Avinash Ghodke

Screenwriter and Lyricist with 20 years of experience in Bollywood and Marathi cinema.His creative writing examines the contradictions of lived experience, while his journalism uncovers humanism beneath headlines.

Jaya Bachchan on marriage: लग्न संस्थेला ‘Outdated’ का म्हणाल्या जया बच्चन? Live in समाज मान्य होत आहे?

जया बच्चन यांनी लग्न संस्था outdated झाली आहे असे जाहीर वक्तव्य केले आहे. शिस्तप्रिय व तापट बाई अशा त्यांच्या प्रतिमेस त्यांचे हे विधान विरोधाभासी वाटते. पुण्यासारख्या सांस्कृतिक केंद्र मानल्या गेलेल्या शहरात ही एकटे जेष्ठ नागरिक Live in मधे रहात आहेत.समाज खरच लग्न संस्था अमान्य करत आहे का?

रूढीवादी वाटणार्या Jaya Bachchan on Marriage:

मुंबईतील We The Women या बरखा दत्त यांच्या कार्यक्रमात जेष्ठ अभिनेत्री आणि राज्यसभा सदस्य जया बच्चन यांनी केलेले विधान सध्या चर्चेत आहे. पत्रकार बर्खा दत्त यांच्याशी संवाद साधताना त्यांनी लग्न ही “outdated institution” असल्याचे सांगितले. तसेच त्या आपली नात नव्या नवेली नंदाहिने ही लग्न करू नये असे त्यांना वाटते असे त्या म्हणाल्या.

“रूढीवादी खडूस बाई अशी जया बच्चन यांची जनसामान्यांमध्ये तयार झालेली इमेज आणि लग्न संस्थेबद्दलचे त्यांचे Radical व Progressive विचार — या दोन्ही  गोष्टी अगदी  परस्परविरोधी  वाटत आहेत.”

Jaya Bachchan on marriage: लग्न संस्थेला 'Outdated' का म्हणाल्या जया बच्चन? Live in समाज मान्य होत आहे?

त्यांच्या या विधानामुळे समाजात, लग्न संस्थेबद्दल नव्याने चर्चा सुरू झाली आहे. 

काय म्हणाल्या जया बच्चन?

Jaya Bachchan on Marriage -जया बच्चन यांच्या मते, एखाद्या नात्याचे मूल्य कायदेशीर शिक्का किंवा समाजाच्या पारंपरिक परिभाषा ठरवत नाही. समाज मान्यते पेक्षा नात्यातील भावनिक सुरक्षितता, समाधान आणि समजुतदारपणा यांना अधिक महत्त्व आहे.

त्यांनी स्पष्टपणे सांगितले की आजच्या जगात व्यक्तीचे स्वतःचे सुख आणि वैयक्तिक स्वातंत्र्य हे समाजाच्या त्यांच्या कडून असलेल्या अपेक्षांपेक्षा जास्त महत्त्वाचे आहे.

आधुनिक काळात लग्न संस्था: अस्तित्वावर प्रश्नचिन्ह?

भारतीय समाजात लग्न ही शतकानुशतके चालत आलेली परंपरा आहे. पण सध्याच्या बदलत्या सामाजिक वास्तवामुळे अनेक तरुण लग्नाला अनिवार्य न मानता पर्याय म्हणून पाहत आहेत.

तरुणांचा बदललेला दृष्टिकोन

  • भावनिक स्वातंत्र्य आणि स्वतंत्र ओळख
  • करिअर आणि वैयक्तिक प्रगतीला प्राधान्य
  • बंधनांपेक्षा समविचारी साथीदाराला महत्त्व
  • नात्यातील emotional bonding अधिक महत्त्वाची
  • कायदेशीर validation ऐवजी भावनांना प्राधान्य

या पार्श्वभूमीवर जया बच्चन यांचे विधान हे फक्त वाद निर्माण करणारे नसून, बदलत्या मूल्यांचे प्रतिबिंब आहे.

“माझी नात नव्या नवेली हिने ही लग्न करू नये” — जया बच्चन

लग्न संस्था खरंच ‘outdated’ होत चालली आहे का?

लग्न आजही अनेकांसाठी स्थैर्य, सुरक्षा आणि कुटुंबाला आधार देणारी अशी संस्था आहे. पण त्याच वेळी modern समाजात याकडे जोखड म्हणून पाहणारा एक मोठा वर्ग आहे. :

  • घटस्फोट
  • live-in relationships
  • करिअर-फर्स्ट mindset
  • मानसिक आरोग्यावरील जागरुकता

ही चिन्हे सूचित करतात की समाज परिवर्तनाच्या टप्प्यातून जात आहे. लग्न संस्था संपुष्टात येत नाहीये; तर ती संस्था रूपांतरित होत आहे. खुद्द Supreme court ने आपल्या निकालात दोन अडल्ट व्यक्तींनी परस्पर संमतीने लग्नाशिवाय Live-in relationship मधे राहणे पूर्णपणे कायदेशीर आहे असे म्हटले आहे.

तरूणांबरोबरच जेष्ठांचे ही रूढींविरुद्ध सिमोलंघन

पुण्यातील माधव दामले हे Madhav Damle foundation द्वारा Happy Seniors ही संस्था चालवतात जेथे जेष्ठ नागरिकांचे Live -in नात्यांसाठी कायदेशीर करार करून दिले जातात . या संस्थेने आत्तापर्यंत 80 जोडप्यांना याबाबत मार्गदर्शन केले आहे.

कायदेशीर बंधन विरुद्ध भावनिक नाते

जया बच्चन यांनी सांगितलेली प्रमुख गोष्ट म्हणजे—कायदेशीर ओळख वा मान्यता नात्याची गुणवत्ता ठरवत नाही.

नात्याचे खरे मूल्य हे या गोष्टींवर टिकून असते:

  • आदर
  • संवाद
  • भावनिक सुरक्षा
  • स्वातंत्र्याला जागा
  • समजुतदारपणा

उपसंहार

Jaya Bachchan on marriage जया बच्चन यांचे हे विधान पारंपरिक विचारांना आव्हान देणारे असले तरी आजच्या सामाजिक वास्तवाशी जोडलेले आहे. व्यक्तीचे सुख, मानसिक समाधान आणि स्वतंत्र ओळख यांना प्राधान्य दिल्या जाणाऱ्या काळात लग्न संस्थेकडे नव्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.

लग्न outdated आहे का? की त्याची व्याख्या बदलत आहे — हा विचार प्रत्येकाने आपापल्या अनुभवातून करणे आवश्यक आहे.

जया बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चन व सून ऐश्वर्या राय हे Grey Divorce घेत आहेत अशी चर्चा काही दिवसांपूर्वी मीडिया मधे होती.या पार्श्वभूमीवर जया बच्चन यांचे हे वक्तव्य व्यक्तीवादाचा पुरस्कार करणारेच म्हणावे लागेल..

FAQ

लिव्ह-इन रिलेशनशिप म्हणजे काय?

लग्नाचा कोणताही कायदेशीर किंवा धार्मिक विधी न करता, दोन प्रौढ व्यक्ती संमतीने पती-पत्नीसारखे एकाच छताखाली एकत्र राहतात, त्याला लिव्ह-इन रिलेशनशिप म्हणतात.

भारतात लिव्ह-इन रिलेशनशिप कायदेशीर आहे का?

होय, भारतात लिव्ह-इन रिलेशनशिप पूर्णपणे कायदेशीर आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम २१ (जीवितेचा आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा हक्क) अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाने याला कायदेशीर मान्यता दिली आहे.

लिव्ह-इन पार्टनरला पोटगी (Maintenance) मागण्याचा अधिकार आहे का?

होय, जर एखादे जोडपे दीर्घकाळ एकत्र राहत असेल, तर महिला भागीदार कायदेशीररित्या तिच्या जोडीदाराकडून पोटगी मागू शकते

लिव्ह-इन पार्टनरवर घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल होऊ शकतो का?

होय, घरगुती हिंसाचार कायदा २००५ (Domestic Violence Act 2005) अंतर्गत लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या महिलेला तेच अधिकार मिळतात जे विवाहित महिलेला मिळतात. हिंसाचार किंवा छळ झाल्यास महिला तक्रार करू शकते.

लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये जन्मलेल्या मुलांचे कायदेशीर हक्क काय आहेत?

या नात्यातून जन्माला आलेली मुले पूर्णपणे कायदेशीर (Legitimate) मानली जातात. त्यांना त्यांच्या आई-वडिलांच्या संपत्तीत वारसाहक्क मिळवण्याचा पूर्ण अधिकार असतो.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

3 thoughts on “Jaya Bachchan on marriage: लग्न संस्थेला ‘Outdated’ का म्हणाल्या जया बच्चन? Live in समाज मान्य होत आहे?”

  1. अगदी बरोबर आहे, समाज परिवर्तन होत आहे

    Reply

Leave a Comment