हुमा कुरैशी आपल्या प्रभावी अभिनया साठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री आहे. Gangs of Wasseypur मधील आभिनयानंतर ती चर्चेत आली. अनेक हिंदी वेब सीरीज व चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर आता हूमा आपला अभिनेता भाऊ साकिब याच्यासोबत निर्मिती क्षेत्रात वळली आहे. Baby Do Die Do तिच्या चित्रपटाचा Teaser नुकताच release झाला.

हुमा कुरैशीची नवी ओळख – निर्माती म्हणून पहिलं पाऊल
बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरैशी हिने चित्रपट निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. तिने आपला भाऊ, अभिनेता साकिब सलीम याच्यासह, Saleem Siblings अशी नावातच बंधुता असलेली स्वतःची प्रोडक्शन कंपनी सुरू केली आहे. ही केवळ एक व्यावसायिक पायरी नाही तर तिच्या आयुष्यातील एक स्वप्न साकार करण्याचा क्षण आहे. हुमा व साकिब यांचा पहिला चित्रपट Baby Do Die Do प्रदर्शना साठी आता सज्ज आहे व त्याचा Teaser नुकताच release झाला आहे.
अभिनय कारकिर्द
हुमा कुरैशी यांनी २०१२ मध्ये Gangs of Wasseypur या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत दमदार पदार्पण केले. पहिल्याच चित्रपटातील त्यांच्या नैसर्गिक अभिनयामुळे त्यांना समीक्षक आणि प्रेक्षक दोघांचीही दाद मिळाली. त्यानंतर Ek Thi Daayan, Badlapur, Jolly LLB 2, Monica, O My Darling, Tarla यांसारख्या चित्रपटांमधून त्यांनी विविध छटांच्या भूमिका साकारल्या. चित्रपटांबरोबरच Maharani सारख्या लोकप्रिय वेब मालिकेतील त्यांच्या प्रभावी अभिनयाने त्यांची एक सक्षम आणि बहुआयामी अभिनेत्री म्हणून ओळख अधिक दृढ झाली. व्यावसायिक आणि आशयप्रधान अशा दोन्ही प्रकारच्या प्रकल्पांमध्ये सहज वावरत, हुमा कुरैशी यांनी समकालीन भारतीय अभिनयविश्वात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे.
“Saleem Siblings” – नावात दडलेला भावनिक वारसा
या कंपनीचं नाव “Saleem Siblings” ठेवलं आहे. या नावामध्ये त्यांच्या बालपणीच्या आठवणी, भाऊ-बहिणीचे नाते, आणि चित्रपटांविषयी असलेलं निरागस प्रेम लपलेलं आहे. हुमा आणि साकिब या कंपनीकडे केवळ व्यवसाय म्हणून नाही, तर आपल्या मनातील स्वप्न साकार करण्याचं माध्यम म्हणून पाहतात. साकीब व हुमाला लहानपणापासूनच World Cinema मधे रुची होती. केवळ व्यावसायिक सिनेमा बनवण्यापेक्षा नवीन विचार मांडणारे सिनेमे बनवण्याकडे त्यांचा कल असेल असे हुमा म्हणाली. Baby Do Die Do हा चित्रपट त्यांची पहीली निर्मिती आहे व यात Huma Qureshi स्वतः मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचा Teaser नुकताच release झाला आहे व त्याला 30 लाख views मिळाले आहेत.

का झाली निर्माती?
“अभिनेत्री म्हणून मला संधी मिळते, पण ती मर्यादित असते. निर्माता झाल्यावर मला स्वतःसाठी आणि इतरांसाठी नवी दारे उघडता येतील.”
असे म्हणत,हुमा कुरैशी ने सांगितले की तिचं ध्येय मोठ्या स्टार्ससोबत फक्त व्यावसायिक चित्रपट करणं नाही, तर नव्या चेहऱ्यांना व अर्थपूर्ण कथांना व्यासपीठ देणं आहे.
काम करण्याची वेगळी पद्धत
हुमा आणि साकिब यांना आपल्या कंपनीला एक चांगलं, सकारात्मक कार्यस्थळ बनवायचं आहे. त्यांनी ठरवलं आहे की कलाकार आणि तांत्रिक टीमला इथे आदर मिळेल, आणि ज्याप्रकारचे अडथळे त्यांना आपल्या प्रवासात आले, ते इतरांना भोगावे लागू नयेत.
हुमा आणि साकिब यांना आपल्या कंपनीला एक चांगलं, सकारात्मक कार्यस्थळ बनवायचं आहे. त्यांनी ठरवलं आहे की कलाकार आणि चित्रपटाचे तांत्रिक काम करणार्या टीम ला ही इथे आदर मिळेल, आणि ज्याप्रकारचे अडथळे त्यांना आपल्या प्रवासात आले, ते इतरांना भोगावे लागू नयेत असे या दोघा भावा बहिनींना वाटते.
पहिला प्रोजेक्ट – “Baby do die do”
निर्माती म्हणून हुमा हिचा पहिला चित्रपट आहे “Baby do die do”.या चित्रपटामुळे हुमा कुरैशीची ओळख फक्त अभिनेत्रीपुरती न राहता, नव्या विचारांची निर्माती म्हणूनही होत आहे.
मराठी दिग्दर्शक व मराठी स्त्री ची कथा
नचिकेत सामंत या मराठी दिग्दर्शकाने Baby Do Die Do चे दिग्दर्शन केले आहे.यापूर्वी’गच्ची’, ‘हबाडी’ यांसारखे दर्जेदार मराठी चित्रपट नचिकेत यांनी दिले आहेत. Crime Comedy Thriller अशा पठडीतील या चित्रपटाचे कथानक “बेबी कर मर कर” (Baby Do Die Do)या मूक बधिर मराठी स्त्री पात्राभोवती फिरते.
Baby Do Die Do चा teaser
नुकताच release झालेला Baby Do Die Do चा teaser gripping thriller पठडीतला वाटत आहे. हुमा कुरैशी यात Title Role मधे प्रभावी अभिनय करताना दिसते. @cinepoliceindia या Insta account वरील हा teaser खाली पहा…
भावनिक पण निर्धारपूर्वक
आपल्या चित्रपट निर्मिती च्या नव्या प्रवासाबाबत हुमा व साकिब दोघेही भावनिक आहेत. ते मान्य करतात की हा निर्णय थोडा धाडसी आहे, पण त्याचबरोबर ते खूप आनंदी आणि आशावादीही आहेत. त्यांच्या मते, हे प्रोडक्शन हाऊस म्हणजे सिनेमाविषयीचं त्यांचं प्रेमपत्र आहे.
इतरांसाठी ही नवे दरवाजे
हुमा कुरैशीचं “Saleem Siblings” हे प्रोडक्शन हाऊस म्हणजे एका अभिनेत्रीच्या संघर्षातून उभं राहिलेलं स्वप्न आहे. तिचा प्रवास एका अभिनेत्रीपासून निर्मातीपर्यंतचा आहे आणि या प्रवासात ती स्वतःसोबत इतरांसाठीही नवे दरवाजे उघडणार आहे हे विशेष
हे ही वाचा:
- ➡️ रणवीर सिंग ची आज्जी एकेकाळी पाकिस्तानची प्रसिद्ध अभिनेत्री होती..
- ➡️या अभिनेत्रीने promise केला होता kiss ..पण नंतर काढला पळ- ५० च्या दशकातील शम्मी कपूर यांचा मजेशीर किस्सा

