एक मिलिटरी चमत्कार: Military Miracle कर्नल प्रिथपाल सिंग गिल यांची अद्वितीय देशसेवा
देशसेवेचं असं अनोखं रूप फार क्वचित दिसतं. आपल्यापैकी अनेक लोकांची अशी इच्छा असते की भारतीय सैन्य दलात एका शाखेत आपण आपले योगदान द्यावे पण एक अशी व्यक्ती होऊन गेली जिने भारतीय सैन्याच्या तीनही शाखा – नेव्ही, एअर फोर्स आणि आर्मीमध्ये आपले गौरवपूर्ण व शौर्यशाली असे योगदान दिले आहे ती व्यक्ती म्हणजे कर्नल प्रिथपाल सिंग गिल. त्यांना मिलिटरी मिरॅकल म्हणून ही ओळखले जाते.
सुरुवात झाली नौदलापासून
कर्नल गिल यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात रॉयल इंडियन नेव्हीमध्ये 1940 च्या सुमारास केली. त्यांचे वडील स्वतः पोलिस अधीक्षक होते. त्यांनीच आपल्या मुलाला नौदलात पाठवलं.कर्नल प्रिथपाल सिंग गिल यांना मात्र आर्मी मध्ये जाण्याची फार इच्छा होती , अखेर काही वर्षांत त्यांनी नौदलातून निवृत्ती घेतली. इच्छा असूनही आर्मी चा प्रवेश होऊ शकला नाही पण हवाई दलात मात्र त्यांनी प्रवेश मिळवला.
हवाई दलात घेतलं प्रशिक्षण
यानंतर त्यांनी भारतीय हवाई दलात (Indian Air Force) प्रवेश घेतला. पायलट ऑफिसर म्हणून प्रशिक्षण घेतल्यानंतर काही काळ त्यांनी प्रशिक्षक विमाने उडवली, मात्र इथे त्यांना लढाऊ विमान उडवण्याची संधी मिळाली नाही जी त्यांना हवी होती.याच कारणामुळे त्यांनी पुन्हा एकदा आपला मार्ग बदलला . यावेळी मात्र त्यांनी आर्मी ,अर्थात थलसेनेत देशसेवेसाठी रुजू होण्याच आपलं स्वप्न पूर्ण केलं
.
अखेर मनासारखं :भारतीय थलसेनेत कारकीर्द सुरू
भारतीय आर्मीत (Indian Army) प्रवेश घेतल्यानंतर कर्नल प्रीथपाल सिंग सिक्ख रेजिमेंट मध्ये अधिकारी झाले. त्यांनी पुढे तोफखाना विभागात काम केलं. 1971 च्या भारत-पाक युद्धात ते कर्नल पदावर कार्यरत होते. या युद्धात कर्नल प्रिथपाल सिंग यांनी फ्रंटलाइनवरून आपल्या रेजिमेंटचं नेतृत्त्व केलं, आणि शत्रूवर निर्णायक विजय मिळवण्यात हातभार लावला.
का म्हणतात त्यांना “Military Miracle”?
भारतीय सेनेच्या तीनही सैन्य शाखांमध्ये प्रत्यक्ष सेवा दिलेले एकमेव सैन्य अधिकारी ते आहेत .तसेच त्यांनी प्रत्युयक्ष युद्धात भाग घेतलेला आहे. नेतृत्वगुण, शिस्त आणि देशभक्तीचं मूर्तिमंत उदाहरण असलेल्या अशा अद्वितीय व्यक्तिमत्वाला व त्यांच्या dynamic कारकिर्दिला ‘मिलिटरी मिरॅकल’ म्हणणेच योग्य आहे
शतायु कर्नल- शंभरी पार केली
होय, कर्नल प्रिथपाल सिंग गिल हे 2021 मध्ये 100 वर्षांचे झाले होते. त्यानंतर त्यांच्याबद्दल सार्वजनिक अपडेट फारसे नाहीत, परंतु त्यांच्या निधनाबद्दल कोणतीही अधिकृत बातमी नसल्याने त्यांना हयातच समजले जाते.
खरंतर अशा अद्वितीय व्यक्ती समाजासाठी अमर अशा प्रेरणाच असतात नाही का?
सध्या कर्नल प्रीथपाल सिंग चंदीगड येथे निवृत्त जीवन जगत आहेत.
प्रेरणा घेण्यासारखं जीवन
कर्नल प्रिथपाल सिंग गिल यांचं जीवन हे नुसतंच सैनिकी नाही, तर ध्येय, शिस्त आणि आत्मत्याग यांचं एक सजीव उदाहरण आहे. भारतीय थलसेनेत रुजू होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी निकराचा प्रयत्न केला. नेव्ही आणि एअर फोर्स मध्ये काम करण्याचा अनुभव घेत त्यांनी अखेर आपल्या ध्येयाकडे वाटचाल केली व भारतीय थलसेनेत रुजू झाले . भारत पाकिस्तान मधील 1971 च्या युद्धात त्यांची कामगिरी उल्लेखनीय अशी आहे.
कर्नल प्रिथपाल सिंग गिल यांची ओळख आपल्या तरुण पिढीपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. देशासाठी आयुष्य झोकून देणारं त्यांचे जीवन आजच्या तरुण पिढी पुढे एक आदर्श आहे.त्यांना तिन्ही लष्करी दलात काम करणारा भारतातील एकमेव अधिकारी होण्याचा मान मिळालेला आहे — आणि ही गोष्ट भारतीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवली जाईल.







