Laman Nomadic Tribe: जगज्जेता सिकंदर लमाणांना युरोपात घेवून गेला होता

Photo copy of a press article about Gypsy Tribe called Lamaan. There is a picture of tribal women in there traditional costumes.

लमाण
आदीम संस्कृतीचे भोई

Press Article on Indian Tribe 

Written by Avinash Bhan Asha Ghodke  

Laman ही भारतीय भटकी जमात Europe मधे Rumani Gypsy म्हणून अनेक शतकांपासून रहात आहे. जगज्जेता Roman सम्राट  Alexander (सिकंदर) भारतातून परतताना इथले माल वाहन व्यावसायिक लमाण आपल्या सोबत घेवून गेला आणि ते जगभर विखुरले. या Laman Tribe ची सद्यस्थिती चे दर्शन सदर लेखात होते. या विषया वरील चित्रपटाच्या गीत लेखना निमित्त गीतकाराने घेतलेला हा लमाण समाजाचा संक्षिप्त वेध आहे.

   Laman विषयावरील चित्रपटासाठी गीत लेखन संधी

एका निर्मात्याचा फोन आला. म्हणाले नविन चित्रपटाची गाणी लिहायची आहेत  . मी जावून भेटलो. ते म्हणाले ‘लमाण’ या भटक्या जमातीवर चित्रपट करतोय. लमाणांच्या आयुष्याची भेदकता व भकासता दर्शविणारी गीते हवीत.उपेक्षित व दुर्लक्षीत अशा भटक्या जमातीचं दु:खं समाजापुढे गीतातून मांडायची संधी मला मिळत होती. मी मुंबईसारख्या महानगरात लहानाचा मोठा झालेला. लमाणांबद्दल मला वरवरची माहिती होती.कधी गावाकडे झालेल्या प्रवासात गाडीच्या खिडकीतून पाहीलेली भटक्या जमातींची पालं. मळक्या चिंधी-कापडाच्या तंबू खाली एखादी उन्हाने रापलेल्या कांतीची ठसठशीत नाकेली स्त्री. चेहरा व हात गोंदलेले. हातभर हस्तिदंती पांढर्या बांगड्या. चांदीचे बाजुबंद.छल्ला. कानात लटकणारी भली मोठी झूमर व इतर दागीने. तिचं विटा दगडांच्या चुलीवर रांधणं. बाहेर बाजेवरकलात्मकतेनं शिवलेल्या चिंधीच्या गोधडीवर एखादा हडकलेला वृद्ध विडी ओढत बसलेला. उघडी-बोडकी पोरं सायकल टायरची गाडी करून खेळताना वगैरे असे ठरलेलं चित्र सर्रास दीसे. कधी रस्त्याने स्थलांतर करणारा तांडा ही दीसे. त्याना पाहून ‘ घोडी-गाढवावर संसार लादून हे लोक आता कुठे जाणार’ असा प्रश्न मनात येई.

चित्रपटांमधे लमाणांची ‘आनंद यात्री ‘ अशी प्रतिमा

मी पाहीलेल्या या दृश्यांपलीकडे भटक्या जमातींबद्दल वास्तव अशी माहीती माझ्याकडे नव्हती. हींदी चित्रपटांतून भटक्या वा बंजारा समाजाला ‘आनंद-यात्री’ अशा रूपात गाणी गाताना व नृत्य् करताना दाखवतात. अशी so called बंजारा गाणी करमणूकीच्या व चित्रपटातील relief point च्या अनुषंगानेच लिहीली व चित्रित केली जातात. अर्थात हे सर्व references मला लमाणांचं दुःखं मांडायला अपूरे व निरूपयोगी होते.भटक्या जमाती विषयी एरवी आपण तसा गांभिर्याने विचार तरी कुठे करतो. या वेशीबाहेरच्या उपेक्षित समाजाची माहीती आपल्याला माध्यमांकडून वा शिक्षणातून ही मिळत नाही. ‘भटके’ असं शेलकं विशेषण लावून आपण त्यांना विसरून जातो.

गोवा सरकारच्या मंत्र्यांची लमाण विरोधी भूमिका 

   वर्तमानपत्रात नुकतीच एक बातमी वाचली होती. “लमाणी लोकांना गोवा राज्यातून बाहेर फेकून द्या” असं वादग्रस्त विधान गोव्याच्या एका मंत्र्यांनी केलं होतं.
फक्त गोवाच नाही पण जगात जिथे जिथे लमाण आहेत तिथे त्यांच्याकडे गुन्हेगारी जमात म्हणून पाहिले जाते. नागरीकत्वाच्या कागदपत्रांचा अभाव, अस्थिर जीवन यामुळे एक अविश्वसनीयतेचे करडे वलय या जमाती भोवती आहे. लमाणांच्या गुन्हेगारी वृत्तींना त्यांची गरीबी व ओळख हीनता (Identity crisis) जबाबदार आहे. 
 
तळहातावर मेंदीचा छाप काढून देणार्या लमाणी स्त्रीया मी मुंबई व गोव्याच्या समुद्र कीनारी पाहील्या आहेत. लमाणी हे मूळचे मेवाड,राजस्थानचे. भटक्या बंजारांच्या व्यवसायनुरूप पडलेल्या जातींपैकी एक. लमाण हे माल वाहतूक करणारे. एकेकाळी मालवाहतुकीसाठी जग फीरणार्या स्वशिक्षित व अनुभवी लमाणांचे तांडे म्हणजे भारताच्या व्यवसाय-उदीम वाहीन्या होत्या.मध्ययुगीन फौजांच्या अन्नरसदी पोचवण्याचे कामही ते करीत.
 

लमाणांसाठी Europe Russia मधे विशेष कायदे

 
          जगज्जे्ता सिकंदर भारतात पराभूत झाला पण इथून जाताना तो वैश्विक संस्कृतीच्या या लमाणांना सोबत घेवून गेँला. आज युरोपात हे लमाणी लोक रूमानी जिप्सी (Romani Gipsy) म्हणून ओळखले जातात.
भारताचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या पुढाकाराने युरोपीय लमाणांचा सर्वे‌  करवून घेतला होता.या Survey नंतर केलेल्या कायद्युयानुसार युरोपातील लमाणांना संपूर्ण युरोपभर प्रवास करण्याची कायदेशीर मुभा असते. याहीपुढे काही युरोपीय देशांत तसेच रशियात लमाणांना संसदेत प्रतिनिधित्व ही दीले गेले आहे.
 

आजचे भारतीय लमाण 

 
हे पाहता भारतातील लमाण अतीशय उपेक्षित जीणे जगत आहेत. भारतीय लमाण बेरोजगारी व दारीद्र्याने ग्रासलेले आहेत. अशिक्षित असल्यामुळे कायदेशीर बाबींचा व संवैधानिक हक्कांचा पाठपुरावा ते करू शकत नाहीत. कायमस्वरूपी पत्ता दाखवता येत नाही तर अस्तित्वाचे इतर पुरावे कुठून व कसे आणनार. Identity Crisis कींवा अस्तित्व हीनतेच्या मूलभूत प्रश्नानी लमाणांचे जगणे अदृश्य पातळीवर नेवून ठेवले आहे. या अदृश्यतेत ते भाकरीचा शोध घेत वणवण फीरत असतात. या वणवणीमधेही या अस्तित्वहीन जमातीने त्यांच्या पूर्वजांनी दीलेली विश्वसंस्कृतीची कास घट्ट धरून ठेवली आहे. ज्या सत्तेची चाकरी केली त्यांचा धर्म त्यांनी घेतला. हींदु झाले ,मुस्लिम झाले,ईसाई झाले पण अतःकरणाने ते वैश्विक राहीले. मुसलमान लमाण तर विवाहप्रसंगी सरस्वतीची पूजा करतात. लमाण हे खरे जीवनवादी आहेत.त्यांना आपल्या वैश्विक संस्कृतीचा अभिमान आहे. पालासमोरच्या हवजाच्या काठीवर ते अस्मितेची ध्वज पताका अभिमानाने फडकावतात. वि.सं.खांडेकरांच्या ‘निशान’या लघुकथेत आपल्याला ही ध्वजपताका दीसलेँली आहेच.
 

‘धुंड ‘ गीते लिहिणारे लमाण 

 
              आपण ‘धुंद-गीते लिहीतो पण लमाण लोक मानवाच्या आदीम संस्कृतीचा वेध घेणारी ‘धुंड-गीते’ लिहीतात. मी ही ठरवले; आपण लमाणांच्या अस्तित्वहीनतेचा शोध घेणारे त्यांच्या आंतरीक दु:खाचा धांडोळा घेणारे ‘धुंड-गीत’ लिहायचे. मला यावेळी वि.वा.शिरवाडकरांचे ‘नटसम्राट’नाटकातील वाक्य् आठवले.
 
….”आम्ही (नट) फक्त् लमाण !…इकडचा माल तिकडे नेवून ठेवणारे!” ..
 
लेखकाने लिहीलेला आशय वा भाव प्रेक्षकांपर्यंत ‘जशाचा तसा पोचवायची’ महत्वाची जबाबदारी नटावर असते  या अर्थाने शिरवाडकरांनी हे वाक्य लिहीले आहे. डॉ.श्रीराम लागूंनी ‘नटसम्राट’चे अनेक प्रयोग केले. या वाक्याच्या संदर्भानेच लागूंनी आपल्या आत्मचरीत्राचे नावही ‘लमाण’ असे ठेवले.
            विश्वात्मकतेचा मूलभूत माल इकडून- तिकडे; अर्थात गतयुगातून या नवयुगाकडे लमाणांनी आणलाय. आणताना त्यांनी या मालाची काळजीपूर्वक जोपासना व संवर्धन केले आहे. हा ‘वैश्विकतेचा’ आदीम व अस्सल माल अजून आपण त्यांच्याकडून रीसीव केलेला नाही. मालाचे पार्सल घेवून लमाण आपल्या दारात तिष्ठत उभे आहेत ; आणि आपण त्यांना विचारतोय “तुम्ही कोण?”
आपल्या या प्रश्नावर निरूत्तर होत लमाणांचं मन काय म्हणत असेल…?…मी गीताच्या ओळी लिहील्या…
देह दीला देवा तू रं…वळखी ना दुनिया
मानूसं की जनावर…नाव माझं सांगना
 

हे ही वाचा : मेकअप कलेचे दादा :पंढरीदादा legendary makeup artist of Bollywood

About The Author

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment