मौसमक्रिकेटऑपरेशन सिंदूरक्रिकेटस्पोर्ट्सबॉलीवुडजॉब - एजुकेशनबिजनेसलाइफस्टाइलदेशविदेशराशिफललाइफ - साइंसआध्यात्मिकअन्य

Avinash Ghodke

Screenwriter and Lyricist with 20 years of experience in Bollywood and Marathi cinema.His creative writing examines the contradictions of lived experience, while his journalism uncovers humanism beneath headlines.

बलुचिस्तानात दक्षिण भारतीय Brahui भाषा बोलणारे पठान – 20 लाख बलोच आहेत भारतीय द्रविडांचे पूर्वज..

Brahui- ब्राहुयी -एक पुरातन भाषा

भारताचा दक्षिण भाग म्हणजे तमिळनाडू, आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि केरळ – इथे बोलल्या जाणाऱ्या द्रविडी भाषांमध्ये तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम प्रमुख आहेत. परंतु या भाषांच्या समूहातील एक महत्त्वाची आणि वेगळी भाषा पाकिस्तानात बलूच प्रांतात बोलली जाते . *Brahui (ब्राहुई)* बद्दल ची ही बाब अनेकांच्या मनात आश्चर्य निर्माण करते की द्रविडी भाषासमूहातील एक भाषा बलुचिस्तान मध्ये, अफगाणिस्तानच्या सीमेपासून हाकेच्या अंतरावर, कशी काय अस्तित्वात राहिली? हे समजून घेण्यासाठी आपल्याला इतिहास, स्थलांतर, भाषाविकास आणि लोकसांख्यिकी या सगळ्या अंगांनी विचार करावा लागेल.

1. ब्राहुईची ओळख

ब्राहुई-Brahui ही एक द्रविडी भाषा असून ती पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात बोलली जाते. मुख्यतः क्वेटा, कालात, खुजदार, मस्तुंग या परिसरात ब्राहुई भाषिक वस्ती आहे. ब्राहुई भाषकांची संख्या सुमारे *२० लाखांच्या आसपास* असल्याचे मानले जाते.ब्राहुयी भाषेचे व्याकरण, मूळ शब्द आणि भाषिक रचना ही द्रविडी भाषांच्या प्रमुख वैशिष्ट्यांशी जुळणारी आहे. तथापि, ब्राहुई भाषेत प्रचंड प्रमाणात फारसी, उर्दू, बलुची व अरबी शब्द मिसळलेले आहेत, कारण या भाषा त्या परिसरात प्रभावी आहेत.

2. ब्राहुईचा उगम

दोन प्रमुख मते

A. पुरातन स्थलांतर सिद्धांत (Prehistoric Migration Theory

या मतानुसार, पाकिस्तानात ब्राहुई भाषा बोलणारे हे द्रविडी भाषिकांचे पूर्वज आहेत जे भारताच्या उत्तर-पश्चिमेकडील प्रदेशात प्राचीन काळातच स्थायिक झाले.द्रविडी भाषांचा विस्तार सिंधू खोऱ्यातही होता, असे काही विद्वान मानतात. इ.स.पू. 2500 ते 1500 या काळात आर्य लोक भारतात आले, त्यानंतर द्रविड भाषिक दक्षिण भारतात स्थलांतरित झाले. काही समूह मात्र *बलुचिस्तान-सिंध* या भागातच थांबले आणि काळानुसार वेगळी ओळख निर्माण झाली – यालाच ब्राहुई म्हणतात.

B. उलट स्थलांतर सिद्धांत (Reverse Migration Theory)

काही अभ्यासकांचे मत आहे की ब्राहुई ही भाषा दक्षिण भारतातून इस्लामपूर्व काळात स्थलांतर करून आलेल्या द्रविडी भाषिक लोकांनी या भागात आणली. म्हणजेच ही भाषा दक्षिणेतून उत्तर-पश्चिमेला गेली. परंतु या मताला पुरावा कमी आहेत.

3. Brahui भाषेतील द्रविडी लक्षणं

ब्राहुई भाषेत खालील द्रविडी वैशिष्ट्ये दिसून येतात:

अभयसूचक क्रियापद (Negative Verb Structure)

अंत्यप्रत्ययांवर आधारित व्याकरण (Suffix-based Grammar)

लिंग आणि वचन दर्शविणारी विशेष रचना -उदाहरणार्थ, तमिळ व कन्नडप्रमाणेच ब्राहुईत “मा” (नाही) हा नकारार्थी शब्द क्रियापदात अंतर्भूत होतो.

4. पाकिस्तानातील ब्राहुयी भाषा लुप्ततेच्या मार्गावर

पाकिस्तानातील ब्राहुई भाषिक बहुसंख्यपणे मुस्लिम आहेत. ते *बलुच जातीच्या अंतर्गत* गटात मोडतात, पण भाषेच्या बाबतीत ते पूर्णपणे वेगळे आहेत. ब्राहुई भाषक घरात ही ब्राहुयी भाषा वापरतात, पण शिक्षण आणि व्यवहारासाठी उर्दू किंवा बलुची वापरतात. त्यामुळे ब्राहुईचा प्रभाव बलूचीस्तान मधे हळूहळू कमी होत चालला आहे.आज ब्राहुईसाठी रेडिओ कार्यक्रम, स्थानिक वृत्तपत्रं आणि अभ्याससंस्था कार्यरत आहेत, पण तरीही ही भाषा लुप्त होण्याच्या मार्गावर आहे असेही काही विद्वान मानतात.

5. ब्राहुई – एक भाषिक जीवाश्म

भाषावैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहता ब्राहुई ही एक *लिव्हिंग लिंग्विस्टिक फॉसिल* (Living Linguistic Fossil) आहे. कारण द्रविडी भाषांचा असा प्राचीन अवशेष भारताच्या बाहेर आणि सिंधूच्या पलीकडे सापडणं म्हणजे भाषेच्या इतिहासातील एक अद्भुत उदाहरण आहे.

निष्कर्ष

ब्राहुई Brahui ही भाषा केवळ भाषाशास्त्रीय दृष्टिकोनातून नव्हे तर ऐतिहासिक, मानववंशशास्त्रीय आणि सामाजिक दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्त्वाची आहे. ही भाषा पाकिस्तानात का आणि कशी टिकून राहिली, याचे उत्तर आपल्याला सिंधू संस्कृतीच्या उत्तरार्धात आणि भारतीय उपखंडातील स्थलांतरांमध्ये सापडते.ब्राहुई ही भाषा द्रविडी भाषा संस्कृती ची अवकाशातला तुटलेला तारा आहे जो बलुचिस्तानात अंधुक प्रकाशात आजही जिवंत आहे.

सूचना

या विषयावर अधिक अभ्यासासाठी आपण “David McAlpin”, “Emeneau”, “Burrow” यांसारख्या भाषाशास्त्रज्ञांचे लेखन वाचू शकता.

हे ही वाचा

About The Author

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment