French king in Bhopal – राजघराण्यातील कथा आपण ऐतिहासिक चित्रपटांत किंवा कादंबऱ्यांमध्ये वाचतो. अशीच एक French Royalty ची खरीखुरी कथा, भारताशी थेट नाते सांगते. हे Indo-French Connection चकित करणारे आहे. भोपाळ मध्ये वकीली करणारे मध्यमवर्गीय Advocate बाल्थझार-नेपोलियन चौथे (Balthazar Napoleon IV de Bourbon) यांची ही विस्मयकारक गोष्ट..
एक फ्रेंच राजपुत्र समुद्र मार्गे भारतात पोहोचला होता
फ्रान्सच्या बोर्बोन (Bourbon) राजघराण्याचा इतिहास जगभर प्रसिद्ध आहे. याच घराण्यातील Jean Philippe de Bourbon हा राजा हेन्री चौथा (King Henry IV) याचा चुलतभाऊ, सुमारे इ.स. 1560 च्या सुमारास भारतात सर्वप्रथम गोवा येथे आला.त्या काळी फ्रान्समध्ये सत्तासंघर्ष, धर्मयुद्धं आणि राजकीय अस्थिरता सुरू होती. सत्तेसाठी चाललेली कट कारस्थाने व जीव घेणे हल्ले यातून वाचण्यासाठी हा तरुण राजपुत्र भारतात पोहोचला आणि त्याने भारतात निर्माण केला एक वेगळाच French king in Bhopal चा अध्याय!
सम्राट अकबराच्या पदरी सल्लागार म्हणून नियुक्ती
त्या काळी भारतावर मुघल साम्राज्य प्रस्थापित होते.एक तेजस्वी तारा चमकत होता .. सम्राट अकबर!. सम्राट अकबर केवळ एक विजेता नव्हता; तो विविध धर्म आणि संस्कृतींना आपल्यात सामावून घेणारा “सर्वधर्मसमभाव” भारतात रुजवू पहात होता.सम्राट अकबर सर्व धर्म आणि वंशाना समान वागणूक देत असे. अकबराच्या दरबारात जगभरातून आलेले शास्त्रज्ञ, कवी आणि रणनीतीकार उपस्थित असत. भारतात Goa येथे पोहोचल्यावर अकबर बादशहा ची कीर्ती Jean Philippe de Bourbon च्या कानी पडली. Jean ने आता थेट भोपाळ गाठले व तोही अकबर दरबारी रुजू झाला. पुढे त्याने अकबराच्या विश्वासास पात्र ठरून दरबारी उच्च पदे स्वीकारली.अनेक इतिहासकारांच्या मते, Jean Philippe ने दरबारात मुत्सद्दी व लष्करी सल्लागार म्हणून कार्य केलं. अशा प्रकारे Bhopal history मध्ये त्याच्या नावाने नोंदलेली ही घटना ‘Indo-French Connection’ चा आरंभ बिंदू ठरली.
Bhopal Bourbons– फ्रेंच राजवंशाचा भारतीय वारसा
Jean Philippe नंतर त्याचे वंशज भोपाळ प्रदेशात स्थायिक झाले. स्थानिक समाजात मिसळून त्यांनी भारतीय जीवनपद्धती स्वीकारली, पण आपल्या French राजवंशाची परंपरा ही जपली.त्यांच्या कुटुंबाची कहाणी पुढे जाऊन “Bhopal Bourbons” या नावाने ओळखली जाऊ लागली.भोपाळ चा इतिहास सांगतो की या शहरात परकीय वंशाची अनेक पाळेमुळे आहेत . मुघल, अफगाण, मराठे, ब्रिटिश .. आणि त्याचबरोबर फ्रेंच वंशाचं बीजही इथे रुजलं आहे.
460 वर्षांची परंपरा असलेला – भोपाळ मधील आजचा Bourbon वारसा

आज जवळजवळ ४६० वर्षांनंतर, Jean Philippe चा वंशज अजूनही भोपाळमध्ये राहतो. त्यांचे नाव आहे श्री. बाल्थझार नेपोलियन 4 दे बोर्बोन (Balthazar Napoleon IV de Bourbon).ते व्यवसायाने वकील आहेत, परंतु त्यांच्या मनात फ्रेंच राजवंशीय असल्याची एक सुप्त जाणिव ही आहे . ते स्वतःला फ्रान्सच्या लोप पावलेल्या राजसिंहासनाचे खरे वारसदार मानतात. भोपाळ मध्ये वकिली करणारे बाल्थझार नेपोलियन चौथे हे आज एक साधारण मध्यमवर्गीय आयुष्य जगत आहेत.त्यांच घर साधं असलं तरी आतल्या भिंतींवर फ्रेंच प्रतीकं, जुन्या छायाचित्रांचा संग्रह आणि पूर्वजांच्या आठवणी त्यांनी जिवंत ठेवल्या आहेत. वकिली व्यतिरिक्त ते शेतीही करतात. पत्नी व तीन मुले असे त्यांचे कुटुंब आहे.त्यांच्या दोन्ही मुलांना इतिहासात अजिबात रस नाही . आपल्या फ्रेंच राजवंशाबद्ल त्याना कुठलीही उत्सुकता नाही हे विशेष.
French king in Bhopal ला युरोपकडून मान्यता
युरोपमधील Prince Michael of Greece (प्रिन्स फिलिप – ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ यांच्या पती यांचे चुलतभाऊ) हे 2006 साली सफरीनिमित्त भोपाळ शहरी आले होते. भोपाळ मधील एका हॉटेलमध्ये त्यांनी वास्तव्य केले . त्यांची एका विशेष अशा स्वीट मध्ये राहण्याची व्यवस्था केली होती. या विशेष स्वीटला ‘Bourbon’ असे नाव दिलेले त्यांनी पाहिले. “फ्रेंच राज घराण्याची हे नाव इथे कसे” असे त्यांना कुतूहल वाटले. त्यांनी चौकशी केली असता त्यांना असे कळले की Bhopal Bourbon नावाचे एक प्रसिद्ध कुटुंब भोपाळ मध्ये आहे व फ्रेंच राजघराण्याशी आपला संबंध आहे असा त्या कुटुंबाचा दावा आहे.
प्रिन्स फिलीप यांनी त्वरित या कुटुंबाशी संपर्क केला व अधिक माहिती गोळा केली. या कुटुंबाचा दावा त्यांना विश्वसनीय वाटला. सहसा युरोपियन राजघराण्याकडून अशा दाव्यांना मान्यता मिळत नाही . पण प्रिन्स मायकल (Greece) याने मात्र French king in Bhopal ही एक सत्यकथा असल्याचे मान्य Prince Michael of Greece याने सर्व माहिती वर रिसर्च करून या माहिती वर आधारित एक पुस्तक ही लिहिले आहे. Le Rajah Bourbon हे त्या पुस्तकाचे नाव व ते Amazon वर उपलब्ध आहे .

फ्रान्सच्या Palace of Versailles वर भोपाळ च्या वकीलाचा हक्क?
सध्या Bourbon राजवंशाच्या फ्रान्सच्या Versailles place मधे लुईस अल्फान्सो दे बोरबॉन हे फ्रेंच राजकुमार रहात आहेत. तसे पाहिले तर फ्रेंच राज्यक्रांतीनंतर राजेशाही चा आता अस्त झाला आहे. पण राजप्रसादांची स्मृती चिन्हे अजूनही फ्रान्स ने जपली आहेत. Bourbon राजवंशाचे शाही वारसदार म्हणून भोपाळचे वकील Balthazar Napoleon IV de Bourbon हे या प्रसादांवर आपला हक्क सांगतील का? हा प्रश्न अनुत्तरित आहे.
भोपाळ च्या या Bhopal Bourbon अर्थात बाल्थझार नेपोलियन चौथे यांना प्रिंस मायकल यांनी सन्मान पूर्वक फ्रांस भेटीस बोलावले होते. असे असले तरी बाल्थझार यांची भारत सोडून कायमचे फ्रान्सला जाण्याची अजिबात इच्छा नाही. ते स्वतःला भारतीय समजतात. 2008 ला L A Times ला दिलेल्या एका मुलाखतीत ते म्हणाले…” मी भारतात जन्मलो पण माझे नाते french Royal family बरोबर आहे ही एक वस्तुस्थिती आहे!”
राजघराण्यांची पुरातन अद्भुत रम्यता आणि आजचे वास्तव
भोपाळसारख्या शहरात राहणारा एक मध्यमवर्गीय वकील स्वतःला फ्रेंच सिंहासनाचा वारसदार मानतो आणि युरोपमधील राजघराणीही त्याच्या दाव्याला दुजोरा देतात ही गोष्ट अद्भुत आहे . इतिहास, राजघराणी आणि भारतातील परदेशी वारसा या सगळ्यांचा संगम म्हणजे Bourbon घराण्याची ही भोपाळची कहाणी.
कधी तुम्ही भोपाळला गेलात, तर लक्षात ठेवा , तिथे कुठेतरी अजूनही एक ” फ्रेंच राघराण्याचा” वंशज जगतो आहे.त्या शहराच्या हवेत अजूनही फ्रेंच सुगंध मिसळलेला आहे, आणि Bhopal history च्या पानांवर Bourbon घराण्याचं नाव अजूनही जिवंत आहे. ही आहे भारताशी समरस झालेली व इथल्या मातीत रुजलेली French King in Bhopal ची अद्भुत गोष्ट.
हे ही वाचा
▶️संत तुकाराम आणि शेक्सपियर यांचे आठ वर्षांचे समकालिनत्व
▶️छत्रपती शिवाजी महाराज यांचा आग्रा ते राजगड परतीचा प्रवास कसा झाला होता
▶️चुपके चुपके रात दिन गझल लिहिणारे मौलाना हसरत मोहानी कृष्णाचे परम भक्त होते

सुंदर माहिती मिळाली👍
Thanks a lot
Thanks 🙏
अद्भुतरम्य माहिती
धन्यवाद