Avinash Ghodke

Screenwriter and Lyricist with 20 years of experience in Bollywood and Marathi cinema.His creative writing examines the contradictions of lived experience, while his journalism uncovers humanism beneath headlines.

सुधीर फडके आणि गोजाबाई अवॉर्ड…ललित लेख

सुधीर फडके आणि गोजाबाई अवॉर्ड ..


            
चेम्बुर ला सम्राट अशोक नगर मध्ये आईच्या मामांची बंगली होती . निक्षे मामा
एमटीएनएल मध्ये अधिकारी होते. सगळे त्यांना अण्णा म्हणायचे . आम्ही
लहानपणी आई बरोबर वरचेवर अण्णांकडे जायचो .अण्णांची चार मुलं आपल्या
सख्ख्या बहिणीला छोटी अक्का म्हणायचे व आमच्या आईला मोठी अक्का म्हणायचे.
आईची आई लहानपणीच गेल्यामुळे आमच्या आईला अण्णांच्या आईने म्हणजे आमच्या
आईच्या आज्जीने ; गोजाबाई ने लहानाची मोठी केली. आमची आई अण्णांच्या घरीच
लहानाची मोठी झाली .

                   फटकळ आणि तामसी स्वभावामुळे  गोजाबाईचा  तरूणपणी गावात आणि कुटुंबात
मोठा धाक होता असे ऐकून होतो . आम्ही अण्णांकडे जायचो तेव्हा आम्हाला
आमच्या पणजीचा धाक कधी वाटला नाही. खिडकीजवळच्या पलंगावर शांतपणे मांडी
घालून ताठ बसलेली गोजा-अज्जी अजून मला आठवते. लहानखुरी चण, छोटा गोल
सुरकुतलेला गोरा चेहरा आणि घट्ट बांधलेला छोटासा पांढऱ्या केसांचा बुचडा.
गोजा आज्जी ला आताशा नीट ऐकू येत नव्हत.वयपरत्वे  दृष्टीहि थोडी अंधुक झाली
असावी. पण गोजा आज्जी पलंगावर ताठ बसून आजूबाजूच्या हालचालींचा आदमास घेत
राही.

                  अण्णांच्या बंगली समोरील रस्त्यापलीकडे झोपडपट्टी होती. कुठल्याश्या
सणानिमित्त रस्त्यावर लाऊडस्पीकर लावला होता. रोज सकाळी  न चुकता सुधीर
फडकेंच्या गाण्यांची रेकॉर्ड तिथे लावली जात होती . गोजा बाई काही दिवस
पलंगावर ताठ बसून आवाजाचा वेध घेत होती. शेवटी एक दिवस न रहावून तिने रमा
दादा (अण्णांचा मुलगा) ला जवळ बोलवून विचारले ..” रोज सकाळ सकाळी कोण बाबा
गागत असतोय रे ??” . आज्जी आवाजामुळे त्रासली असावी असे रमा दादाला वाटले.
मिश्कील स्वभावाच्या रमा दादाने गमतीने आज्जीला वेगळीच माहिती पुरवली
..म्हणाला ” आगं आज्जी ..गरीब माणूस आहे ..घरदार नाही ..खायला नाही
..म्हणून बसतो सकाळी गाणं म्हणत रस्त्यावर ..काय करणार !!”   गोजा आज्जी
शांत झाली क्षणभर  विचार करून  रमादादाला म्हणाली ..” पण गळ्यात गोडवा आहे
रे त्याच्या .. काही तरी देत जा त्याला ..!!”  

             संगिताचं कुठलाही ज्ञान नसलेल्या  …कानाने अधू झालेल्या
..सत्तरीतल्या अशिक्षित गोजा आज्जीने सुधीर फडकेंच्या गायकीला हि दादच दिली
होती.  सुधीर फडके हे सुरांमध्ये रमलेले फकीरच होते. त्यांच्या गायकीत
सुफी गायकीची आर्तता होती. या “गोड गळ्याच्या बाबा ला” आपण काही द्यावे
एवढी आपली दानत कुठली . खोल मनात डोकावून   त्यांच्या गाण्यांचे सूर ऐकू
येत आहेत का याचा आदमास तरी घेऊ या ..

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment