मौसमक्रिकेटऑपरेशन सिंदूरक्रिकेटस्पोर्ट्सबॉलीवुडजॉब - एजुकेशनबिजनेसलाइफस्टाइलदेशविदेशराशिफललाइफ - साइंसआध्यात्मिकअन्य

Avinash Ghodke

Screenwriter and Lyricist with 20 years of experience in Bollywood and Marathi cinema.His creative writing examines the contradictions of lived experience, while his journalism uncovers humanism beneath headlines.

माहूल ची पुनर्वसन वसाहत : माणसांना संपवणारं विषारी Dumping ground?


माहुलची विषारी हवा… असहाय गरीबांचा श्वास

माहुलच्या pollution मधे… गुदमरत आहे गरीबांचे जीवन

मुंबईच्या माहुल भागातील प्रदूषणामुळे स्थलांतरित स्लम-वासीयांचे हाल.त्यांच्या जीवावर बेतलय प्राणघातक संकट

माहुलची पार्श्वभूमी

माहुल… मुंबईच्या चेंबूर-ट्रॉंबे भागातील एक औद्योगिक क्षेत्र. पूर्वी हा प्रदेश मच्छिमारांचे गाव होते.समुद्राला खेटून असलेला हा भूभाग. पण गेल्या काही दशकांत येथे भारतीय तेल निगम, हिंदुस्तान पेट्रोलियम, राष्ट्रीय रासायनिक आणि खत कंपनी(RCF), टाटा पॉवर सारख्या मोठमोठ्या कंपन्यांनी कारखाने उभे केले आहेत. या उद्योगांमुळे इथले हवा आणि पाणी अत्यंत प्रदूषित झाले आहे. परिसरातील जैवविविधता धोक्यात आली आहे.

३०,००० हून अधिक झोपडपट्टी वासीयांना मुंबईतील विविध भागातून हलवून Central Pollution Board ने ठरवलेल्या या “Critically Polluted” भागात स्थलांतरित करण्यात आले आहे. कारण? तानसा पाइपलाइनभोवतीची जागा मोकळी करणे आणि बाइक लेनची योजना.

प्रदूषणाचे स्वरूप

वायु प्रदूषण

माहुल(Mahul, Mumbai Rehab Camp)परिसरातील हवेत बेंझिन, टोल्युएन, झायलिन, निकेल आणि बेंझोपायरीन सारख्या जहरील्या रसायनांचे प्रमाण धोकादायक पातळीवर आहे. या रसायनांमुळे श्वासोच्छ्वासाच्या तक्रारी, त्वचेचे आजार, डोळ्यात जळजळ, केस गळणे, उलट्या आणि घशात खवखवणे सारख्या आजारांना बळी पडण्याची शक्यता वाढते.

माहुलमधील आरोग्य समस्यांचे सर्वेक्षण

आजाराचे प्रकारलोकसंख्येची टक्केवारी
दर महिन्यात तीन वेळा श्वासोच्छ्वासाचा त्रास६७.१%
डोळ्यात जळजळ८६.६%
घशात खवखवणे किंवा गुदमरणे८४.५%
त्वचेचे आजार७०%

स्रोत: केईएम रुग्णालयाचे सर्वेक्षण (2013)

जल प्रदूषण

माहुलमध्ये पिण्याच्या पाण्यात तेलाचा थर आढळून आला आहे. अनेकांना पोटाचे आजार आणि संसर्ग होत आहेत. पाणी उकळून पिण्यास भाग पाडले जाते. हे पाणी पिण्यायोग्य नसल्याचे सर्वांना माहीत असूनही पर्याय नसल्यामुळे लोक याच पाण्यावर अवलंबून आहेत.

“आमच्या मुलांना सतत खोकला येतो. डोळ्यात जळजळ होते. आम्ही रोज उठतो तेव्हा काय नवीन आजार होईल या भीतीनेच. आमचं जगणंच अवघड झालंय.” – माहुलमधील एक रहिवाशी

स्थलांतरित झालेल्या लोकांची दयनीय स्थिती

स्थलांतराची कारणे

मुंबईतील तानसा पाइपलाइन, मेट्रो, रस्ते रुंदीकरण आणि इतर अनेक उपक्रमांसाठी स्लमवासीयांची घरे पाडण्यात आली. त्यांना पर्यायी आवास म्हणून माहुलमध्ये पाठवण्यात आले. अंदाजे ३०,००० लोकांना या भागात स्थलांतरित करण्यात आले आहे.

आवासीय परिस्थिती

माहुलमध्ये(Mahul, Mumbai Rehab Camp) ७२ सात मजली इमारती आहेत. या इमारती अनियोजित पद्धतीने बांधल्या गेल्या आहेत. त्यामुळे येथे हवामार्ग आणि सूर्यप्रकाशाची कमतरता आहे. गटारव्यवस्था अयोग्य आहे. अरुंद अशा रस्त्यांमध्ये गटारांचे पाणी वाहत असते. कचरा आणि मलव्यवस्थापनाची सोय अतीशय अपुरी आहे.

आरोग्यावर होणारे परिणाम

येथे राहत असताना अत्तापर्यंत किमान ८८ लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.(हां आकडा दुर्दैवाने जास्त ही असू वक्तों) केईएम रुग्णालयाच्या सर्वेक्षणानुसार, ६७.१% लोकांना दरमहा तीनपेक्षा जास्त वेळा श्वासोच्छ्वासाचा त्रास इथे होतो.

महुल समस्येची मुख्य कारणे आणि परिणाम

कारणेपरिणाम
औद्योगिकीकरणवायु आणि जल प्रदूषण
घनदाट वस्तीआरोग्य समस्या
मूलभूत सोयींची कमतरताशिक्षण आणि आरोग्य सेवांपासून वंचित
वाहतूक समस्यानोकरीच्या संधींची कमतरता
“आम्हाला वाटलं होतं सरकार आमच्या कल्याणासाठी काहीतरी करत आहे. पण आम्हाला जणू मृत्युच्या दाढेत ढकलण्यात आलंय. आमच्या मुलांचं भविष्य अंधारात आहे.” – महुलमधील एक आई

न्यायालयीन आणि प्रशासकीय कारवाई

न्यायालयीन हस्तक्षेप

२००९ मध्ये बॉम्बे उच्च न्यायालयाने तानसा पाइपलाइनभोवती १० मीटर जागा मोकळी करण्याचे आदेश दिले. २०१५ मध्ये राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (NGT) माहुल हा मानवी वस्तीसाठी अनुपयुक्त आहे असे जाहीर केले. २०१८ मध्ये उच्च न्यायालयाने माहुलमध्ये अधिक लोकांची स्थलांतरे करण्याविरुद्ध आदेश दिला.

प्रशासकीय प्रतिक्रिया

उच्च न्यायालयाच्या आदेशा नंतर म्हाडाने ३०० कुटुंबांना गोराई येथे घरे देण्याचे आश्वासन दिले, परंतु बिल्डरच्या उदासीनतेमुळे घरांना अजून ओसी मिळालेली नाही. बीएमसी ने थोडीफार कारवाई केली आहे पण ती दूषित पाण्यापुरती मर्यादित व नगण्य अशी आहे. राज्य सरकारने स्थलांतरित करण्याचे आश्वासन दिले असले तरी प्रत्यक्षात काहीच झालेले नाही.

न्यायालयीन आदेश असूनही प्रशासनाने या समस्येकडे दुर्लक्ष केले आहे. रहिवाशांना त्यांच्या मूलभूत हक्कांपासून वंचित ठेवण्यात आले आहे.

नागरी संघटना आणि विरोध

माहुलच्या (Mahul, Mumbai Rehab Camp)रहिवाशांनी ‘जीवन बचाओ आंदोलन’ सुरू केले आहे. सामाजिक कार्यकर्ते मेधा पाटकर यांच्या नेतृत्वात Ghar Bachao Ghar Banao Andolan सारख्या संघटनांनी याविरुद्ध आवाज उठवला आहे. रहिवाशांनी अनेक वेळा निषेध मोर्चे काढले आहेत आणि सरकारचे त्यांच्या समस्येकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.

“ही केवळ घरांची लढाई नाही, तर जगण्याच्या मूलभूत हक्कासाठीची लढाई आहे. आम्ही श्वास घेण्यासाठी स्वच्छ हवा, पिण्यासाठी स्वच्छ पाणी आणि राहण्यासाठी सुरक्षित वातावरण मागत आहोत.” – सामाजिक कार्यकर्ते

निष्कर्ष

माहुलमधील critical pollution परिस्थिती ही मुंबईसारख्या महानगरातील गरीब घटकांसमोरील आव्हानांवर प्रकाश टाकते. केवळ घरे देणे पुरेसे नसून, रहिवाशांच्या आरोग्यासाठी, शिक्षणासाठी आणि रोजगारासाठी योग्य अशा परिस्थितीची निर्मिती करणे आवश्यक आहे. पर्यावरणीय दृष्टीने घातक अशा भागात लोकांची स्थलांतरे करण्याऐवजी त्यांना योग्य पुनर्वसन देणे गरजेचे आहे.

या समस्येकडे दुर्लक्ष करणे म्हणजे मानवी जीवनाची किंमत कमी लेखणे आहे. सरकारने संवेदनशीलतेने आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून योजना राबवाव्यात. प्रत्येक मानवाला स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी आणि सुरक्षित निवारा मिळणे हा त्याचा मूलभूत अधिकार आहे.

हे ही वाचा

राजकारणात Relegion चा वापर – अग्निपथ चा महा-खलनायक कांचा

About The Author

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment