मौसमक्रिकेटऑपरेशन सिंदूरक्रिकेटस्पोर्ट्सबॉलीवुडजॉब - एजुकेशनबिजनेसलाइफस्टाइलदेशविदेशराशिफललाइफ - साइंसआध्यात्मिकअन्य

Avinash Ghodke

Screenwriter and Lyricist with 20 years of experience in Bollywood and Marathi cinema.His creative writing examines the contradictions of lived experience, while his journalism uncovers humanism beneath headlines.

लीना गांधी तिवारी या उद्योजक महिलेने खरेदी केला 703 कोटींचा फ्लॅट- Highest Mumbai real estate deal..

लीना गांधी तिवारी एक उद्योजक महिला

वरळी सी फेस येथील नमन झाना (Naman Xana) टावर मध्ये तब्बल 703 कोटींचे डुप्लेक्स फ्लॅट ची Highest Mumbai real estate deal करणार्या महिला कोण आहेत याची उत्सुकता सगळ्यांना आहे. या अब्जाधीश व उद्योजक महिलेचे नाव लीना गांधी तिवारी असे आहे.त्या एका फार्मा कंपनीच्या चेअरमन आहेत. उद्योजक कुटुंबात जन्मलेल्या लीला गांधी तिवारी आपल्या आजोबांचा उद्योग व्यवसाय यशस्वीपणे पुढे नेत आहेत.

लीना गांधी तिवारी यांची USV प्रायव्हेट लिमिटेड फार्मा कंपनी


कोण आहेत लीना गांधी

भारतीय उद्योगविश्वातील एक अत्यंत महत्त्वाची आणि प्रभावशाली व्यक्ती म्हणजे लीना गांधी तिवारी. त्या USV प्रायव्हेट लिमिटेड या फार्मास्युटिकल आणि बायोटेक्नॉलॉजी कंपनीच्या चेअरपर्सन आहेत. USV ही कंपनी मुख्यतः डायबेटीस, हृदयविकार आणि बायोसिमिलर्स क्षेत्रात काम करते. या कंपनीची स्थापना लीना यांच्या आजोबांनी केली होती – विठ्ठल गांधी, जे स्वतः स्वातंत्र्यलढ्यातील कार्यकर्ते आणि गांधीवादी होते.

शैक्षणिक पार्श्वभूमी व नेतृत्व

लीना गांधी तिवारी या स्वतः केमिस्ट्री पदवीधर असून, त्यानंतर त्यांनी सॅन फ्रान्सिस्को स्टेट युनिव्हर्सिटी मधून बिझनेस मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी आपल्या नेतृत्वाखाली USV ला भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय बाजारातही सक्षमपणे उभे केले आहे.

फोर्ब्स यादीतील स्थान

त्या भारतातील टॉप 10 श्रीमंत महिलांपैकी एक आहेत. फोर्ब्स इंडिया 2023 च्या यादीत त्यांचे नाव आघाडीवर आहे. त्यांची एकूण संपत्ती सुमारे 24,000 कोटी रुपये (सुमारे 3 अब्ज डॉलर्स) एवढी आहे. त्यांच्या संपत्तीचा प्रमुख स्रोत म्हणजे USV कंपनीतील वाटा, ज्यातून त्यांना वार्षिक उत्पन्न (शेअर) मिळत असते..

सामाजिक कार्यात सहभाग

लीना गांधी तिवारी या केवळ उद्योगपती नाहीत, तर त्या एक सामाजिक कार्यकर्त्या देखील आहेत. त्यांनी अनेक आरोग्यविषयक आणि ग्रामीण विकास प्रकल्पांमध्ये आर्थिक मदत दिली आहे. त्यांनी त्यांच्या कंपनीच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) अंतर्गत अनेक आरोग्य शिबिरे, महिलांसाठी स्वयंरोजगार योजना आणि ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा वाढविण्यासाठी उपक्रम सुरू केले आहेत. USV फार्मा कंपनीची सुरूवात लीना गांधी यांच्या आजोबांनी केली होती हिना गांधी यांच्या आजोबा गांधीवादी विचारांचे होते. त्यांचा सामाजिक बांधिलकी चा वसा लीना गांधी आज आपल्या परीने पुढे नेत आहेत

व्यक्तिमत्त्व आणि कुटुंब

त्यांचे पती प्राशांत तिवारी हे देखील कंपनीच्या व्यवस्थापनात कार्यरत आहेत. लीना गांधी तिवारी यांचे नेतृत्व शांत, परिपक्व आणि दूरदृष्टी असलेले आहे. लीना गांधी सहसा प्रसिद्धीपासून दूर रहातात पण त्यांनी close केलेल्या 703 करोड च्या Highest Mumbai real estate deal मुळे त्या अचानक प्रकाश झोतात आल्या आहेत. एरवी कुठलाही गाजावाजा न करता आपल्या कामगिरीने समाजात स्थान निर्माण करणाऱ्या उद्योजिका म्हणून उद्योग जगतात त्या ओळखल्या जातात .

ग्रंथलेखन आणि साहित्यप्रेम

एक विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे लीना गांधी तिवारी या एक यशस्वी उद्योजिका असूनही त्यांना साहित्याची आवड आहे. त्या स्वतः लेखिका आहेत व त्यांनी ‘Beyond Pipes and Dreams’ हे पुस्तक लिहिले आहे, जे त्यांचे कुटुंब, व्यवसाय आणि मूल्यांबाबतचे विचार मांडते.


विचारांचा पिंगा

लीना गांधी तिवारी या एक यशस्वी महिला उद्योजिका आहेत व आपल्या गांधीवादी आजोबांचा उद्योग त्या नेटाने पुढे नेत आहेत. सामाजिक बांधिलकी म्हणून त्या अनेक सामाजिक उपक्रमांना सढळ हस्ते आर्थिक मदत करत असतात असे कळते. एकीकडे गांधी वादी विचारांचा वारसा आणि दुसरीकडे 703 करोड ची Highest Mumbai real estate deal करून महागडे घर घेणे हा एक विरोधाभास प्रथमदर्शनी दिसून येत असला तरी त्यांची उद्यमशीलता वाखाणण्याजोगी आहे हे मान्य करावे लागेल. त्यांनी कौटुंबिक वारसा पुढे नेत, त्यात नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून भारताला जागतिक पातळीवर मान्यता मिळवून दिली आहे. त्यांचे जीवन हे भारतीय तरुणींसाठी व तरुण उद्योजिकांसाठी प्रेरणादायी आहे.


हे ही वाचा

लीना गांधी या उद्योजक महिलेने वरळी सी फेस वर 703 कोटींचे घर-कशी झाली ऐतिहासिक खरेदी

About The Author

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment