मौसमक्रिकेटऑपरेशन सिंदूरक्रिकेटस्पोर्ट्सबॉलीवुडजॉब - एजुकेशनबिजनेसलाइफस्टाइलदेशविदेशराशिफललाइफ - साइंसआध्यात्मिकअन्य

Old Monk Rum चं जनरल डायरशी जुळणारं नातं.. इतिहास जाणून घ्या

 

भारतात मध्यम वर्गीयांच्या डायनिंग टेबलवर Old Monk Rum ची रिकामी बाटली money plant लावण्यासाठी साठी वापरलेली दिसायची

80 च्या दशकात मध्यम वर्गीय घरांत एक डायनींग टेबल असायचा आणि या टेबलवर ती लठ्ठ बुटकी व खरबडीत पृष्ठभागाची काचेची बाटली ठेवलेली दिसायची जिच्यात पाणी भरून मनी प्लांट लावलेले असायचे.Old Monk Rum ची ही बाटली भरलेली असली की ती मर्दानगी चं प्रतीक असायची आणि रिकामी झाली की ती एक सांस्कृतिक प्रतीक बनायची. Old Monk Rum विशिष्ट आर्थिक किंवा सामाजिक स्तरांमधे प्रसिद्ध नव्हती.  ती जेवढी मध्यमवर्गीयांना प्रिय होती तेवढीच उच्चभ्रू श्रीमंत वर्गात ही popular होती. ही परिस्थिती आजही बदलली नाही.

एकाच
वेळी
Press club च्या टेबलांपासून Five
Star हॉटेल च्या classy बार पर्यंत उपस्थिती
लावून
Old Monk ने सामाजिक स्तर मोडित काढले .

Old Monk ची कूळ कथा :  तिचं क्रूरकर्मा जनरल डायरशी दूरचं नातं 

सन‌1835 मधे हिमाचल प्रदेश च्या कसौल‌ या गावात एडवर्ड अब्राहम डायर या ब्रिटिश माणसाने बिअर ब्रीवरी सुरू केली. या बीअर चं नाव होतं Lion Beer. Lion Beer ही आशिया खंडात बनलेली पहिली बीअर. त्या काळात ब्रिटिश राज च्या सैन्यातील जवानांसाठी लागणारी बीअर युरोपातून‌ आयात केली जायी. मिल्ट्री ची बीअर ची ही मागणी लक्षात घेवूनच एडवर्ड डायर यांनी E.Dyer and Company स्थापित करून हिमाचल च्या कसौल मधे ही बीअर ब्रीवरी सुरू केली.   त्या काळात ब्रिटिश माणसाने भारतात
जाऊन प्रशासन
अधिकारी पदावर वा सैन्य अधिकारी न बनता धंदा करणे हे
लंडन मधे
फार हीन मानले जायी. अशा लोकांना ते Box Walah (बॉक्स वाला) ‘बॉक्सअर्थात गल्ला वालाहा भारतीय शब्द विक्रेता हा अर्थ सूचित करणारा होता.
एडवर्डने मात्र या गोष्टींकडे दुर्लक्ष करत आपली LION BEER ब्रीवरी नेटाने सुरू ठेवली.जवानांसाठी बनवलेल्या या बीअर ची कॅच लाईन होती “As good as back home”( घरी परतल्याचं सुख देणारी) ही अतिशय हुशारीने योजलेली catch line जवानांच्या home sick भावनांना Target करत होती.

एडवर्ड चा व्यवसाय विस्तार आणि रेजिनाल्ड डायर चा जन्म

पुढे एडवर्ड ने ही बीअर ब्रिवरी शिमल्या जवळ सोलन ला
शिफ्ट केली
.  एडवर्ड ने पुढे आणखी काही लिकर कंपन्या सूरू केल्या.
ब्रिटिश कालीन पंजाब प्रांतातील मूरे या ठिकाणी ही त्याने
Murree Brewery सुरू केली. सध्या हे ठिकाण पाकिस्तानात आहे याच ठिकाणी 1864 साली एडवर्ड ला रेजिनाल्ड हा मुलगा झाला जो पुढे ब्रिटिश आर्मी मधे जनरल झाला.

H. G. Meakins शी भागीदारी 

1887 ला H.G. Meakin या‌ व्यापार्याने एडवर्ड च्या सिमला सोलन येथील ब्रीवरी विकत घेतल्या.एडवर्डच्या इतर units चालूच होत्या. E.Dyer and Company आता Dyer Meakin Company झाली. पुढे 1937 ला दोन्ही कंपन्यांनी एकत्रितपणे Dyer and Meakins ही कंपनी सुरू केली.

एडवर्ड डायरचा मुलगा रेजिनाल्ड पुढे शिक्षण पूर्ण करून ब्रिटिश
आर्मीत
रुजू झाला.

1916 ला हा 55 वर्षीय Temporary Brigadier General  पदावर पोहोचला होता. याच पदावर असताना 1919 मधे जालियनवाला बागेत जमलेल्या ब्रिटिश विरोधी समुदायावर अमानुष पणे गोळीबाराचा आदेश त्याने दिला होता.  अधिकृत आकड्या नुसार 375 लोकांचा यात मृत्यू झाला होता ज्यात स्त्रीया,मुले वृद्ध ही होते.मृतांचा खरा आकडा याहून खूप मोठा असावा असे म्हटले जाते.
या हत्याकांडामुळे General Dyer ला Butcher of Amritsar (अमृतसर चा कसाई)म्हटले जावू लागले. खुद्द इंग्लंड मधे ही त्याची निंदा झाली. या अमानुष घटने नंतर एकच वर्षानी 1920 ला General Dyer निवृत्त झाला.इंग्लंडमधे परतल्यावर त्याला जालियनवाला बाग हत्याकांडा बाबत चौकशी ला सामोरे जावे लागले.

स्वातंत्र्यानंतर Dyer and Meakins मधे Old Monk चा जन्म

1947 मधे भारत स्वतंत्र झाल्यानंतर ही जनरल डायर च्या वडीलांची Dyer and Meakins company सुरूच होती . 1949 मधे नरेंद्र मोहन या भारतीय व्यापार्याने Dyer and Meakins चे अधिकांश समभाग विकत घेवून कंपनीची मालकी मिळवली.  

नरेंद्र मोहन यांचा 1969 साली मृत्यू झाला कंपनीची धुरा त्यांचा जेष्ठ पुत्र कर्नल वेद रतन मोहन कडे आली.  वेद रतन यांनी वडीलांच्या हयातीतच 1954 ला Old Monk या Dark Rum brand ला जन्म दिला होता.

Old Monk Rum ला जन्म देणारे flamboyant कर्नल वेद
रतन मोहन

कर्नल वेद रतन मोहन हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. राज्यसभेचे
MP पद,लखन‌ऊ चे दोन वेळा मेयर पद आणि चित्रपट
सेन्सर बोर्डाचे
आध्यक्षपद अशी अनेक पदे त्यांनी
भूष‌विली
. इंदिरा गांधींचा त्यांच्यावर विशेष विश्वास होता. राजकारणी सिनेसृष्टीतील त्यांचा मित्रपरिवार मोठा होता‌ त्यांच्या
घरी
ते नेहमीच या लोकांना बोलावून पार्ट्या करत. वेद‌रतन मोहन‌ एक शौकीन
दिलखुलास व्यक्तिमत्त्व होते

युरोपातील Benedictine Monk ची प्रेरणा

वेद रतन मोहन यांच्या युरोपच्या  प्रवासात त्यांना बेनेडिक्टी
साधू (Benedictine Monk)समाजाची जीवनशैली पहायला मिळाली. 5 व्या शतकातील इटली च्या संत बेनेडिक्ट(जन्म २मार्च ४८० AD) यांच्या विचारांचे पालन करणारा हा साधू‌समाज साधेपणाने गरजा सीमीत ठेवून‌ जगतो. यातील काही साधू काळी कफनी घालतात म्हणून त्यांना Black Monk ही म्हणतात. संत Benedict हे द्राक्षाची वाईन स्वतः बनवत असत. 

युरोपियन संस्कृतीत वाईन हा आहार संस्कृती चा विषय आहे.Europian ख्रिस्ती समाजा साठी हा श्रद्धा भाव ही आहे कारण येशू ख्रिस्ताने आपल्या जीवनातील पहिला चमत्कार एका शाही लग्नात १२० गॅलन पाण्याचे वाईन मधे रूपांतर करून केला होता  (Gospel of John 2:1 -11)बेनेडिक्ट साधू ही आपल्या गुरूंप्रमाणे पारंपारिक रितीने द्राक्षाची वाईन बनवतात. 

17 व्या शतकात Benedictine संप्रदायातील फ्रेंच साधू Dom Pierre यांनी ‘शॅम्पेन’ या मद्यप्रकाराची निर्मिती केली असे मानले जाते.
याच Benedictine Monks च्या जीवनशैलीने प्रभावित होवून वेद‌ रतन
मोहन
यांनी भारतात Dark Rum बनवण्याचा निर्णय घेतला या Rum ला नाव दिले OLD MONK जे Benedictine साधूंना समर्पित आहे. अशा प्रकारे ब्रिटिश आमदानीत जनरल डायर च्या वडीलांनी सुरू‌ केलेल्या त्याच बीअर कंपनीत स्वातंत्र्यानंतर  Old Monk Dark Rum बनू लागली.

परवडेल अशा किमतीत बनणारी affordable Old Monk खरंतर सैन्यातील जवानांसाठी बनवली गेली होती पण ती उच्च सैन्य अधिकारी ही पिऊ लागले. एकाच वेळी Press club च्या टेबलांपासून Five Star हॉटेल च्या classy बार पर्यंत उपस्थिती लावून Old Monk ने सामाजिक स्तर मोडित काढले.

Collage depicting serene life of Benedictine Monks
Benedictine Monk प्रार्थना आणि वाईन निर्मिती एकाच श्रद्धेने करतात pic Courtesy Google

कुठलीही जाहिरात नं करता Cult Classic

Old Monk ची कधीही जाहिरात केली गेली नाही. Word of mouth नेच तिचा खप होतं राहिला .२०१३ पर्यंत ती भारतात नं १ पदावरची रम होती पण २०१३ नंतर ही जागा Mac Dowells No1 Celebration Rum ने घेतली. असे असले तरी Old Monk चे चाहते आजही तिलाच पसंती देतात.

 ” Detol हे शरीराच्या जखमा भरतं पण Old Monk मनाच्या जखमा भरते”

असं भावनिक विधान old Monk च्या एका चाहत्याने सोशल मीडियावर पोस्ट केले आणि तेच Old Monk ची Punch Line झाले.

लेबल वरचे Old Monk चे हसरे चित्र

Old Monk लेबल वर जे हसरे साधू दिसतात तो H G Meakins यांचा चेहरा आहे ज्यांनी 1887 मधे एडवर्ड डायर कडून कंपनी विकत घेतली होती कंपनीला लंडन स्टॉक एक्सचेंज मधे लिस्ट केले होते.

Old Monk च्या बाटली बद्दल ही एक कथा

Old Monk सुरूवातीला उंच काचेच्या बाटलीतच मिळत असे पण वेद रतन मोहन यांनी एकदा विदेशी Old Parr whisky ची बाटली
पाहिली
.Old Parr या बाटल्या काळ्या रंगात transparent
अशा दोन प्रकारात बनवत असे. वेद रतन यांना या बाटलीचा आकार व‌ रूप खूप आवडले तशीच बाटली त्यांनी आपल्या Old Monk साठी वापरायला सुरुवात केली. बाटली च्या विशिष्ट आकारामुळे फिलींग च्या
सरकत्या
पट्टी (Ramp)वर काही तांत्रिक अडचणी येत होत्या. तांत्रिक दोषाचे निराकरण होईपर्यंत अनेक बाटल्या फुटल्या पण वेद रतन मोहन यांनी
ही
बाटली Old Monk साठी वापरलीच .पुढे हीच बाटली Old Monk ची ओळख ही झाली

Old Parr whisky या कंपनीला मात्र हे काही पटले नाही.Old Parr ने Old Monk वर‌ बाटलीचे डिझाईन चोरल्याचा Copy Right खटला चालवून Old Monk ला कोर्टात खेचले. अखेर निकालात काळ्या रंगाची बाटली
Old Parr ने वापरावी transparent बाटली Old Monk ने वापरावी असा मध्यम मार्ग काढण्यात आला Old Monk Dark Rum ला आपली
iconic बाटली कायदेशीर रित्या मिळाली.

कंपनीच्या नावातील Dyer हा कलंकित शब्द

सन‌1960 ला पंडित जवाहरलाल नेहरू सिमल्यात असताना त्यांनी Dyer
and Meakins
या कंपनीकडून  कंपनीला
भेट देण्याचे आलेले  आमंत्रण अस्विकृत
केले. असे करण्याचे कारण त्यांना विचारल्यावर पंडित
नेहरू यांनी
स्पष्टपणे

जालियनवाला बाग हत्याकांडातील
आरोपी
जनरल डायर चे आडनाव
कंपनीस
आहे त्यामुळे मी अशा कंपनीस भेट
देणे
उचित नाही

असे स्पष्ट केले.
राष्ट्रीय भावना लक्षात घेवून अखेर
1966
ला कंपनीच्या
नावातील
Dyer हा
शब्द वगळून Mohan Meakins असे नवे नाव कंपनीस देण्यात
आले
.

Old Monk सध्या उत्तर प्रदेश, गाझियाबाद येथे बनते पण तिचे corporate office अजून ही सोलन, हिमाचल प्रदेश येथे आहे.

कपिल मोहन यांच्या निधनानंतर शिमला येथे जन्मलेल्या अभिनेते अनुपम खेर यांनी शेअर केलेली आठवण

वेद रतन मोहन यांच्या अकाली मृत्यू नंतर त्यांचे कनिष्ठ बंधू कपिल मोहन यांनी मोहन मेकिन्स ची धुरा सांभाळली. ते Marketing Genius होते. त्यांच्या कारकिर्दीत Old Monk चा व्यवसाय व खप वाढत गेला. २०१८ साली कपिल मोहन यांचे निधन झाले तेंव्हा प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांनी ट्विटरवर श्रद्धांजली देताना तरूणपणी ची पहिल्यांदा Old Monk सेवन केल्याची एक आठवण शेअर केली होती जी खूप प्रातिनिधिक स्वरुपाची होती .

Screen shot of Anupam Khers Tweet.
कपिल मोहन यांच्या निधना नंतर अभिनेते अनुपम खेर यांची श्रध्दांजली व आठवण.

 

Old Monk चे तांत्रिक विश्लेषण 

– प्रकार: डार्क रम

– अल्कोहोल पर्संटेज: ४२.८% ABV (अल्कोहोल बाय वॉल्यूम)

– निर्मिती स्थळ: भारत, उत्तर प्रदेश, गाझियाबाद 

– निर्माता: मोहन मेकिन लिमिटेड

– साहित्य: मोलॅसिस-आधारित रम

– डिस्टिलेशन प्रक्रिया:  कॉलम डिस्टिलेशन

–  Maturation वय: किमान ७ वर्षे ओकच्या बॅरल्समध्ये Mature केली जाते.

– रंग: गडद, गडद तपकिरी

– सुगंध: व्हॅनिला, कॅरमेल, चॉकलेट, आणि दालचिनी यांचा संकेत 

स्वाद प्रोफाइल:

    1.   प्रारंभि सेवन:  कॅरमेल, व्हॅनिला आणि डार्क चॉकलेटचे स्वाद
    2.   मध्य-स्वाद सेवन: सुकामेवा, मसाले (लवंग, दालचिनी), आणि थोडा कॉफीचा स्वाद
    3.   सेवन समाप्ती: दीर्घ आणि उबदार, गोडसर आणि थोडे smokiness चे संकेत
Old monk चे सेवन विशिष्ट पद्धतीने कसे करावे याबद्दल YouTube वर अनेक माहिती पर video आहेत जे तुम्ही पाहू शकता.

 

शेवटी

एखादी वस्तू Cult Classic ठरते ती तिच्या विशिष्ट गुणांमुळेच. अशी वस्तू जरी एक मद्य असली तरी तिचा प्रवास वा‌ इतिहास समजून घेणे गरजेचे असते. अती मद्यप्राशन करणे केंव्हाही वाईट व मद्यप्राशना पासून दूर रहाणे सर्वात उत्तम. Old Monk  चे जन्मदाते वेद रतन मोहन यांच्या अकाली निधना नंतर त्यांचे कनिष्ठ बंधू कपिल मोहन यांनी Old Monk चा कारभार सांभाळला. Old Monk चे Market वृद्धिंगत करण्याचे श्रेय कपिल मोहन यांना जाते.  कपिल मोहन हे पूर्णत: निर्व्यसनी होते.

 
Collage depicts contrast symbolism of OldMonk as Manhood ness and Money Plant planter
प्रतिकात्मकता: गृहलक्ष्मी ते मर्दानगी

हे ही वाचा :

भारतीय म्हशी कशा पोहोचल्या Italy ला हजारो वर्षांपूर्वी: Mozzarella cheese and Indian water Buffalo 

New york शहर‌ लढतेय 30 लाख उंदरांशी 

आबे फरीया: गोव्याचा पुत्र आहे hypnotism तंत्राचा जनक.जग त्याला Father of Hypnotism म्हणते 

Goa and wine Tourism – गोव्यात उभं रहात आहे जागतिक दर्जाचा Craft spirit center 

About The Author

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment