Avinash Ghodke

Screenwriter and Lyricist with 20 years of experience in Bollywood and Marathi cinema.His creative writing examines the contradictions of lived experience, while his journalism uncovers humanism beneath headlines.

धुरंधर मधे पाकिस्तानातील हेराची भूमिका साकारणार्या रणवीर सिंग ची आज्जी एकेकाळी पाकिस्तानची प्रसिद्ध अभिनेत्री होती..

Ranveer Singh’s Grand mother: चाळीस च्या दशकात पाकिस्तानात चांद बर्क (Chand Burke) ही अभिनेत्री प्रसिध्दीस आली होती. पुढे फाळणी नंतर ती भारतात आली व इथे तिने दमदार चरित्र भूमिका साकारल्या.आज चांद चा नातू तिच्यासारख्याच दमदार भूमिका साकारत बॉलिवूड स्टार झाला आहे . रणवीर सिंग ची अभिनेत्री असलेली आज्जी ‘चांद’ बद्दल हा लेख आहे.

फैसलाबाद मधे चांद चा जन्म

1932 साली British India च्या पंजाब प्रोव्हिंस प्रांतात (सध्याचे फैसलाबाद ,पाकिस्तान) चांद चा जन्म एका धर्मांतरित ख्रिस्ती कुटुंबात झाला होता. १२ भावंडांच्या मोठ्या परीवारात ती वाढली. वडील जनाब खैरुद्दीन गावातील शाळेचे हेडमास्तर होते. ते ‘बर्क'( विजेचा लखलखाट) या टोपणनावाने शायरी करत.

दुसरे लग्नं यशस्वी

पूढे चांद ने निरंजन या सिने लेखक व दिग्दर्शकाशी लग्न केले होते पण १९५४ ला त्यांचा घटस्फोट झाला व १९५५ ला तिने सुंदर सिंग भवनानी यांच्याशी लग्न केले.सुंदर सिंग हे व्यवसायाने आर्किटेक्ट होते . सुंदर सिंग भवनानींपासून तिला एक मुलगी (तोनिया) व एक मुलगा (जगजीत) झाला. जगजीत सिंग हे आजचा बॉलिवूड सुपरस्टार रणवीर सिंग याचे वडील आहेत.

लाहोर चित्रपट सृष्टीची Dancing Lilly

१९४६ ला ‘कहां गये’ या चित्रपटाद्वारे चांद ने लाहोर च्या पाकिस्तानी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला होता. दुखियारी , पोस्ती, सब्ज़ बाग अशा चित्रपटांमधे लाहोर मधे आसताना तिने मुख्य अभिनेत्री ची भूमिका केली. चांद एक प्रसिद्ध अभिनेत्री होती व तिला ‘ Dancing Lilly’ अशी उपाधी पाकिस्तानी सिनेसृष्टीत मिळाली होती.

भारत पाक विभाजनानंतर भारतात Boot Polish चित्रपटातून पदार्पण

पुढे भारत पाक विभाजना नंतर रणवीर सिंग ची आज्जी;चांद भारतात आली. त्या काळात इटालियन New wave Cinema चा वास्तव वाद भारतीय सिने दिग्दर्शकांना प्रेरित करत होता. सत्यजीत रे ‘ पाथेर पांचाली’ बनवत होते त्याच वेळी राजकपूर ‘बूट पॉलिश’ हा वास्तववादी सिनेमा बनवत होते.१९५४ साली प्रदर्शित झालेल्या ‘ बूट पॉलिश‘ या चित्रपटात राजकपूर यांनी चांद बर्क ला भारतातील पहिला ब्रेक दिला.यातील चांद ची भूमिका एका सशक्त चरित्र अभिनेत्री ची होती. विशेष म्हणजे ही एका मराठी स्त्री ची भूमिका होती.‌ चांद बर्क ने Boot Polish सिनेमात साकारलेल्या वास्तव वादी चरित्र भूमिकेचा look वरील चित्रात आहे.

खालील चित्रात चांद बुर्क राजकपूर व देव आनंद सोबत दिसत आहे. Photo courtesy: Google

मुलगा चित्रपट व्यवसाया पासून दूर ..पण नातू स्टार झाला

चांद चा मुलगा जगजीत ( रणवीर सिंग चे वडील) चित्रपट सृष्टी पासून दूर राहिला व त्याने बांधकाम व्यवसायात मोठे नाव व यश संपादन केले आहे. जगजीत यांचा मुलगा रणवीर ला मात्र अभिनयाची आवड होती. जगजीत यांनी आपल्या मुलाला अभिनयासाठी पूर्ण पाठिंबा व प्रोत्साहन दिले. बाजीराव मस्तानी, पद्मावती,लुटेरा , धुरंधर अशा सिनेमांमधून वैविध्यपूर्ण भूमिका रणवीर सिंग ने साकारल्या आहेत.

धुरंधर चा हमजा साकारून एक प्रकारे रणवीरची आपल्या आज्जी ला श्रद्धांजली..

रणवीर सिंग ने आपल्या वडिलांच्या व्यवसायात न जाता आपली आज्जी चांद च्या अभिनय क्षेत्रात जाण्याचे ठरवले.आज त्याने वैविध्यपूर्ण भूमिका साकारून या क्षेत्रात नाव कमावले आहे. त्याचा धुरंधर चित्रपट आज प्रचंड यशस्वी झाला आहे व धुरंधर चा दुसरा भाग सध्या कमाईचे नवनवे रेकॉर्ड तोडत आहे. या चित्रपटात रणवीर सिंग ने पाकिस्तानात हेरगिरी करणार्या भारतीय हेराची दमदार भूमिका साकारली आहे. हमजा या हेराची ही भूमिका साकारून रणवीर सिंग ने पाकिस्तानातून आलेल्या आपल्या दिवंगत अभिनेत्री आज्जी ( Chand Burke) ला एक प्रकारे श्रद्धांजली वाहिली आहे असे म्हणावे लागेल.

Eagle Home Entertainment च्या खालील youtube link वर Chand Burke यांच्या ‘बूट पॉलिश’ चित्रपटातील ठसकेबाज अभीनयाची झलक जरूर पहा.

हे ही वाचा: ▶️Dhurandhar चित्रपटावर पाकिस्तानात Ban? निर्मात्यां विरुद्ध FIR? ▶️फक्त 20 दिवसात थायलंड मधे उभा केला Dhurandhar चा Lyari Town Set▶️

About The Author

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment