नसिरुद्दीन शहा यांचे पुरस्कार झालेत बाथरूम दरवाजाचे हॅंडल
फिल्म फेअर पुरस्कार हे बॉलीवूड मध्ये प्रतिष्ठित आणि नामांकित असे पुरस्कार मानले जातात हे पुरस्कार मिळवण्यासाठी अनेक लोक आयुष्यभर वाट पाहत असतात. अशा परिस्थितीत नसिरुद्दीन शाह यांनी आपल्या फिल्मफेअरच्या अवॉर्ड्स ट्रॉफी चक्क बाथरूम दरवाजांचे हँडल म्हणून वापरलेत असे त्यांनी स्वतः लल्लनटॉप च्या मुलाखतीमध्ये सांगितले.
ही गोष्ट काही लोकांना खटकेल ही.. पण त्यांनी खरच असे केले आहे आणि हे त्यांनी लल्लनटॉप च्या आपल्या मुलाखतीमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे.नसिरुद्दीन शाह हे जेष्ठ हिंदी अभिनेते आपल्या बिनधास्त अशा वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत ते जे काही बोलतात ते स्पष्ट बोलतात व ते कोणाचीही तमा न बाळगता बोलतात. शाह यांच्या या वक्तव्यांवर नेहमीच टीकाही होते.
यापूर्वीही नसिरुद्दीन शहा यांनी मुघल हे आक्रमण करते नसून ते राष्ट्रनिर्माते होते असे विवादास्पद विधान केले होते. यावेळेस ते आपल्या अवॉर्ड्स बद्दल जे काही बोलले ते ऐकूनही लोकांना आश्चर्य वाटले नसिरुद्दीन शहा असे म्हणाले की त्यांना सुरुवातीच्या काळात जेव्हा अवॉर्ड्स मिळायचे तेव्हा अवॉर्ड्स मिळाल्याचा त्यांना खूप आनंद व्हायचा पण पुढे घरात अवॉर्ड्सचा ढीग होऊ लागला.पुढे त्यांना हे ही कळू लागले की हे अवॉर्ड्स काही लोक मॅनेजही करू शकतात आणि त्यांचा या अवॉर्ड्स वरचा विश्वास हळूहळू उडू लागला.
काय म्हणाले नसिरुद्दीन शहा..
प्रसिद्ध जेष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शहा जे आपल्या कलात्मक चित्रपटांतील वास्तव वादी अभिनयासाठी प्रसिद्ध आहेत त्यांनी नुकतेच ‘लल्लनटॉप’ या युट्युब चॅनलला दिलेल्या आपल्या मुलाखतीत पुढील धक्कादायक वक्तव्य केले ते असे म्हणाले की “मला आतापर्यंत जे काही फिल्मफेअर अवॉर्ड मिळालेत त्यांचा वापर मी बाथरूमच्या दरवाजांचे हँडल म्हणून करत आहे”.
शहा गमतीने पुढे असेही म्हणाले की “माझ्या घरात जो कुणी टॉयलेटला जातो त्याला दोन पुरस्कार मिळतात”
दोन अभिनेत्यांतील स्पर्धा मान्य नाही
अवॉर्ड देण्याच्या एकूणच पद्धतीवर नाराजी व्यक्त करत ते असे म्हणाले की “ अवॉर्ड्स देताना अभिनेत्यांची गुणवत्ता ज्या पद्धतीने मोजली जाते ती पद्धत अतिशय चुकीची आहे कारण एक अभिनेता दुसऱ्या अभिनेत्या पेक्षा श्रेष्ठ आहे हे ठरवणे खूप अवघड आहे”. त्यांच्या मते जो अभिनेता पूर्णपणे आपल्या आयुष्याचा अनुभव व आपली कलात्मक ऊर्जा एखादी भूमिका साकार करण्यासाठी लावतो तो अभिनेता त्याच्या जागी श्रेष्ठच असतो. दोन अभिनेत्यांची स्पर्धात्मक पातळीवर तुलना करणे हे त्यांना गैर वाटते.
तुमच्या पुढे असलेल्या अनेक चांगल्या अभिनेत्यांमधून तुम्ही एकालाच उचलता आणि म्हणता की ‘हा सगळ्यात श्रेष्ठ अभिनेता आहे’ हे तार्किक दृष्ट्या योग्य वाटत नाही ,असे म्हणत शहा यांनी आपला अवॉर्ड्स वरील अविश्वास स्पष्टपणे व्यक्त केला. याच कारणास्तव शहा यांनी त्यांना मिळालेले मागील दोन फिल्मफेअर पुरस्कार स्वीकारलेले नाहीत आणि या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यास जाण्याचे त्यांनी टाळले आहे.
नसिरुद्दीन शहा यांनी पुढे आपल्या राष्ट्रपतींच्या हस्ते मिळालेल्या पद्म सन्मानांबद्दल मात्र आदर व्यक्त केला आहे. त्यांच्या दृष्टीने पद्म पुरस्कार हे त्यांच्या आयुष्याचे खरे यश आहे. आपल्या दिवंगत वडिलांची आठवण काढत शाह असे म्हणाले की त्यांच्या उमेदीच्या काळात जेव्हा ते अभिनय क्षेत्रात धडपडत होते तेव्हा त्यांचे वडील त्यांना म्हणत “ तू जे काम करत आहेस ते अतिशय मूर्खपणाचे काम आहे!!”. ज्या ज्या वेळी नसिरुद्दीन शहा राष्ट्रपतींच्या हस्ते आपला पद्म पुरस्कार घेण्यासाठी राष्ट्रपती भवनात उपस्थित होते त्या त्या वेळेस पुरस्कार घेतल्यानंतर त्यांनी आपल्या वडिलांची आठवण करून आभाळाकडे पाहिल्याचं ते सांगतात.
पद्म पुरस्कारांचा आदर व दिवंगत वडिलांची आठवण
चित्रपट सृष्टीतील पुरस्कारांबाबत आपले मत काय आहे नक्की सांगा
हे ही वाचा
नवाजुद्दीन चा नवा चित्रपट Costao : कस्टम अधिकाऱ्याची Real story
अमिताभ बच्चन : न मिटणारी दगडावरची रेघ







