Avinash Ghodke

Screenwriter and Lyricist with 20 years of experience in Bollywood and Marathi cinema.His creative writing examines the contradictions of lived experience, while his journalism uncovers humanism beneath headlines.

नसिरुद्दीन शहा यांचा पुरस्कारांवर अविश्वास-Filmfare Trophy चे बनवले दरवाजाचे हॅंडल

फिल्म फेअर पुरस्कार हे बॉलीवूड मध्ये प्रतिष्ठित आणि नामांकित असे पुरस्कार मानले जातात हे पुरस्कार मिळवण्यासाठी अनेक लोक आयुष्यभर वाट पाहत असतात. अशा परिस्थितीत नसिरुद्दीन शाह यांनी आपल्या Filmfare Trophy चक्क बाथरूम दरवाजांचे हँडल म्हणून वापरलेत ‌असे त्यांनी स्वतः लल्लनटॉप च्या मुलाखतीमध्ये सांगितले. Naseeruddin Shah controversial statement

नसिरुद्दीन शहा यांनी पुरस्कार बाहुल्यांना बाथरूम दरवाजाचे हॅंडल बनवले

ही गोष्ट काही लोकांना खटकेल .. पण त्यांनी खरच असे केले आहे आणि हे त्यांनी लल्लनटॉप च्या आपल्या मुलाखतीमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे.नसिरुद्दीन शाह (Naseeruddin Shah)हे जेष्ठ हिंदी अभिनेते आपल्या बिनधास्त अशा वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत . ते जे काही बोलतात ते स्पष्ट बोलतात व कोणाचीही तमा न बाळगता बोलतात.

गेल्या काही वर्षांत त्यांनी अशी बरीच धक्कादायक विधाने केली आहेत. शाह यांच्या या वक्तव्यांवर नेहमीच काही लोकांकडून टीकाही होते.

गेल्या काही वर्षांत त्यांनी अशी बरीच धक्कादायक विधाने केली आहेत. शाह यांच्या या वक्तव्यांवर नेहमीच काही लोकांकडून टीकाही होते. (Naseeruddin Shah controversial statement)

मुघलांबाबत नसीरुद्दीन शाह यांचे विवादास्पद विधान

यापूर्वीही नसिरुद्दीन शहा यांनी मुघल हे आक्रमण करते नसून ते राष्ट्रनिर्माते होते असे विवादास्पद विधान केले होते. या त्यांच्या वक्तव्यामुळे काही लोकांनी त्यांच्यावर मुस्लिम धार्जिणेपणा चा आरोप केला होता. काहींनी ” वय झाल्यामुळे नसीरुद्दीन शाह काहीही बरळतात असेही म्हटले”. नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah)मात्र धक्कादायक विधान करणे सोडत नाहीत.

या वेळेस ते आपल्याला मिळालेल्या अवॉर्ड्स बद्दल जे काही बोलले ते ऐकूनही लोकांना आश्चर्य वाटले आहे . नसिरुद्दीन शहा असे म्हणाले की त्यांना सुरुवातीच्या काळात जेव्हा अवॉर्ड्स मिळायचे तेव्हा अवॉर्ड्स मिळाल्याचा त्यांना खूप आनंद व्हायचा पण पुढे घरात अवॉर्ड्सचा ढीग होऊ लागला.पुढे जेंव्हा त्यांना हे ही कळू लागले की हे अवॉर्ड्स काही लोक मॅनेजही करू शकतात तेंव्हा त्यांचा या अवॉर्ड्स वरचा विश्वास हळूहळू उडू लागला. या मिळालेल्या Filmfare trophy बद्दल नसीरुद्दीन शाह यांनी पुढे जो खुलासा केला आहे तो चकीत करणारा आहे…(Naseeruddin Shah controversial statement )

काय म्हणाले नसिरुद्दीन शहा.. Filmfare Trophy बद्दल

प्रसिद्ध जेष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शहा जे आपल्या कलात्मक चित्रपटांतील वास्तव वादी अभिनयासाठी प्रसिद्ध आहेत त्यांनी नुकतेच ‘लल्लनटॉप’ या युट्युब चॅनलला दिलेल्या आपल्या मुलाखतीत पुढील धक्कादायक वक्तव्य केले ते असे म्हणाले की …

Filmfare पुरस्कार हे भारतीय सिनेविश्वातील अतीशय नामांकित असे पुरस्कार आहेत. भारतीय सिनेसृष्टीसाठी ते Oscar दर्जाचे पुरस्कार आहेत. अनेक अभिनेते Filmfare Trophy मिळवण्यासाठी आस लावून बसलेले असतात. या पार्श्वभूमीवर अभिनेते नसिरुद्दीन शहा जे आपल्या कलात्मक चित्रपटांतील वास्तव वादी अभिनयासाठी प्रसिद्ध आहेत यांनी नुकतेच ‘लल्लनटॉप’ या युट्युब चॅनलला दिलेल्या आपल्या मुलाखतीत Filmfare Trophy बाबत धक्कादायक वक्तव्य केले आहे. ते असे म्हणाले की …

“मला आतापर्यंत जे काही फिल्मफेअर अवॉर्ड मिळालेत त्यांचा वापर मी बाथरूमच्या दरवाजांचे हँडल म्हणून करत आहे”.

– नसीरुद्दीन शाह

शहा गमतीने पुढे असेही म्हणाले की “माझ्या घरात जो कुणी टॉयलेटला जातो त्याला दोन पुरस्कार मिळतात(Naseeruddin Shah controversial statement)

दोन अभिनेत्यांतील स्पर्धा मान्य नाही

अवॉर्ड देण्याच्या एकूणच पद्धतीवर नाराजी व्यक्त करत ते असे म्हणाले की “ अवॉर्ड्स देताना अभिनेत्यांची गुणवत्ता ज्या पद्धतीने मोजली जाते ती पद्धत अतिशय चुकीची आहे कारण एक अभिनेता दुसऱ्या अभिनेत्या पेक्षा श्रेष्ठ आहे हे ठरवणे खूप अवघड आहे”. त्यांच्या मते जो अभिनेता पूर्णपणे आपल्या आयुष्याचा अनुभव व आपली कलात्मक ऊर्जा एखादी भूमिका साकार करण्यासाठी लावतो तो अभिनेता त्याच्या जागी श्रेष्ठच असतो. दोन अभिनेत्यांची स्पर्धात्मक पातळीवर तुलना करणे हे त्यांना गैर वाटते.

“तुमच्या पुढे असलेल्या अनेक चांगल्या अभिनेत्यांमधून तुम्ही एकालाच उचलता आणि म्हणता की- हा सगळ्यात श्रेष्ठ अभिनेता आहे -हे तार्किक दृष्ट्या योग्य वाटत नाही” ,असे म्हणत शहा यांनी आपला अवॉर्ड्स वरील अविश्वास स्पष्टपणे व्यक्त केला. याच कारणास्तव शहा यांनी त्यांना मिळालेले मागील दोन फिल्मफेअर पुरस्कार स्वीकारलेले नाहीत आणि या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यास जाण्याचेही त्यांनी टाळले आहे.

पद्म पुरस्कारांचा आदर व दिवंगत वडिलांची आठवण

नसिरुद्दीन शहा यांनी पुढे राष्ट्रपतींच्या हस्ते मिळालेल्या पद्म सन्मानांबद्दल मात्र आदर व्यक्त केला आहे. त्यांच्या दृष्टीने पद्म पुरस्कार हे त्यांच्या आयुष्याचे खरे यश आहे. आपल्या दिवंगत वडिलांची आठवण काढत शाह असे म्हणाले की त्यांच्या उमेदीच्या काळात जेव्हा ते अभिनय क्षेत्रात धडपडत होते तेव्हा त्यांचे वडील त्यांना म्हणत “ तू जे काम करत आहेस ते अतिशय मूर्खपणाचे काम आहे!!”. ज्या ज्या वेळी नसिरुद्दीन शहा राष्ट्रपतींच्या हस्ते आपला पद्म पुरस्कार घेण्यासाठी राष्ट्रपती भवनात उपस्थित होते त्या त्या वेळेस पुरस्कार घेतल्यानंतर त्यांनी आपल्या वडिलांची आठवण करून आभाळाकडे पाहिल्याचं ते भावूक होऊन सांगतात .

चित्रपट सृष्टीतील पुरस्कारांबाबत आपले मत काय आहे नक्की सांगा

हे ही वाचा

➡️नवाजुद्दीन चा नवा चित्रपट Costao : कस्टम अधिकाऱ्याची‌ Real story

➡️मनोजकुमार एक महान दिग्दर्शक

➡️Amitabh Bachchan | न मिटणारी दगडावरची रेघ

About The Author

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment