मौसमक्रिकेटऑपरेशन सिंदूरक्रिकेटस्पोर्ट्सबॉलीवुडजॉब - एजुकेशनबिजनेसलाइफस्टाइलदेशविदेशराशिफललाइफ - साइंसआध्यात्मिकअन्य

Irfan Khan : loss of film world


इरफ़ान खान : एक थंड डोक्याचा  लुटारू

Written by Avinash Bhanu Asha Ghodke 

Irfan Khan  । Actor । Bollywood । Irfan Khan the late actor who passed away untimely. Irfan was known for his unique underplay style.  He also acted in Hollywood films.  Steven Spielberg’s Jurassic Park was one of his remarkable  Hollywood film. 

मोबाईल नव्हते तेंव्हा. दूरदर्शन समोरच्या अपंगाच्या टेलिफोन बूथवरून फॅशन फोटोग्राफर सुबी सॅम्युएल ला फोन लावला. तो म्हणाला मी सद्ध्या पोर्टफोलिओ करत नाही ..तू माझ्या असिस्टंटला भेट ,ती चांगले काम करते. सात बंगल्याला चक्क ‘अविनाश’ नावाचीच बिल्डिंग. मी सुबी च्या असिस्टंट मुलीसमोर बसलो होतो. माझ्याकडे पहात ती म्हणाली “ तू त्या इरफान खान सारखा दिसतोस जरा !”  ( डोळ्यांबद्ल असावं) मला पटकन इरफान आठवला नाही तेंव्हा. पुढे स्टार टि व्हि वर ‘एक शाम की मुलाकात’ या टेलिफिल्म मधे त्याची एॅक्टिंग बघून मी त्याचा फॅन झालो. किराणा दुकान चालवणार्या भोळसट वाण्याचा रोल केला होता इरफ़ान ने. नवीनच लग्न झालेलं. चाळीत तळ मजल्यावर भाड्याचं घर . पहिल्या मजल्यावर राहणार्या चाळ मालकाची ‘चंट’ अशी समाज प्रतिमा असलेली बायको. दुकानात झालेल्या गिर्हाईका सोबतच्या वादाने अस्वस्थ झालेला वाणी अचानक दुपारी घरी येतो . चाळमालकिन वरच्या मजल्यावरून वाण्याला आवाज देवून सांगते  ‘तुझी पत्नी बाजारात गेलीय! तिला यायला अर्धा तास लागेल! दरम्यान मी खाली येवून तुला भेटते, मला तुला काही सांगायचय!’ 
 वाण्याची उडालेली धांदल ,मनाची घालमेल , भीती हे सर्व भाव इरफ़ान ने अप्रतिम वठवले. बेड ची चादर सारखी करणं, सेंट चे फवारे मारणे ,केस सावरणे .. असं चालू असताना घरमालकिन येते . तो तिला बेडवर बसायला सांगतो .. ती ही बसते.. वाण्याच्या मनात गोंधळ सुरू असतो आणि घरमालकिन सांगते .. “ तू दुकानावर गेल्यावर दुपारी तुझ्या बायकोला भेटायला कुणीतरी येतं .. मागच्या दाराने .. हेच सांगायचं होतं“ इरफान ने प्रतिक्रिया म्हणून राग , दु:खं असे टोकाचे भाव दाखवले नाहीत चेहर्यावर. फक्त विस्मय आणि गोंधळ ..  मला आवडलेली इरफ़ान ची ही सर्वात आवडती भूमिका .  
इरफ़ान संयमी अभिनेता होता. “लूट” या  ब्रँड नावाची रेडिमेड कपड्यांच्या दुकानांची शृंखला मुंबईत सुरू होणार होती. गोरेगावच्या मुख्य दुकानाच्या उद्घाटनासाठी  इरफ़ान ला घेवून live advertising ची एक कल्पना योजली होती.  इरफ़ानने आपली कार दुकानाची काच फोडून आत घुसवली आणि शांतपणे दुकानातले कपड़े लुटले. हा प्रसंग त्याने convincingly केला. हे असे करणे फक्त त्याच्या व्यक्तिमत्वालाच शोभुन दिसले. तो lovable villain होता . आपल्या चाहत्यांच्या मनात ही असच घुसून त्यांना थंडपणे लुटलं त्याने. प्रेक्षकांबरोबरचा त्याचा कनेक्ट ज़बरदस्त होता .. विशेष म्हणजे हा कनेक्ट कालातीत राहणार आहे. 
आपल्याला आवडलेली इरफानची एखादी भूमिका जरूर सांगा 
In a low angle shot Irfan Khan posing as a Bandit .He is holding a rifle in his hand and letting the barrels rest on his arm

About The Author

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment