मौसमक्रिकेटऑपरेशन सिंदूरक्रिकेटस्पोर्ट्सबॉलीवुडजॉब - एजुकेशनबिजनेसलाइफस्टाइलदेशविदेशराशिफललाइफ - साइंसआध्यात्मिकअन्य

Bollywood अभिनेत्री चा विठ्ठल होता Sanjeev Kumar | तो मिळावा म्हणून तिने पंढरपूर च्या विठ्ठलालाच साकडं घातलं

पंढरपूर च्या विठ्ठलाच्या साक्षीने घडलेली Bollywood ची एक असफल love story

Collage in Thumbnail with black and white picture of hero and heroine coupled with picture of deity Vitthal
Caption with inset picture of Sanjeev Kumar and Sulakshana Pandit in a romantic act in film
Bollywood actors Sanjeev Kumar and Sulakshana Pandit . The collage consists of famous Maharashtra deity Vitthal with reference to the blog story’
Written by Avinash Bhanu Asha Ghodke

Sanjeev Kumar वर एकतर्फी प्रेम करणार्या अभिनेत्रीची असफल Bollywood love Story

कोण होती ती अभिनेत्री ?

1975 च्या उलझन या हिंदी सिनेमा द्वारे या अभिनेत्रीने अभिनयात पदार्पण केले. तिच्या सोबत या सिनेमात प्रस्थापित मातब्बर अभिनेते Sanjeev Kumar नायक म्हणून काम करत होते. उलझन सिनेमा च्या शूटिंग दरम्यान ही नवी अभीनेत्री संजीव कुमार यांच्या प्रेमात आकंठ बुडाली. पण तिचे संजीव कुमार वरचे हे प्रेम एकतर्फी होते. तिच्या प्रेमाला संजीव कुमार यांचा कूठला ही प्रतिसाद मिळाला नव्हता.

Sanjeev Kumar यांचे प्रेम दुसऱ्याच अभिनेत्री वर

संजीव कुमार यांनी सुलक्षणा च्या प्रेमाला प्रतिसाद दिला नाही कारण ते कुणाला तरी आधीच आपलं हृदय देवून बसले होते. Sanjeev Kumar जिच्या प्रेमात होते ती Bollywood अभिनेत्री होती Dream Girl हेमा मालिनी. हेमा मालिनी हीने आपल्याशी लग्न करावं असे वाटणारे तेंव्हा अनेक अभिनेते होते. या लिस्ट मधे जीतेन्द्र यांची ही वर्णी होती.विशेष म्हणजे हेमामालिनी यांना दक्षिणी चित्रपट सृष्टीतून हिंदी चित्रपट सृष्टीत आणन्यासाठी व आपल्या सिनेमाची नाईका करण्यासाठी जीतेन्द्र यांनी बराच खटाटोप केला होता. असे सर्व असले तरी हेमा मालिनी मात्र धर्मेंद्र यांच्यावर फिदा झाली. धर्मेंद्र तेंव्हा विवाहित होते पण हेमामालिनी ला सर्व मंजूर होते. धर्मेंद्र व हेमामालिनी यांचे लग्न झाले. या लग्नाला कायदेशीर रूप देण्यासाठी धर्मेंद्र यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला अशी कुजबूज तेंव्हा चित्रपट सृष्टीत होती.

Dream Girl हेमा मालिनी नं मिळाल्याने Sanjeev Kumar अविवाहित राहिले

हेमामालिनी यांच्या धर्मेंद्र शी झालेल्या या विवाहानंतर संजीव कुमार खूप व्यथित झाले. ते दारूच्या आहारी गेले व पुढे कधीच लग्न नं करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. सुलक्षणा ने संजीव कुमार यांच्या पूढे आपले प्रेम व्यक्त केले पण Sanjeev Kumar यांनी प्रतिसाद दिला नाही.
सुलक्षणा पंडित यांना मात्र अजूनही संजीव कुमार यांची आस लागून राहिली होती. संजीव कुमार यांचे खरे नाव‌ हरी होते. एका चित्रपटातील त्यांची कृष्णा ची भूमिका ही गाजली होती . सुलक्षणा पंडित आता या हरी ची आस लागलेली राधाच झाली होती. हरी आपल्या जीवनात यावा म्हणून तिने सर्व‌ यत्न केले पण हाती निराशाच येत होती.

सुलक्षणा पंडित ची पंढरपूर वारी

सुलक्षणा पंडित एव्हाना वैफल्यग्रस्त झाली. नैराश्याने तिला घेरले. Dipression च्या या मनोअवस्थे ती खचत चालली होती . याच मनोअवस्थेत‌ सुलक्षणा पंडित ने आता पंढरपूर च्या पांडुरंगाकडे धाव घेतली. विठोबाच्या गळ्यात तुळशीची माळ घालून तिने विठ्ठलाला सरळ आलिंगनच दिले. “हे हरी पांडुरंगा ..माझा हरी मला दे!” असे ती पांडुरंगाला म्हणाली असावी.
हे दृश्य महाराष्ट्राला अचंभित करणारे होते. एक Bollywood अभिनेत्री पांडुरंगाला आलिंगन देत असल्याचे फोटो तेंव्हा वर्तमान पत्रातून छापून आले ‌होते.
पांडुरंगाने सुलक्षणा पंडित ची अर्जी मात्र स्वीकारली नाही. Sanjeev Kumar यांचे प्रारब्ध नियतीने आधीच लिहून ठेवले होते. अतिमद्यपान‌ व स्वास्थ्याबद्ल निष्काळजी पणा ने Sanjeev Kumar यांना‌ अनेक व्याधी झाल्या होत्या . पुन्हा कुटुंबात ह्रदय रोगाची Genetic History ही होतीच.

Sanjeev Kumar यांच्या जाण्याने सुलक्षणा पंडित यांना धक्का

1985 साली वयाच्या अवघ्या 47 व्या वर्षी Sanjeev Kumar यांचं निधन झालं. शोले मधे दोन्ही हात तुटलेला कणखर ठाकुर गब्बर सिंग ला पाया खाली चिरडतानाचा संजीव कुमार यांचा अभिनय प्रेक्षकांच्या अंगावर यायचा पण तोच ठाकुर साकारणारा संजीव कुमार हा Great Bollywood Actor काळाच्या कराल दाढेत चिरडला गेला .
सुलक्षणा पंडित साठी हा एक मोठा मानसिक धक्का होता. पुढील अनेक वर्षे सुलक्षणा पंडित या धक्क्यातून सावरली नाही.
विठोबाच्या साक्षीने घडलेली ही Bollywood मधील एक‌ असफल love story जिवाला चटका लावणारी अशीच आहे.
हे ही वाचा :

About The Author

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment