मौसमक्रिकेटऑपरेशन सिंदूरक्रिकेटस्पोर्ट्सबॉलीवुडजॉब - एजुकेशनबिजनेसलाइफस्टाइलदेशविदेशराशिफललाइफ - साइंसआध्यात्मिकअन्य

Avinash Ghodke

Screenwriter and Lyricist with 20 years of experience in Bollywood and Marathi cinema.His creative writing examines the contradictions of lived experience, while his journalism uncovers humanism beneath headlines.

पॅरिस च्या आयफेल टॉवर वर सायकल चढवणारा तरूण- Aureilen -Eiffel tower record

2 Oct 2025 ,भारतात दसरा साजरा होत असताना Paris मधे एका तरूणाने Eiffel tower वर सायकल चढवत विक्रमी असे vertical सीमोल्लंघन केले. ही सायकल चढ़ाई hopping पद्धतीने झाली.


Aureilen Fontenoy चा अविश्वसनीय Cycle hopping पराक्रम

Aureilen Fontenoy या तरुणाने आपल्या सायकलवर Eiffel tower चा दुसरा मजला अवघ्या 12 मिनिटे 30 सेकंदात Cycle hopping करत गाठून एक अभूतपूर्व Bycycle Record प्रस्थापित केला.
ही कामगिरी पॅरिससारख्या जगप्रसिद्ध शहरात घडल्याने संपूर्ण युरोपचं लक्ष त्याच्याकडे वळलं आहे.

पॅरिसमधील Eiffel Tower वरची सायकल चढाई

आयफेल टॉवरच्या 686 पायर्या तो hopping पद्धतीने चढत गेला. हे ऐकायला जितकं सोपं वाटतं तितकं प्रत्यक्षात ते धोकादायक आणि श्रमसाध्य होतं. प्रत्येक पायरीवर संतुलन राखत सायकलवर उडी मारत वर चढणे म्हणजे शरीर आणि मनाची खरी परीक्षा होती.
त्याने आपल्या X अकाउंटवर @LaTourEiffel या नावाने या संपूर्ण चढाईचा थरारक व्हिडिओ शेअर केला आहे.
“माझे खांदे आणि पाय खरंच फारच दुखत आहेत!” असे त्याने त्या पोस्टमध्ये नमूद केले आहे, आणि हा अनुभव किती कठीण होता याची प्रचिती त्यातून येते.

2 ऑक्टोबरचा ऐतिहासिक दिवस

2 ऑक्टोबर 2025 रोजी हा विक्रम नोंदवला गेला. योगायोगाने हाच दिवस भारतात दसरा सण आणि महात्मा गांधी जयंती म्हणून साजरा होत होता.
त्या दिवशी आयफेल टॉवर परिसरातील वातावरणात उत्साह आणि आश्चर्याची भावना होती — एक तरुण Eiffel tower च्या शिडीवर सायकलसह चढत होता आणि पाहणारे थक्क झाले होते.

Mountain Bycycle चा शक्तीप्रयोग

या विक्रमासाठी Aureilen ने All Terrain Mountain Bycycle प्रकारातील सायकलचा वापर केला. या सायकल्स विशेषतः खडकाळ आणि उंचसखल भागात वापरल्या जातात. पण या वेळेस ती सायकल स्टीलच्या Eiffel tower वर चढताना दिसली!
2002 सालचा जुना विक्रम मोडत त्याने सात मिनिटांनी कमी वेळेत दुसऱ्या मजल्यापर्यंत पोहोचण्याचं यश मिळवलं. हा विक्रम Bycycle Record च्या इतिहासात एक नवा अध्याय ठरला आहे.

अधिकृत मान्यता आणि तांत्रिक तपशील

Eiffel tower प्रशासनाने आणि अधिकृत कर्मचारी वर्गाने या विक्रमाची पुष्टी केली आहे. Fontenoy ने संपूर्ण चढाई दरम्यान एकदाही पाय जमिनीवर टेकवला नाही.
त्याने सायकलचे ब्रेक लॉक करून प्रत्येक उडी अचूकतेने घेतली.
हॉपिंग पद्धतीमध्ये प्रत्येक पायरीवर सायकलसकट वर उडी मारत पुढे जाणे आवश्यक असते — आणि तो हा क्रम अखेरपर्यंत टिकवू शकला.

प्रेरणा आणि निष्कर्ष

Aureilen Fontenoy चा हा पराक्रम केवळ Eiffel tower पुरता मर्यादित नाही, तर तो मानवी इच्छाशक्तीचा आणि चिकाटीचा प्रतीक आहे.
त्याने दाखवून दिलं की योग्य तयारी, सातत्य आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होऊ शकतात.
पॅरिसच्या या युवा सायकलिस्टने जगभरातील सायकलप्रेमींना प्रेरणा दिली आहे आणि पुढील काळात Mountain Bycycle स्पोर्ट्सकडे नव्या दृष्टीने पाहायला भाग पाडलं आहे.


हे ही वाचा: भोपाळ मधे वकीली करतोय फ्रेंच राजा नेपोलियन 4

About The Author

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment