मौसमक्रिकेटऑपरेशन सिंदूरक्रिकेटस्पोर्ट्सबॉलीवुडजॉब - एजुकेशनबिजनेसलाइफस्टाइलदेशविदेशराशिफललाइफ - साइंसआध्यात्मिकअन्य

Intermittent fasting: Manoj Bajpayee करतोय 14 वर्षे हा उपवास

 weight loss करण्यासाठी bollywood Celebrity ही करत आहेत  Intermittent fasting 

Bollywood actor seen giving fitness pose

Written by Avinash Bhanu Asha Ghodke 

काय आहे हे इंटर्मिटंट फासटींग intermittent fasting ?

आलिया भट चं Intermittent fasting 

नुकतेच आलिया भट या bollywood अभिनेत्रीने MID DAY या वृत्तपत्रासाठी दिलेल्या आपल्या मुलाखतीत आपण Intermittent fasting चा अवलंब करत काही किलो वजन कमी केल्याचे सांगितले आहे. Intermittent fasting चा अवलंब weight loss साठी अनेक celebrities करताना दिसत आहेत. प्रसिद्ध अभिनेते Manoj Bajpayee  तर‌ गेली‌ 14 वर्षे Intermittent fasting हा उपवास करत आहेत.

मनोज वाजपेयींचा Curly Tales च्या मुलाखतीत खुलासा 

मागील वर्षी अभिनेते मनोज वाजपेयी यांनी ही अशाच प्रकारे आपण Intermittent fasting करून स्वास्थ्य पूर्ण अशी आहार प्रणाली अवलंबित आहोत असे सांगितले. .

कामिया मल्होत्रा हिच्या प्रसिद्ध Curly Tales चॅनल च्या Sunday Brunch या विशेष भागात कामिया ने मनोज वाजपेयी यांच्याबरोबर लंच घेत दिलखुलास संवाद साधला होता. 

मनोज वाजपेयींनी कामिया ला आपल्या खाण्याच्या आवडी निवडी सांगताना आपण गेली 14 वर्षे रात्रीचे जेवण‌ करत नाही असे सांगुन चकित केले.

अशा पद्धतीने जेवण skip करत उपवास करण्यास Intermittent Fasting असे म्हटले जाते .या उपवसा कडे आपण कसे वळलो हे सांगताना मनोज वाजपेयी म्हणाले आपले आजोबा अतिशय सडपातळ व फिट व्यक्ती होते . त्यांच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित होऊन आपण त्यांची  मीत आहार पद्धती अवलंबण्याचे आपण ठरवले .  मनोज वाजपेयी पुढे  म्हणाले  एक डॉक्टर आपल्याला एकदा सहज म्हणाले की “रात्री केलेलं‌ जेवण आपण रात्री हालचाल न करता झोपून रहातो त्यामुळे ते पोटात तसेच पडून रहाते !”  या वाक्या मुळे मनोज वाजपेयींच्या मनात अन्न पोटात पडून रहाण्याची एक प्रतिमाच तयार झाली व ही प्रतिमा त्यांना चैन पडू देईना. Manoj Bajpayee यांनी 14  वर्षांपूर्वी रात्रीचे जेवण नं करण्याचा निर्णय घेतला व त्यांच्या आजच्या fitness चे पूर्ण श्रेय ते या Intermittent fasting च्या निर्णयाला देतात. 

मनोज वाजपायी यांची उपवास पद्धती 

सकाळी 9 ते दुपारी 3 पर्यन्त असे सात तासाच्या काळात Manoj Bajpayee  आरोग्य दाई आहार करतात  व पुढील 17 तास ते उपवास पाळतात. या उपवास काळात ते पाणी  व साखर दूध नसलेले चहा कॉफी घेत असतात. 

मनोज वाजपेयींचा स्वयंनिर्णय Self Decision 

 खरे तर चौदा वर्षांपूर्वी अशा पद्धती च्या उपवसाची कुठलीही पद्धती प्रचलित नव्हती. अशा पद्धतीने उपवास करण्याचा त्यांचा हा स्वयं निर्णय होता . सुरुवातीला त्यांना संध्याकाळची भूक अनावर होई त्यावेळी ते दोन बिस्किट व पाणी पीवून भूक शमवित . हळू हळू शरीराला या routine ची सवय होऊ लागली असे ते म्हणतात. मनोज वाजपेयी यांची Curly Tales वरील ही मुलाखत आपण या Link वर पाहू शकता . Intermittent Fasting म्हणजे काय ? व या Fasting चे 6 प्रकार कुठले याबद्दल खाली वाचा .

अनेक प्रसिद्ध अभिनेते करत आहेत Intermittent fasting 

विनोदी अभिनेत्री भारती सिंह व अश्या बऱ्याच Bollywood कलाकारांनी वजन कमी करण्यासाठी intermittent fasting चा अवलंब केल्याचे दिसते . Hollywood मधे ही हा उपवास प्रकार अवलंबला जातो आहे Jennifer Aniston , Jennifer Lopez , Beyonce या अभिनेत्री तसेच सध्याचे बहुचर्चित  Tesla Car company चे अब्जाधीश मालक Elon Musk यांनीही Intermittent Fasting करून आपले वजन कमी केले आहे .

इंटरमिटेंट फास्टिंग (Intermittent fasting)म्हणजे

 ठराविक तासांच्या कालखंडात सातत्याने पण अंतरा अंतराने उपवास करण्याची एक पद्धत आहे, ज्यामध्ये खाण्याचे आणि उपवासाचे ठराविक वेळापत्रक पाळले जाते. ही पद्धत वजन कमी करण्यासाठी, चयापचय सुधारण्यासाठी, आणि आरोग्याचे विविध फायदे मिळवण्यासाठी उपयुक्त आहे असे म्हटले जात आहे.

Intermittent fasting चे फायदे

  1.  वजन कमी होणे : उपवासामुळे शरीरातील इन्सुलिनची पातळी कमी होते, ज्यामुळे चरबी जलद गतीने जळते.
  2. चयापचय क्रिया सुधारणे :  उपवासामुळे चयापचय वाढतो आणि हॉर्मोन्सची स्थिती सुधारते.
  3.  Ageing अर्थात वय वाढण्याची प्रक्रिया मंदावणे : काही अभ्यासांनुसार उपवासामुळे शरीराच्या पेशींची दुरुस्ती प्रक्रिया चालू राहते, ज्यामुळे म्हातारपणाची प्रक्रिया मंदावते.

विचारात घेण्याचे मुद्दे :

कुठलीही उपचार पद्धती व तिचे सकारात्मक वा नकारात्मक परिणाम व्यक्ती परत्वे भिन्न असतात कारण प्रत्येक व्यक्ती ची शारीरिक ठेवण विशिष्ट व वेगळी असते त्यामुळे वैद्यकीय मार्गदर्शना शिवाय Intermittent fasting वा इतर कुठल्याही उपचार पद्धतीचा अवलंब करू नये.

– Intermittent fasting इंटरमिटेंट फास्टिंग कुणी करू नये 

  • गर्भवती स्त्रिया, 
  • स्तनपान करणाऱ्या माता, आणि 
  • विशिष्ट आजारांनी पीडित असणाऱ्या व्यक्तींनी 

याचा अवलंब करू नये . केल्यास ते आरोग्यासाठी घातक ठरू शकते.

– Intermittent fasting केल्यास उपवासाच्या कालावधीत पुरेसे पाणी प्यावे आणि योग्य पोषण मिळवण्यासाठी आहार संतुलित असावा.

महत्वाचे

Intermittent fasting इंटरमिटेंट फास्टिंग weight loss वजन कमी करण्यासाठी एक प्रभावी पद्धत आहे जी योग्य रीतीने वापरल्यास आरोग्याचे अनेक फायदे देऊ शकते. मात्र, ही पद्धत सुरु करण्याआधी योग्य वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे. आपल्या विशिष्ट शारीरिक रचनेस ही उपवास पद्धती अनुकूल आहे की नाही यांची खात्री करूनच INTERMITTENT FASTING  चा अवलंब करावा .

हे ही वाचा :

निद्रानाशावर उपाय Binaural Beats संगीत 

Intermittent fasting चे 6 प्रकार 

About The Author

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment