हा बदल का महत्त्वाचा आहे?
मोठ्या भारतीय कुटुंबांमध्ये वारसा वाटपाच्या प्रक्रियेत अनेक अडचणी येतात. नवीन Bank Nominee Rules 2025 मुळे ही प्रक्रिया अधिक स्पष्ट आणि पारदर्शक होणार आहे. या बदलाचे प्रमुख फायदे:
- एका खात्यासाठी जास्तीत जास्त चार नॉमिनी ठेवण्याची परवानगी
- वारसा वाटप अधिक स्पष्ट
- कुटुंबातील वाद टळतात
- बँकेची प्रक्रिया अधिक जलद
नॉमिनी कसे नोंदवायचे? (How to Add Four Nominees in Bank Account)
- नवीन खाते उघडताना नॉमिनींची नावे फॉर्ममध्ये लिहिता येतात : आपण जेंव्हा नवीन खाते उघडाल तेंव्हा फॉर्म मधे NOMINEE या रकान्यात 4 Nominees नमूद करू शकता.
- जुन्या खात्यांसाठी बँकेत जाऊन Nominee Update Form भरावा लागतो: जर तुम्हाला तुमच्या जुन्या खात्याला चार nominee नोंदवायचे असतील तर बॅंकैत सदर संदर्भात अर्ज भरून आपण ही नोंदणी करू शकता.
- प्रत्येक नॉमिनीची ओळखपत्र माहिती आणि जन्मतारीख द्यावी लागते: वरील दोन्ही पद्धती मधे आपल्याला Nominee व्यक्तींचै आधार कार्ड,पॅन कार्ड,जन्म तारीख चार तपशील जोडावा लागेल
- वाट्याचे प्रमाण (Share Percentage) नमूद करता येते: आपण Nominees मधे वाट्याचे percentage निश्चित करून तसे अर्जात नमूद करू शकता.
लॉकरसाठीही नवे नियम
नवीन RBI Locker Nominee Rules 2025 नुसार, बँक लॉकरसाठीही आता चार नॉमिनी (Four Nominees for Bank Locker) ठेवता येतात. त्यामुळे मौल्यवान वस्तूंचे उदाहरणार्थ सोने,चांदी, दागिने व जड जवाहिर अशा मौल्यवान वस्तूंचे वारसा हस्तांतरण अधिक सुलभ होईल.
ग्राहकांनी काय करावे?
- सर्व खात्यांमधील नॉमिनी माहिती तपासून पहा
- गरज असल्यास नवीन नॉमिनी जोडा
- लॉकर असल्यास त्यातील नॉमिनी माहिती अपडेट करा
- कुटुंबातील सदस्यांना नॉमिनी माहिती सांगा
थोडक्यात
RBI Banking Regulation Amendment 2025 नुसार बँक खाते आणि लॉकरमध्ये चार नॉमिनी ठेवण्याची परवानगी ही ठेवीदारांसाठी महत्त्वाची आणि उपयुक्त सुधारणा आहे. यामुळे सुरक्षा, पारदर्शकता आणि वारसा प्रक्रिया यापुढे सुलभ होईल.
FAQ – चार नॉमिनी नियम (Four Nominees in Bank Account- Rule)
1) आता बँक खात्यात किती नॉमिनी ठेवता येतात?
जास्तीत जास्त चार नॉमिनी (Up to Four Nominees) ठेवता येतात.
2) Bank Nominee Rules 2025 सर्व बँकांवर लागू आहेत का?
होय. भारतातील सर्व राष्ट्रीयकृत, प्रायव्हेट, ग्रामीण आणि सहकारी बँकांवर हे नियम लागू आहेत.
3) नॉमिनी बदलणे शक्य आहे का?
हो. खातेदार कधीही Nominee Change Form भरून नॉमिनी बदलू किंवा नवीन नॉमिनी जोडू शकतो.
4) लॉकरसाठीही Four Nominees ठेवता येतात का?
होय. लॉकरसाठीही हेच नियम लागू आहेत.







