मौसमक्रिकेटऑपरेशन सिंदूरक्रिकेटस्पोर्ट्सबॉलीवुडजॉब - एजुकेशनबिजनेसलाइफस्टाइलदेशविदेशराशिफललाइफ - साइंसआध्यात्मिकअन्य

Avinash Ghodke

Screenwriter and Lyricist with 20 years of experience in Bollywood and Marathi cinema.His creative writing examines the contradictions of lived experience, while his journalism uncovers humanism beneath headlines.

मुंबई मधे Sea Facing Flat चे दर अविश्वसनीय आहेत -highest property deal ची आकडेवारी जाणून घ्या…

मुंबईत sea facing घर घेणं केवळ अशक्य कोटीतील गोष्ट …

Mumbai Real Estate चे एरिया निहाय दर तपासत तुम्ही मुंबई शहरात घर घेण्याचं स्वप्न पाहत आहात का? नक्की पहा! पण मुंबईत sea facing घर घेण्याचं स्वप्न आता अशक्य कोटी नाही तर चक्क 703 कोटींच झालं आहे.
मुंबईत घर घ्यावं असं प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं .संपूर्ण भारतात ज्या शहरामध्ये सर्वात जास्त वेगाने प्रॉपर्टीची रेट दुप्पट-तिप्पट होत असतात असे एकमेव शहर म्हणजे मुंबई. या अनुषंगाने काही अति श्रीमंत लोक केवळ इन्व्हेस्टमेंट या दृष्टीने मुंबईतील प्रॉपर्टीज मध्ये गुंतवणूक करत असतात. मुंबई शहराचा प्रॉपर्टीचा भाव हा अगदी लंडन ,टोकियो, न्यूयॉर्क अशा आंतरराष्ट्रीय शहरांच्या भावाशी साम्य सांगतो.
नुकतेच असे समोर आले आहे की मुंबई शहरात वरळी सी फेस या अतिश्रीमंत समजल्या जाणाऱ्या भागात एका नवीनच बांधलेल्या नमन झाना ( Naman Xana) या 40 मजली इमारतीमध्ये आतापर्यंतची सर्वोच्च अशी किंमत देऊन दोन अल्ट्रा लक्झरी डुप्लेक्स घरांची विक्री झालेली आहे. सर्वोच्च किमतीचा तो विक्रमी आकडा म्हणजे….. 639 करोड रुपये!!

कसा झाला ऐतिहासीक Mumbai Real Estate सौदा

दोन लाख 83 हजार प्रति स्क्वेअर फुट भावाने दोन डुप्लेक्स फ्लॅट एका फार्मा कंपनीच्या चेअरमन श्रीमती लीना गांधी तिवारी यांनी विकत घेतल्याचे समजते.

श्रीमती तिवारी यांनी हे डुप्लेक्स फ्लॅट विकत घेताना 63.9 करोड रुपये स्टॅम्प ड्युटी व जीएसटी भरली आहे. श्रीमती तिवारी यांना ही दोन डुप्लेक्स फ्लॅट जवळपास 703 करोड रुपयांना पडले आहेत व ही किंमत त्यांनी मागील आठवड्यातच अदा करून घराचा रीतसर ताबा मिळवला आहे.

वरळी सी फेस- Sea view साठी 703 कोटी?

श्रीमती तिवारी यांनी मोजलेली 703 कोटी रुपयांची ही किंमत मुंबईतल्या अती श्रीमंत अशा भागातल्या फ्लॅटच्या भावांच्या पेक्षा दुप्पट आहे. याचे कारण म्हणजे ज्या वरळी सी फेस ठिकाणी ही इमारत उभी आहे तिथून दिसणारा मनोहारी वरळी सी फेस चा नजारा.

Naman Xana या इमारतीतील फ्लॅटमधून वरळी समुद्राचा panaromic view पाहायला मिळतो. याच बरोबर महाराष्ट्र शासनाचा महत्त्वाकांक्षी असा होऊ घातलेला ‘कोस्टल रोड प्रकल्प’ इथूनच पुढे जातो या भागापासून नरिमन पॉईंट व बांद्रयाला पोहोचणे अतिशय सुलभ आहे.

वरळी सी फेस च्या याच भागात काही महिन्यांपूर्वी प्रसिद्ध Banker उदय कोटक यांनी एक अख्खी sea facing बिल्डिंग 400 कोटी रुपयांना विकत घेतल्याचे वृत्त होते.

लक्ष्मी पुत्रांचे वास्तव्य असलेला वरळी सी फेस

दिवंगत बॉलिवूड अभिनेते राजकुमार यांचाही बंगला याच भागात आहे.इथे अनेक उंच टावर्स पूर्वीपासून होते. प्रसिद्ध वास्तु विशारद हाफिज कॉन्ट्रॅक्टर यांनी बांधलेला ‘वास्तु’ हा 18 मजली टावर 90 च्या दशकात फार प्रसिद्ध झाला होता. भारतीय आयएएस अधिकाऱ्यांची सोसायटी असलेला प्रिया टावर व त्या शेजारील एकनाथ सोलकर हे प्रसिद्ध क्रिकेटर राहत होते. तो टॉवर संपूर्णत: ‘क्रिकेटर्सची सोसायटी’ असलेला टॉवर होता. अशा अनेक नामांकित इमारती या भागात पूर्वीपासून होत्या. पण “नमन झाना” या नव्याने उभ्या राहिलेल्या टॉवर ने किमतीच्या बाबतीत मागील सर्व रेकॉर्ड्स ब्रेक करत अविश्वसनीय अशा उच्चतम किमतीला फ्लॅट विकून Mumbai real estate मार्केटमध्ये एक विक्रम नोंदवला आहे .

703 कोटी या value चे विश्लेषण

-703 कोटी रूपयांत अंदाजे दोन ते अडीज कि.मी. लांबीचा मेट्रो मार्ग बांधला जावू शकतो.

-या रकमेत 10 Big Budget Bollywood चित्रपट बनू शकतात.

-या रकमेत लाखो विद्यार्थी आपले उच्च शिक्षण घेवू शकतात

-या रकमेत 50 गावांमध्ये मूलभूत (infrastructure)सुविधा व विकास कार्यक्रम राबवले जावू शकतात.

विचारांचा पिंगा

वस्तुस्थिती पाहता एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय भारतीय व्यक्तीला आपल्या आयुष्यात एक करोड रुपयासाठीही आयुष्यभर कष्ट करावे लागतात हे एक कटू सत्य आहे.

भारतात दिवसेंदिवस अब्जाधीशांची संख्या वाढत आहे पण मध्यमवर्गीय व त्याखालील गरीब वर्ग यांची परिस्थिती सुधारताना दिसत नाही हे आर्थिक तफावतीचे चित्र बघून आपल्याला काय वाटते हे जरूर सांगा

About The Author

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment