊन हल्लेखोराने विमान क्रॅश करण्यासाठी वेगाने खाली नेले. विमान अवघ्या ३० सेकंदांत ३४,००० फुटांवरून थेट १७,००० फुटांवर खाली आले, ज्यामुळे संपूर्ण विमान हवेत डगमगू लागले.

• विमान अचानक Nose dive करू लागल्यामुळे केबिनमध्ये एकच गोंधळ उडाला. कॉकपिटमधून भांडणाचा आवाज ऐकू आल्यामुळे ‘ताली मानेस’ नावाच्या इस्रायली महिला प्रवाशाने कॉकपिटमध्ये काहीतरी गंभीर घडत असल्याचे ओळखले आणि ओरडून सर्वांना सांगितले. (flydubai flight pilot what happened)

• डोक्याला गंभीर दुखापत झाली असतानाही कॅप्टन स्मित यांनी हिंमत हारली नाही. विमानाचा हायजॅक कोड ऍक्टिव्हेट करत त्यांनी शेवटच्या क्षणी कॉकपिटचा मुख्य दरवाजा आतून अनलॉक केला, जो एरवी बाहेरून उघडणे अशक्य असते.
30 सेकंदात विमान 34000 फुटांवरून जमीनीपासून १७००० फुटांवर खाली nose dive करत आले होते. जमिनीपासून जवळील या अवकाशात हवा दाट असते आणि या हवेचा रोध (Air Resistance) जास्त असतो. विमानाच्या खाली येण्याच्या वेगामुळे सुद्धा विमानाच्या पंखांवर आपोआप ॲरोडायनामिक लिफ्ट (Aerodynamic Lift) निर्माण झाले असणार व विमानाचा Nose dive speed १७००० फुटांवर कमी झाला असणार. याच वेळेचा फायदा घेत कॅप्टन स्मित मच्छार यांनी दाखवलेल्या प्रसंगावधान व तत्परते मुळे flydubai हे विमान जमिनीवर आदळण्यापासून वाचले.

• दरवाजा उघडताच झ्विका मानेस, यानिव हायून आणि इतर प्रवाशांनी कॉकपिटमध्ये घुसून हल्लेखोराचा गळा आवळला आणि त्याला जमिनीवर पाडून दोरीने बांधले. हल्लेखोर यावेळी आत्मघातकी घोषणा देत “मला मारून टाका” असे ओरडत होता.

• विमानात प्रवासी म्हणून असलेले flydubai चे दोन राखीव (Off-duty) पायलट तातडीने कॉकपिटमध्ये आले आणि त्यांनी विमानाची कमांड हातात घेतली व Squawk 7700 हा (General Emergency )code active केला. प्रवासी असलेल्या डॉ. शोटा मुसायेव यांनी जखमी कॅप्टन स्मित यांच्यावर तातडीने प्रथमोपचार सुरू केले.

सुरक्षित लँडिंग: तब्बल दीड तासाच्या तणावानंतर, off duty वैमानिकांनी विमान सौदी अरेबियाच्या तबूक येथील ‘प्रिन्स सुल्तान बिन अब्दुलअजीज आंतरराष्ट्रीय विमानतळावर’ सुरक्षितपणे उतरवले.
9:21 AM ते 9:28 AM या आठएक मिनीटांत मुख्य थरारनाट्याच्या घटना वरील प्रमाणे घटल्या.
पुढील 9:28 AM ते 9:58 AM या अर्ध्या तासात Flydubai FZ1073 विमान 174 प्रवाश्यांना घेवून सौदी अरब च्या तबूक विमानतळावर सुखरूप उतरवले गेले.
हल्ला का केला?
सुरक्षा यंत्रणा आणि तपास संस्थांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार हल्ल्याची मुख्य कारणे खालीलप्रमाणे आहेत:
- विमान क्रॅश करण्याचा कट (९/११ सारखा प्रयत्न): इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या माहितीनुसार, त्या सह-वैमानिकाला सर्व प्रवाशांसह विमान हवेतच क्रॅश (दुर्घटनाग्रस्त) करायचे होते. हल्ल्यानंतर विमानाचा ताबा घेऊन त्याने विमान वेगाने खाली नेण्यास सुरुवात केली, ज्यामुळे विमान अवघ्या काही सेकंदांत ३४,००० फुटांवरून थेट १७,००० फुटांवर खाली आले. कॅप्टन स्मित यांनी कॉकपिट चा दरवाजा उघडला नसता तर हे विमान थेट Nose dive करून जमीनीवर आदळले असते.
- इस्लामी कट्टरतावादी विचारसरणी: प्राथमिक तपासात आणि आरोपीच्या वैयक्तिक वस्तूंवरून समोर आले आहे की, तो इस्लामी कट्टरतावादी विचारसरणीने प्रेरित होता.
Captain Smit Machchhar यांची प्रकृती स्थिर – flydubai flight pilot what happened
घायाळ वैमानिक Captain Smit Machchhar यांना गंभीर दुखापत झाली असली तरी त्यांची प्रकृती आता स्थिर आहे व ते अबुधाबी येथील रुग्णालयात उपचार घेत आहेत. अबूधाबीमधील भारताचे युएईतील राजदूत दीपक मित्तल यांनी कॅप्टन स्मित यांची भेट घेतली. राजदूतांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅप्टन स्मित आता धोक्याबाहेर असून ते हसतमुख आणि चांगल्या मनःस्थितीत आहेत.नुकतेच पंतप्रधान मोदी यांनी त्यांना video call करून त्यांचे अभिनंदन केले व त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे
FAQ
फ्लाईदुबई विमान FZ1073 मध्ये नेमकी काय घटना घडली?
३० सप्टेंबर २०२६ रोजी दुबईहून तेल अवीव (इस्रायल) कडे जाणाऱ्या Flydubai FZ1073 या विमानामध्ये, ओमानी वंशाच्या सह-वैमानिकाने (Co-pilot) मुख्य वैमानिक कॅप्टन स्मित मच्छर यांच्यावर चाकूने आणि कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला केला.
कॅप्टन स्मित मच्छर (Captain Smit Machchhar) कोण आहेत?
कॅप्टन स्मित मच्छर हे मुंबईतील चेंबूर ,टिळक नगर चे रहिवासी आहेत. ते एक अनुभवी भारतीय व्यावसायिक वैमानिक आहेत. १७ वर्षांपेक्षा जास्त काळ उड्डाणाचा आणि ९,७५० हून अधिक तास विमाने चालवण्याचा दांडगा अनुभव त्यांच्याकडे आहे. या थरारक घटनेत त्यांनी दाखवलेल्या असीम शौर्यामुळे १७४ प्रवाशांचे प्राण वाचले आहेत.
कॉकपिटमध्ये हल्ला झाल्यानंतर विमानाचा ताबा प्रवाशांनी कसा घेतला?
हल्ल्यानंतर सह-वैमानिकाने विमान वेगाने खाली नेण्यास सुरुवात केली. गंभीर जखमी असतानाही कॅप्टन स्मित यांनी तात्काळ कॉकपिटचा मुख्य सुरक्षित दरवाजा आतून अनलॉक केला. दरवाजा उघडताच विमानातील झ्विका मानेस, यानिव हायून यांच्यासह ४ इस्रायली प्रवासी आणि केबिन क्रूने आत घुसून हल्लेखोराला दोरीने जेरबंद केले
हल्ला करणाऱ्या सह-वैमानिकाकडे चाकू किंवा कुऱ्हाड कुठून आली?
विमान वाहतूक सुरक्षा नियमांनुसार (Aviation Safety Rules), आणीबाणीच्या प्रसंगी खिडकी किंवा पॅनल तोडण्यासाठी प्रत्येक विमानातील कॉकपिटमध्ये आधीपासूनच एक ‘क्रॅश ॲक्स’ (Crash Axe – कुऱ्हाड) ठेवलेली असते, जिचा वापर हल्लेखोराने केला. याशिवाय, एअरलाईन पायलट व्यक्तीस मेटल डिटेक्टरशिवाय विमानात थेट प्रवेश मिळतो (Known Crew Member status), ज्यामुळे तो चाकू घेऊन आत गेला असावा असा प्राथमिक अंदाज आहे
हल्लेखोर ओमानी वैमानिकावर काय कारवाई सुरू आहे?
सौदी अरेबियाच्या सुरक्षा यंत्रणांनी त्याला घटनास्थळीच ताब्यात घेतले होते. प्राथमिक चौकशीनंतर सौदी मंत्रालयाने त्याला पुढील कायदेशीर कारवाई आणि सखोल तपासासाठी संयुक्त अरब अमिरातीच्या (UAE) सुरक्षा पथकाकडे सुपूर्द केले आहे. या आंतरराष्ट्रीय तपासामध्ये इस्रायली गुप्तचर यंत्रणाही सहकार्य करत आहेत.
हे ही वाचा .
Don Film चा Director – टांझानियात बँक कर्मचारी होता- गायिका बहिणीने चित्रपटात आणले
वाड्यात घेतलेल्या बोअरवेल ड्रिल ने Pune Metro Tunnel ला पडले छिद्र

