Metro 2B line Kurla Update : कुर्ल्यातल्या जुन्या हलाव पूलावरून Metro 2B line ची मेट्रो धावणार आहे. पण हे साधं वाटणारं काम प्रत्यक्षात अभियंत्यांसाठी डोकेदुखी ठरलं होतं कारण जवळील विमानतळाचे सुरक्षा नियम पाळत जुन्या हलाव पुलावरून जाणार्या Metro 2B line ची उंची कमितकमी ठेवण्याचे Challenge अभियंत्यांपुढे होते.
नेमकं अवघड काय होतं?
विमानतळ सुरक्षा नियम, खाली जुना Halav Bridge आणि वाहतूकीची सुरक्षा जोखीम अशा तिहेरी आव्हानाला अभियंत्यांना सामोरं जावं लागलं. हा हलाव पुलाचा परीसर विमानतळाच्या ‘फनेल झोन’मध्ये येतो. म्हणजे विमानं सुरक्षित उडू शकतील, यासाठी इथे कुठल्याही नवीन बांधकामांच्या उंचीवर बंधन आहे.
वर जास्त जाता येत नाही. खाली जुना हलाव पूल(Halav Bridge)आहे व त्यावरील रहदारी सुरक्षित ठेवायची होती तसेच हलाव पुलाच्या खालून ही जाणारी सततची वाहतूक सुरू ठेवायची होती. थोडक्यात, अभियंत्यांना या तिन्ही गोष्टींमध्ये समतोल साधत Metro 2B line चा मार्ग तयार करायचा होता .
हा प्रश्न सोडवला U shape Girder वापरून
इथे अभियंत्यांनी केलेले खास तांत्रिक नियोजन म्हणजे ‘यू-शेप गर्डर’चा वापर. साधारणपणे मेट्रोचे ट्रॅक ज्यावर बसतात, ते गर्डर सरळ पट्ट्यासारखे असतात. पण याच गर्डर ना दोन्ही बाजूंनी कठड्या सारखे वर येणारे extension आले की यांचा आकार इंग्रजी U अक्षरा सारखा होतो. U-Girder हे तुलनेने कमी वेळेत install होतात.पण या ठिकाणी याची मुख्य उपयुक्तता ही होती की Flat girder पेक्षा हे U-Girder कमी उंची व्यापतात . इथे ‘U’ आकार वापरून संपूर्ण रचनेची उंची काही सेंटीमीटरनी कमी केली गेली. हलाव पूल आणि मेट्रो मार्गिकेत केवळ ३.५ मीटर अंतर आभीयंत्यांना ठेवता आले . हे शक्य झालं ते याच ‘U’ shape Girder मुळे.
Halav Bridge वर काम कसं पार पडलं? MMRDA च्या खालील X account link वर पहा Metro 2B line Kurla Update Video..
ही प्रत्यक्ष अंमलबजावणी रोमांचक होती. हलाव पुलावरील व वाहतूक थांबवणं शक्य नव्हतं, म्हणून हे काम रात्रीच्या वेळी हाती घेण्यात आलं होतं असं आपल्याला वरील Metro 2B line Kurla Update Video मधे दिसत आहे. २१ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास, तब्बल ५०० मेट्रिक टन क्षमतेची क्रेन वापरून प्रत्येकी २० मीटर लांबीचे दोन U-Girder अचूक जागी बसवण्यात आले . या कामादरम्यान अवजड वाहतूक दुसऱ्या मार्गावर वळवण्यात आली होती .
Metro 2B line मुळे पूर्व-पश्चिम connectivity वाढणार
हे महत्वाचे काम पूर्ण झाल्यामुळे Metro 2B line चे शेवटच्या टप्प्यातील उर्वरित काम आता वेगानं होईल. विशेष म्हणजे, याच हलाव पुला शेजारी असलेलं एस.जी. बर्वे मार्ग मेट्रो स्थानक विमानतळाच्या उंचीच्या मर्यादेमुळे एकाच स्तरावर (सिंगल लेव्हल) बांधलं जात आहे . या Metro line मुळे भविष्यात BKC, कुर्ला आणि चेंबूरमधील लाखो प्रवाशांचा प्रवास सुखकर होईल व पूर्व- पश्चिम connectivity वाढणार आहे.
Mumbai Metro ची Metro 2B line ही पूर्व (मानखुर्द,मंडाले)व पश्चिम(MIDC,अंधेरी)उपनगरांना जोडणारी महत्वाची मेट्रो लाईन आहे. कुर्ला व चेंबूर भागातील रहिवासी या प्रलंबित Metro लाईन च्या पूर्णत्वाच्या प्रतिक्षेत आहे जे लवकरच होईल अशी आशा आहे. Metro 2B line Kurla update नंतर पूढील महत्वाच्या update लवकरच आम्ही प्रकाशित करू…


Great
👍