No Kings चळवळीला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. अमेरिकेने १७७६ मधे ब्रिटिश राजा जॉर्ज तिसरा याच्या विरुद्ध स्वतंत्रता युद्ध लढले. तेंव्हा पहिल्यांदा घोषणापत्रात “No Kings!” चा नारा दिला गेला . आता हा नारा Donald Trump यांच्या विरुद्ध दिला जात आहे.

No Kings – डोनाल्ड ट्रंप विरोधात अमेरिकन जनता रस्त्यावर
अमेरिकेत सध्या सुरू असलेल्या ‘नो किंग्स’ (No Kings) आंदोलनाने व्यापक स्वरूप धारण केले आहे. २८ मार्च २०२६ रोजी अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठ्या जनआंदोलनांपैकी एक म्हणून याकडे पाहिले जात असून, सुमारे ८० लाख नागरिक रस्त्यावर उतरल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
No Kings आंदोलनामागील तात्कालिक कारणे
यावेळच्या तीव्र आंदोलनामागे काही विशिष्ट घटना कारणीभूत आहेत:
इराण युद्धाचा विरोध: अमेरिकेने इराणमध्ये चालवलेल्या लष्करी कारवायांविरुद्ध लोकांमध्ये संताप आहे. हे सध्या अमेरिकन जनक्षोभाचे प्रमुख कारण मानले जाते. डोनाल्ड ट्रंप यांनी आवश्यकता नसताना विधीगृहा (Congress) च्या मताचा विचार न घेता इराण विरुद्ध ही युद्ध कारवाई केली आहे असे अमेरिकन जनतेला वाटत आहे.
इमिग्रेशन धोरण: जानेवारी २०२६ मध्ये आयसीई (ICE) अधिकाऱ्यांच्या कारवाईत रेने गुड आणि ॲलेक्स प्रेटी या नागरिकांचा मृत्यू झाला, ज्यामुळे जनक्षोभ उसळला.
सत्तावादाचा धोका: ट्रम्प प्रशासनाकडून लोकशाही संस्थांवर होणारे कथित हल्ले आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर येणारी गदा, हे या आंदोलनाचे मुख्य सूत्र आहे.
Robert De Niro सह अनेक सेलिब्रिटींचा सहभाग
- रॉबर्ट डी निरो (Robert De Niro): जेष्ठ व लोकप्रिय Hollywood अभिनेते रॉबर्ट डी नीरो यांनी न्यूयॉर्क मधील आंदोलनाचे नेतृत्व केले आणि मॅनहॅटन मधील सेंट्रल पार्क येथे जमलेल्या जनसमुदायाला त्यांनी संबोधित केले. रॉबर्ट डी नीरो यांनी याआधीही Cannes Festival मधील त्यांच्या भाषणात Donal Trump यांच्यावर घणाघाती टीका केली होती.
- ब्रूस स्प्रिंगस्टीन (Bruce Springsteen): सेंट पॉल, मिनेसोटा येथील मुख्य रॅलीमध्ये त्यांनी ‘स्ट्रीट्स ऑफ मिनीपोलिस’ हे विशेष निषेध गीत सादर केले.
- जेन फॉन्डा (Jane Fonda): प्रसिद्ध अभिनेत्री आणि सामाजिक कार्यकर्त्या जेन फॉन्डा यांनी वॉशिंग्टन डी.सी. आणि मिनेसोटा येथील कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला.
- पद्मा लक्ष्मी (Padma Lakshmi): भारतीय वंशाची प्रसिद्ध लेखिका आणि मॉडेल पद्मा लक्ष्मी न्यूयॉर्कमधील मोर्चात रॉबर्ट डी नीरो यांच्या सोबत चालताना दिसली.
- इतर सेलिब्रिटी: मार्क रफालो, सुसान सारंडन, जिमी किमेल, केरी वॉशिंग्टन आणि ज्युलिया लुई-ड्रेफस यांसारख्या कलाकारांनीही विविध शहरांतील मोर्चांमध्ये सहभाग घेऊन सोशल मीडियाद्वारे पाठिंबा दर्शवला आहे.
आंदोलनाची ठिकाणे आणि व्याप्ती
हे आंदोलन केवळ मोठ्या शहरांपुरते मर्यादित नसून अमेरिकेतील ५० ही राज्यांमध्ये पसरले आहे:
- मुख्य केंद्र (Flagship Protest): मिनेसोटाची राजधानी सेंट पॉल हे या आंदोलनाचे मुख्य केंद्र राहिले. येथे १ लाखांहून अधिक लोक जमा झाले होते.
- प्रमुख शहरे: न्यूयॉर्क, वॉशिंग्टन डी.सी., शिकागो, लॉस एंजेलिस, सॅन फ्रान्सिस्को, बोस्टन आणि फिलाडेल्फिया या शहरांत लाखांच्या संख्येने मोर्चे काढण्यात आले.
- ग्रामीण भाग: आश्चर्याची गोष्ट म्हणजे, आयडाहो, वायोमिंग आणि वेस्ट व्हर्जिनिया यांसारख्या पारंपारिकपणे ट्रम्प समर्थक मानल्या जाणाऱ्या राज्यांमध्येही मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली.
आंदोलन कसे झाले?
- मार्च आणि रॅली: आंदोलकांनी हातामध्ये “No King Above the Law”, “People Over Billionaires” आणि “Protect Our Democracy” अशा आशयाचे फलक घेतले होते.
- सांस्कृतिक निषेध: अनेक ठिकाणी गायकांनी गाणी गायली, तर वक्त्यांनी संविधानाच्या रक्षणासाठी भाषणे दिली. काही ठिकाणी ‘हॅन्डमेड्स टेल’ (Handmaid’s Tale- दासीची व्यथा)या लेखिका मार्गारेट ॲटवूड (Margaret Atwood) यांच्या १९८५च्या प्रसिद्ध कादंबरीतील महिलांची जाचक वेशभूषा करून अमेरिकन महिलांनी प्रतिकात्मक निषेध व्यक्त केला.
- डिजिटल सहभाग: जे लोक शारीरिकरित्या उपस्थित राहू शकले नाहीत, त्यांच्यासाठी ‘व्हर्च्युअल प्रोटेस्ट’चे आयोजन करण्यात आले होते.
- कामगार बंद: मिनेसोटासारख्या राज्यात काही कामगार संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा म्हणून काम बंद आंदोलन (Work Stoppage) केले.
आंदोलनामागील तात्कालिक कारणे
- यावेळच्या तीव्र आंदोलनामागे काही विशिष्ट घटना कारणीभूत आहेत:
- इराण युद्धाचा विरोध: अमेरिकेने इराणमध्ये चालवलेल्या लष्करी कारवायांविरुद्ध लोकांमध्ये संताप आहे.
- इमिग्रेशन धोरण: जानेवारी २०२६ मध्ये आयसीई (ICE) अधिकाऱ्यांच्या कारवाईत रेने गुड आणि ॲलेक्स प्रेटी या नागरिकांचा मृत्यू झाला, ज्यामुळे जनक्षोभ उसळला.
- सत्तावादाचा धोका: ट्रम्प प्रशासनाकडून लोकशाही संस्थांवर होणारे कथित हल्ले आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर येणारी गदा, हे या आंदोलनाचे मुख्य सूत्र आहे.
Check and Balance तत्वाचे पुनरिज्जीवन
अमेरिकन सरकारचे तीन मुख्य आधारस्तंभ १) विधीमंडळ Congress २) राष्ट्राध्यक्षांचे कार्यकारी मंडळ ३) न्यायव्यवस्था हे तीन्ही भाग स्वतंत्र असले तरी एकमेकांवर नियंत्रण ठेवू शकतील असे घटनाकार Framers यांनी नियोजन केले आहे .अनेक घटना तज्ञांचे म्हणने आहे की No Kings ही चळवळ अमेरिकन लोकशाही च्या Check and Balance या मूलभूत तत्वाचे पुनरुज्जीवन करते. अडीजशे वर्षांपूर्वी British King George III याच्या विरोधात अमेरिकन जनतेने दिलेला NO KINGS! चा नारा आता त्यांना त्यांनीच निवडून दिलेल्या President Donald Trump विरोधात द्यावा लागत आहे.
हे ही वाचा: ▶️Dr Babasaheb Ambedkar यांची भूमिका Robert de Niro करणार होते

