Avinash Ghodke

Screenwriter and Lyricist with 20 years of experience in Bollywood and Marathi cinema.His creative writing examines the contradictions of lived experience, while his journalism uncovers humanism beneath headlines.

डॉ.आंबेडकरांनी नागा संस्कृतीचे अस्तित्व भारतभर मानले – कारण दक्षिण भारतातील एक द्रविडी भाषा थेट बलुचिस्तानात बोलली जाते..

भारताचा दक्षिण भाग म्हणजे तमिळनाडू, आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि केरळ इथे बोलल्या जाणाऱ्या द्रविडी भाषांमध्ये तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम प्रमुख आहेत. परंतु या भाषांच्या समूहातील एक महत्त्वाची आणि वेगळी भाषा पाकिस्तानात बलूच प्रांतात बोलली जाते . Dr Babasaheb Ambedkar यांनी याच तथ्यावर एक वांशिक सिद्धांत मांडला आहे.

Brahui- ब्राहुयी -एक पुरातन भाषा

Brahui (ब्राहुई) बद्दल ची ही बाब अनेकांच्या मनात आश्चर्य निर्माण करते की द्रविडी भाषासमूहातील एक भाषा बलुचिस्तान मध्ये, अफगाणिस्तानच्या सीमेपासून हाकेच्या अंतरावर, कशी काय अस्तित्वात राहिली? हे समजून घेण्यासाठी आपल्याला इतिहास, स्थलांतर, भाषाविकास आणि लोकसांख्यिकी या सगळ्या अंगांनी विचार करावा लागेल.(Dravidian language in Baluchistan)

ब्राहुईची ओळख

ब्राहुई-Brahui ही एक द्रविडी भाषा असून ती पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात बोलली जाते. मुख्यतः क्वेटा, कालात, खुजदार, मस्तुंग या परिसरात ब्राहुई भाषिक वस्ती आहे. बलूच संस्कृती मधे आपले भाषिक वेगळेपण जपणार्या ब्राहुयी भाषकांची संख्या सुमारे २० लाखांच्या आसपास असल्याचे मानले जाते.ब्राहुयी भाषेचे व्याकरण, मूळ शब्द आणि भाषिक रचना ही द्रविडी भाषांच्या प्रमुख वैशिष्ट्यांशी जुळणारी आहे. तथापि, ब्राहुई भाषेत प्रचंड प्रमाणात फारसी, उर्दू, बलुची व अरबी शब्द मिसळलेले आहेत, कारण या भाषा त्या परिसरात प्रभावी आहेत.

ब्राहुईचा उगम – दोन प्रमुख मते

A. पुरातन स्थलांतर सिद्धांत (Prehistoric Migration Theory )

या मतानुसार, पाकिस्तानात ब्राहुई भाषा बोलणारे हे द्रविडी भाषिकांचे पूर्वज आहेत जे भारताच्या उत्तर-पश्चिमेकडील प्रदेशात प्राचीन काळातच स्थायिक झाले.द्रविडी भाषांचा विस्तार सिंधू खोऱ्यातही होता, असे काही विद्वान मानतात. इ.स.पू. 2500 ते 1500 या काळात आर्य लोक भारतात आले, त्यानंतर द्रविड भाषिक दक्षिण भारतात स्थलांतरित झाले. काही समूह मात्र बलुचिस्तान-सिंध या भागातच थांबले आणि काळानुसारया समुदायाची वेगळी सांस्कृतिक ओळख निर्माण झाली.(Dravidian language in Baluchistan)

B. उलट स्थलांतर सिद्धांत (Reverse Migration Theory)

काही अभ्यासकांचे मत आहे की ब्राहुई ही भाषा दक्षिण भारतातून इस्लामपूर्व काळात स्थलांतर करून आलेल्या द्रविडी भाषिक लोकांनी या भागात आणली. म्हणजेच ही भाषा दक्षिणेतून उत्तर-पश्चिमेला गेली. परंतु या मताला पुरावा कमी आहेत.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णपणे वेगळा सिद्धांत – Dr. Babasaheb Ambedkar theory

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या Untouchables या पुस्तकातील ७ व्या प्रकरणात प्रामुख्याने ‘वांशिक सिद्धांत’ (Racial Theory) खोडून काढण्यासाठी ब्राहुई भाषेचा आधार घेतला आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी या भाषे संदर्भात मांडलेली प्रमुख तथ्ये खालीलप्रमाणे आहेत..

ब्राहुयी बोलणारे द्रविड व नागा हे एकच

पाश्चात्त्य इतिहासकारांचा असा दावा होता की, आर्य हे उत्तर भारतात आले आणि त्यांनी मूळच्या द्रविड लोकांना दक्षिण भारतात हाकलून लावले. हा दावा खोडून काढताना बाबासाहेबांनी लिहिले की, ‘द्रविड’ आणि ‘नागा’ हे एकाच समुदायाच्या लोकांची दोन वेगळी नावे आहेत. द्रविड लोक केवळ दक्षिण भारतातच नव्हे, तर आर्यांच्या आगमनापूर्वी संपूर्ण उत्तर आणि दक्षिण भारतात पसरलेले होते.

द्रविड संस्कृतीचे लोक उत्तर भारतात ही होते- (Dravidian language in Baluchistan)

उत्तर भारतात द्रविड (नागा) संस्कृती अस्तित्वात होती, हे सिद्ध करण्यासाठी बाबासाहेबांनी बलुचिस्तानच्या सीमेवर बोलल्या जाणाऱ्या ‘ब्राहुई’ (Brahui) भाषेचा दाखला दिला.

सिंध आणि बलुचिस्तानच्या दुर्गम भागात आढळणारी ब्राहुई भाषा हा या गोष्टीचा जिवंत पुरावा आहे की, द्रविड वंश एकेकाळी मध्य आशियाच्या वेशीपासून ते सिंधू नदी ओलांडून उत्तर भारतापर्यंत पसरला होता. म्हणजेच, भाषा किंवा वंशाच्या आधारावर उत्तर भारतीय (आर्य) आणि दक्षिण भारतीय (द्रविड) किंवा अस्पृश्य यांच्यात कोणताही मूलभूत ‘वांशिक फरक’ (Racial Difference) नाही. सर्व भारतीय एकाच मूळ वंशाचे आहेत, हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी ब्राहुई भाषेचा एक भक्कम ऐतिहासिक दुवा म्हणून वापर केला

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे Brahui भाषे संदर्भातील विवेचन आपण खालील मूळ इंग्रजी पुस्तकातच्या मराठी आवृत्तीतील पानावर वाचू शकता 👇

डॉ.आंबेडकरांनी नागा संस्कृतीचे अस्तित्व भारतभर मानले - कारण दक्षिण भारतातील एक द्रविडी भाषा थेट बलुचिस्तानात बोलली जाते..

Brahui भाषेतील द्रविडी लक्षणं

ब्राहुई भाषेत खालील द्रविडी वैशिष्ट्ये दिसून येतात:

अभयसूचक क्रियापद (Negative Verb Structure)

अंत्यप्रत्ययांवर आधारित व्याकरण (Suffix-based Grammar)

लिंग आणि वचन दर्शविणारी विशेष रचना -उदाहरणार्थ, तमिळ व कन्नडप्रमाणेच ब्राहुईत “मा” (नाही) हा नकारार्थी शब्द क्रियापदात अंतर्भूत होतो.

पाकिस्तानातील ब्राहुयी भाषा लुप्ततेच्या मार्गावर

पाकिस्तानातील ब्राहुई भाषिक बहुसंख्यपणे मुस्लिम आहेत. ते बलुच जातीच्या अंतर्गत गटात मोडतात, पण भाषेच्या बाबतीत ते पूर्णपणे वेगळे आहेत. Brahui भाषक पठाण लोक घरात बोलताना ही ब्राहुयी भाषा वापरतात, पण शिक्षण आणि सामाजिक व्यवहारासाठी उर्दू किंवा बलुची वापरतात. त्यामुळे ब्राहुईचा प्रभाव बलूचीस्तान मधे हळूहळू कमी होत चालला आहे.आज ब्राहुईसाठी रेडिओ कार्यक्रम, स्थानिक वृत्तपत्रं आणि अभ्याससंस्था कार्यरत आहेत, पण तरीही ही भाषा लुप्त होण्याच्या मार्गावर आहे असेही काही विद्वान मानतात.

ब्राहुई – एक भाषिक जीवाश्म

भाषावैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहता ब्राहुई ही एक जीवंत जीवाश्म (Living Linguistic Fossil) आहे. कारण द्रविडी भाषांचा असा प्राचीन अवशेष भारताच्या बाहेर आणि सिंधूच्या पलीकडे सापडणं म्हणजे भाषेच्या इतिहासातील एक अद्भुत उदाहरण आहे.

भाषा ही संस्कृती ..

दक्षिणेपासून हजारो मैलाच्या अंतरावर बलूचिस्तानात एक द्रविड भाषा आजही बोलली जाते हे मोठे आश्चर्य आहे.(Dravidian language in Baluchistan)

Brahui ही भाषा केवळ भाषाशास्त्रीय दृष्टिकोनातून नव्हे तर ऐतिहासिक, मानववंशशास्त्रीय आणि सामाजिक दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्त्वाची भाषा आहे. ही भाषा पाकिस्तानात का आणि कशी टिकून राहिली यामागे सामाजिक कारणांबरोबरच सांस्कृतिक व भावनिक कारणे ही आहेत. माणुस आपली संस्कृती पिढ्यानपिढ्या कशी जपून ठेवतो याचे Brahui भाषा हे एक अद्भुत उदाहरण आहे.

टीप:

या विषयावर अधिक अभ्यासासाठी आपण “David McAlpin”, “Emeneau”, “Burrow” यांसारख्या भाषाशास्त्रज्ञांचे लेखन वाचू शकता. तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या UNTOUCHABLES या पुस्तकात ही एका प्रकरणात याबाबत उहापोह आहे.


हे ही वाचा:

➡️Fa9la-Trending गाण्याचे title विचित्र वाटते? यातील 9 आकड्याचा अर्थ काय आहे?जाणून घ्या

➡️Akshay Khanna-धुरंधर ची stylish entry आणि Zurna चे स्वर-Zurna या अरबी वाद्याचा इतिहास जाणून घ्या

About The Author

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

7 thoughts on “डॉ.आंबेडकरांनी नागा संस्कृतीचे अस्तित्व भारतभर मानले – कारण दक्षिण भारतातील एक द्रविडी भाषा थेट बलुचिस्तानात बोलली जाते..”

Leave a Comment