शिवाजी नगर ते स्वारगेट या भूमिगत Pune Metro मार्गावर शुक्रवार पेठ परिसरामधे आचानक पाणि गळती होत असल्याचे सुरक्षा अधिकार्यांच्या लक्षात आले. हे पाणि मेट्रो टनल ला बोअरवेल ड्रील ने पडलेल्या छिद्रातून येत होते . (Pune Metro Tunnel leakage)
Pune – पुण्याच्या शुक्रवार पेठेतील श्री तुषार मोठे यांचा वाड्याचे बांधकाम सुरू असताना त्यांनी वाड्यामध्ये पाण्यासाठी बोअरवेलचे ड्रिल मारल्यामुळे हा प्रकार घडल्याचे लक्षात येताच अधिकार्यांनी खडक पोलिस स्टेशन मधे तक्रार दाखल केली.
खडक पोलिस स्टेशन च्या अगदी समोरच हे बांधकाम सुरू होते हे विशेष. या बांधकामा अंतर्गत मारलेले हे ड्रिल थेट १०० फूट खाली जावून त्याने वाडयाखालून जाणार्या मेट्रो टनल ला ६ इंची छिद्र पाडले होते.
सध्या सदर छिद्र सिमेंट कॉंक्रिट टाकून बंद करण्यात आले आहे. तसेच पुणे मेट्रो अधिकार्यांनी वाड्याचे मालक श्री तुषार मोठे व कंत्राटदार यांच्या विरुद्ध खडक पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
ही बाब वेळीच लक्षात आली नसती तर मोठा अपघात होण्याची शक्यता होती. भूमिगत मेट्रो ज्या भागातून जाते त्या भागातील रहिवाशांना कुठलेही बांधकाम करण्या आधी परवानगी घ्यावी लागते.अशी परवानगी श्री तुषार मोठे यांनी घेतली नव्हती असे निदर्शनास आले आहे.
Pune Metro Tunnel leakage -घटना क्रम
महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन ने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, ही घटना १४ मार्च 2026 रोजी शिवाजी रोडवरील खडक पोलीस चौकीच्या समोरील एका निवासी प्लॉट जवळ (घर क्र. ४१५) घडली. जुना वाडा पाडून येथे नवीन बांधकाम सुरू केले गेले होते. इथे बोअरवेल खोदत असताना ड्रिल थेट ६० ते १०० फूट खाली असलेल्या मेट्रोच्या बोगद्यापर्यंत पोहोचले आणि बोगद्याच्या काँक्रीट अस्तराला (Lining) त्याने छिद्र पाडले.
ऑपरेटर भूषण बरिंगे यांची सतर्कता
स्वारगेट आणि मंडई स्थानकांदरम्यान बोगद्यात अचानक पाणी साचत असल्याचे ऑपरेटर भूषण बरिंगे यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने नियंत्रण कक्षाला संपर्क केला. मेट्रोच्या Technical Team ने घटना स्थळाला ताबडतोब भेट देवून तपासणी केली असता, टनेल लाईन क्र. १५/५६ आणि रिंग क्र. ४७१ जवळ ६ इंची छिद्र पडल्याचे आणि तिथून मोठ्या प्रमाणावर पाणी Pune Metro Tunnel मधे झिरपत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. टनल मधे झिरपणारे पाणि रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात आली.
भविष्यात नागरिकांना सतर्कतेचा इशारा
खडक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी शशिकांत चव्हान यांनी “मेट्रोचे नुकसान [Section 78 of the The Metro Railways (Operation and Maintenance) Act, 2002]व प्रवाशांच्या जीवितास धोका[BNS Section ]निर्माण करण्याचा गुन्हा “ घरमालक व कंत्राटदार यांच्या विरुद्ध नोंदवला असल्याचे सांगितले आहे व असिस्टंट इन्स्पेक्टर कुलदीप व्हटकर पुढील तपास करीत आहेत असे कळते. पुणे महा मेट्रोच्या भूमिगत टनल विभागातील नागरिकांनी यापुढे बांधकाम पूर्व परवानगी व योग्य खबरदारी न घेतल्यास मोठी दुर्घटना होवू शकते असे मेट्रो अधिकार्यांनी सूचना वजा इशारा नागरिकांना दिला आहे. Indian Express च्या एका वृत्तानुसार तूर्तास टनल मधे झिरपणार्या पाण्यास रोखण्यास महा मेट्रो तंत्रज्ञांना यश आले आहे पण नोंदवल्या गेलेल्या FIR मधील नोंदीनुसार भविष्यातील टनल मधील पाणी गळतीची संभाव्यता पूर्णपणे नियंत्रणात नाही. हा मुद्दा फक्त गुन्ह्याची तीव्रता अधोरेखित करण्यासाठी नोंदला आहे की हे तथ्य व भीती मनात ठेवूनच यापुढे पुणेकरांना मेट्रो चा प्रवास करावा लागणार आहे हे Pune Maha Metro च्या अधिकृत घोषणे नंतरच स्पष्ट होईल.
हे ही वाचा:
▶️Karjat Local आता पनवेल मार्गे ही धावणार: कमी गर्दीचा Fast मार्ग- नव्या route चे ८५ टक्के काम पूर्ण!
▶️PCMC ‘सोनेरी दिवस’-2000 साल ची Reel पहिलीत ? Telco Road वरून बसचा सुखद प्रवास..एकदा पहाच

