Avinash Ghodke

Screenwriter and Lyricist with 20 years of experience in Bollywood and Marathi cinema.His creative writing examines the contradictions of lived experience, while his journalism uncovers humanism beneath headlines.

Instagram वर अमराठी बहिणींची वाजले की बारा लावणी one take मधे | unplugged धमाल

Instagram वर दुबे  बहिणींनीची unplugged धमाल| प्रसिद्ध मराठी लावणी वाजले की बारा चे ठसकेबाज ONE TAKE सादरीकरण 

Written by Avinash Bhanu Asha Ghodke 

झारखंड च्या शालिनी दुबे व श्रेया दुबे या बहिणींची Instagram वर मराठी लावणी

आपले खट्याळ व गमतीशीर सांगितिक  व्हिडिओ शालिनी व श्रेया Instagram वर पोस्ट करत असतात.झारखंड च्या या दोघा बहिणींना आपल्या पित्याकडून संगीत शिक्षा प्राप्त झाली आहे.  या मध्यमवर्गीय मुली संगीतात रमून‌ जातात व घरकामा दरम्यान ही एखादा सांगीतिक व्हीडिओ सहज बनवून पोस्ट करत असतात.

Tow sisters singing a song
Shalini and Shreya the Dubey sisters on Instagram 

सुरांशी मैत्री 

शालिनी व श्रेयाची  सुरांशी मैत्री झालीय व त्यांच्या मुक्तपणे सुरांशी खेळण्यावर काही रूढी वादी spoiler comment टाकून राग ही व्यक्त करतात. एका व्यक्तीने “एका जागी शांत बसून गाता येत नाही का ?” अशी कमेंट केली यावर दोघींनी गंभीर चेहरा करून स्तब्ध पणे खास त्यांच्यासाठी असे म्हणून एक गाणे गायले व “खूष?” असे विचारत त्याला शालजोडीतून मारले. या दोघी बहिणी  धीट आहेत व अशा spoiler लोकांना उत्तर ही त्या आपल्या गायकीतूनच देतात .

वाजले की बारा लावणी एका टेक मधे 

नुकतीच त्यांनी गाजलेल्या मराठी चित्रपट नटरंग ची प्रसिद्ध “वाजले की बारा” ही बेला शेंडे नी गायलेली‌ ठसकेबाज लावणी गावून Instagram वर शालिनी च्या  @theshalinidubey या Instagram account वर पोस्ट केली आहे जी लोकांना‌ खूप आवडली आहे. 

मराठी जनांकडून कौतुक 

भाषेतील काही चुका वगळता हे लावणी गायन फर्मास झाले आहे. अनेक मराठी जनांनी दोघींच्या या प्रयत्नाला मनापासून दाद दिली आहे.

  • जय महाराष्ट्र! 
  • झकास! 
  • तोंड गोड करा ! 

अशा अनेक स्तुती पूर्ण comment दोघींना मिळाल्या आहेत.

शालिनी व श्रेया दुबेची ही unplugged  वाजले की बारा लावणी एकदा शालिनी च्या @theshalinidubey या Insta account वर जाऊन ऐका.

शालिनी दुबे Zee Sa Re Ga Ma Pa च्या २०२३ सीझन मधे प्रतियोगी होती हे विशेष.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment