Avinash Ghodke

Screenwriter and Lyricist with 20 years of experience in Bollywood and Marathi cinema.His creative writing examines the contradictions of lived experience, while his journalism uncovers humanism beneath headlines.

‘दिल्ली दरबार’ हे मुघल नाही ब्रिटिश राज सोहळे होते – ब्रिटिशांनी 3 भव्य ‘दिल्ली दरबार’ भारतात केले.. जाणून घ्या कधी..


“दिल्ली दरबार” हा शब्द ऐकताच डोळ्यांसमोर उभं राहतं ते मुघल साम्राज्याचं वैभव,पण तुम्हाला माहीत आहे का… “दिल्ली दरबार” सोहळ्याची संकल्पना मुघलांची नसून ब्रिटिश राजवटीची आहे. आपण मुघलांपेक्षा वरचढ आहोत हे अधोरेखित करण्यासाठी त्यांनी हे पर्शियन शब्द आयोजनाला वापरले.


दिल्ली दरबार म्हणजे काय?

बहुतांश भारतीयांच्या मनात ‘दिल्ली दरबार’ हा शब्द एखाद्या भव्य आणि पारंपरिक मुघल समारंभाची प्रतिमा निर्माण करतो. पण खरं सांगायचं झालं तर, ही संकल्पना मुघलांच्या काळात अस्तित्वातच नव्हती. ‘दिल्ली दरबार’ हा राजसी सोहळा (Royal Event )ब्रिटिशांनी स्वतःच्या सत्ता प्रदर्शनासाठी आयोजित केला होता,

ब्रिटिशांकडून मुघलांचे अनुकरण

मुघल बादशहांच्या श्रीमंत व विलासी जीवन शैली बद्दल खुद्द ब्रिटिशांना ही नेहमीच आकर्षण होते. उत्तरेतील काही ब्रिटिश गव्हर्नर मुघल बादशहा ची ऐशोआरामी जीवनशैली अनुसरून जगत अशा इतिहासात नोंदी आहेत. या प्रभावातूनच कदाचीत पूढे ‘दरबार ‘ हा पर्शियन शब्द ब्रिटिशांनी आपल्या शाही आयोजनासाठी वापरला .


ब्रिटिशांचे तीन ऐतिहासिक दिल्ली दरबार


ब्रिटिश साम्राज्याने आपल्या सत्तेची ताकद दाखवण्यासाठी दिल्लीत एकूण 3 भव्य दरबार आयोजित केले. हे केवळ समारंभ नव्हते, तर संपूर्ण भारताला ब्रिटिश राजाची शान व वर्चस्व पटवून देणारे राजकीय मंच ही होते. या दिल्ली दरबार सोहळ्याचे आयोजन प्रामुख्याने नवीन राजा अथवा राणी च्या राज्यारोहणाची घोषणा करण्यासाठी केले जायी.

तीन दिल्ली दरबार

  • १८७७ क्वीन व्हिक्टोरिया ‘भारताची सम्राज्ञी’ घोषित ‘जलसा-ए-दिल्ली’ असे नामकरण; पहिला ब्रिटिश दिल्ली दरबार
  • १९०३ एडवर्ड सातवा राज्यारोहण सोहळा. भारतील ब्रिटिश गव्हर्नर लॉर्ड कर्झनने या अभूतपूर्व Delhi Durbar ची दिमाखदार व्यवस्था केली होती.
  • १९११ जॉर्ज पाचवा( पंचम जॉर्ज)ची राज्यारोहण घोषणा; व याबरोबरच ब्रिटिश राजधानी कोलकात्याहून दिल्लीला यावेळी हलवण्यात आली . हा Delhi Durbar शेवटचा आणि सर्वात भव्य दिल्ली दरबार होता. या सोहळ्याची क्षणचित्रे youtube वरील BFI (British Film Institute)या Channel वरच्या दुर्मिळ चित्रफितीत पहाता येतील.
  • *[Gate Way of India – राजा पंचम जॉर्ज दिल्लीस जाण्यापूर्वी प्रथमतः मुंबई बंदरावर उतरला होता. त्याच्या स्वागतासाठीच मुंबई चे Gate Way of India हे प्रवेशद्वार १९११ साली तात्पुरत्या स्वरूपात बांधण्यात आले होते हे विशेष]


१९११ चा सर्वात वैभवशाली दरबार: जेव्हा दिल्ली बनली ‘इंपिरियल सिटी’

'दिल्ली दरबार' हे मुघल नाही ब्रिटिश राज सोहळे होते - ब्रिटिशांनी 3 भव्य 'दिल्ली दरबार' भारतात केले.. जाणून घ्या कधी..

१९११ चा दिल्ली दरबार म्हणजे केवळ एक समारंभ नव्हता, तर ब्रिटिश सत्तेची भव्यतेची पराकाष्ठा होती.

  • खर्च: २.५ लाख रुपये (आजच्या चलनात जवळपास ५०० कोटी रुपयांहून अधिक!)
  • आयोजन स्थळ: कोरोनेशन पार्क (आजचे बुराडी परिसर) येथे विशाल शामियान्यांचे एक शहरच उभारण्यात आलं.
  • उपस्थिती: भारतीय संस्थानिक, ब्रिटिश अधिकारी, युरोपियन खानदानी अमीर उमराव, एकूण लाखो प्रेक्षक.
  • सजावट: सोनेरी कलाकुसरीचे रेशमी पडदे व छत्र्या, काचेची झुंबरे, दुर्मिळ फुलांनी सजवलेले व्यासपीठ.
  • भोजन: युरोपियन आणि भारतीय पदार्थांचा मिलाफ; स्वयंपाकासाठी स्वतंत्र गावच वसवण्यात आलं होतं.

या दरबारातच नव्या ब्रिटिश राजा पंचम जॉर्ज (King George Vth )ने जाहीर केलं की भारताची राजधानी कोलकात्याहून दिल्लीला हलवण्यात येणार आहे. यामागचा उद्देश होता – ” दिल्ली चा तख्त” या मुघल सत्तेच्या प्रतीकावर ब्रिटिश राजाचा अधिकृत असा अधिकारिक वारसा प्रस्थापित करणे.


मुघलांचे ही दरबार असत पण ते प्रशासकीय असत


मुघल साम्राज्यात ‘दिल्ली दरबार’ असा कोणताही उल्लेख सापडत नाही. त्यांचे दरबार ‘दरबार-ए-आम’ (सामान्य जनतेसाठी) आणि ‘दरबार-ए-खास’ (विशिष्टांसाठी) या नावांनी ओळखले जात व ते संपूर्णत: प्रशासकीय असत. हे दरबार शाही protocol अनुसार व शिस्तीने पार पडत. जलसा किंवा पार्टी चा माहौल इथे अपेक्षित नसे.

या उलट ब्रिटिशांनी आयोजलेले दिल्ली दरबार म्हणजे जलसा

ब्रिटिशांनी आयोजलेले Delhi Durbar हे सत्ता प्रदर्शनासाठी व ब्रिटिश राजेशाही चा थाट दाखविण्यासाठी असत. British Delhi Durbar हे पूर्णतः युरोपियन शैलीचे समारंभ असत, भारतीय राजे महाराजे व संस्थानिकांचा समावेश फक्त आमंत्रित शाही पाहुणे म्हणून यात असे. या पाहुण्यांना महागड्या भेटवस्तू व स्मरण चिन्हे देवून सम्मानित केले जायी. १९११ च्या सोहळ्याचे स्मरण म्हणून चांदीची देखणी मेडल British राजघराण्याकडून वितरीत करण्यात आली होती ज्यांवर राजा पंचम जॉर्ज व राणी मेरी यांची चित्रे अंकित होती.

'दिल्ली दरबार' हे मुघल नाही ब्रिटिश राज सोहळे होते - ब्रिटिशांनी 3 भव्य 'दिल्ली दरबार' भारतात केले.. जाणून घ्या कधी..

वरील चित्रात Delhi Durbar स्मरणार्थ बनवलेले चांदीचे मेडल

आजच्या संदर्भात ‘दिल्ली दरबार’

आज Delhi Durbar ही संज्ञा हॉटेल व्यावसायिकांनी मुघल साम्राज्याशी किंवा विशेषतः मुघल खाद्य संस्कृती शी चुकीने जोडली आहे.

आज कित्येक रेस्टॉरंट्स, लग्न घर, हॉटेल्सनी ‘दिल्ली दरबार’ हे नाव आपल्या व्यवसायाचे Brand Name बनवले आहे. उच्च अभिरुची ची “मुघल शाही पक्वान्ने” आम्ही सर्व करतो असे या नावातून त्यांना सुचवायचे असतेखरेतर ब्रिटिशांच्या दिल्ली दरबारात फक्त मुघलांची शाही पक्वान्ने वाढली जात नसत . यात प्रामुख्याने युरोपियन, ब्रिटिश व भारतीय पक्वानांचा समावेश असे. ब्रिटिशांचे हे भव्य दिल्ली दरबार ब्रिटिश साम्राज्य व संस्कृती चे भव्य प्रदर्शन करण्यासाठी असत किंबहुना जुन्या मुघल साम्राज्याहून आम्ही वरचढ आहोत हे दाखवण्यासाठी असत.

पर्शियन शब्दामुळे घोळ

‘दिल्ली दरबार’ हा पर्शियन शब्द ब्रिटिशांनी भारतातील आपलं मुघलां नंतरच आपलं साम्राज्य अधोरेखित करण्यासाठी निर्माण केला. मुघल साम्राज्याचा त्याच्याशी कोणताही थेट संबंध नाही. पण ऐतिहासिक संकल्पना जनमानसात इतक्या खोल रुजवल्या आहेत की “दिल्ली आणि दरबार” हे दोन शब्द आपसुक गतकालीन मुघल वैभवाशी जोडले जातात.

स्वाभिमानी भारतीय राजे

या सोहळ्यात १९११ च्या काळातही सयाजीराव गायकवाड या भारतीय राजाने British Royal Protocol ला धुडकावत पंचम जॉर्ज ला कुर्निसात केला नव्हता असे म्हटले जाते. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श नक्कीच असावा कारण छत्रपती शिवाजी महाराज यांनी आग्रा भेट दरम्यान बादशहा ला शाही दरबारात अशाच पद्धतीने कूर्निसात केला नव्हता.



इतिहास फक्त वाचायचा नसून तो योग्य संदर्भात समजून घ्यायचा असतो. इतिहासाची खरी ओळख भूतकाळाकडे तर्कशुद्ध पाहूनच होते. आता दिल्ली दरबार नावाच्या एखाद्या रेस्तराँ च्या मेनू मधे जर Our Speciality या  Catagory खाली मुघलाई पक्वान्नांची यादी तुम्हाला दीसली तर तुम्हाला ही गंमत वाटेल कारण ब्रिटिशांच्या दिल्ली दरबारात प्रामुख्याने युरोपियन पक्वान्ने वाढली जात असत.


तुम्हाला हा लेख आवडला का? कमेंट करून नक्की सांगा!

इतिहासातील व इतर अशाच रंजक गोष्टी वाचण्यासाठी Knowledge Bites हे आमचे सदर जरूर पहा.

FAQ:

“दिल्ली दरबार” म्हणजे मुघल सम्राटांचा राजदरबार होता का?

नाही. दिल्ली दरबार हे ब्रिटिश राजसत्तेने आयोजित केलेले भव्य राजकीय सोहळे होते.

कोणता ब्रिटिश सम्राट प्रत्यक्ष भारतात येऊन दिल्ली दरबारात सहभागी झाला होता?

जॉर्ज पाचवा हे दिल्ली दरबाराला प्रत्यक्ष उपस्थित राहिलेले एकमेव ब्रिटिश सम्राट होते. ते आपली पत्नी मेरी सह या आयोजनाला आले होते.

1911 च्या दिल्ली दरबारात कोणती ऐतिहासिक प्रशासकीय घोषणा करण्यात आली?

१९११ च्या दिल्ली दरबार प्रसंगी भारताची राजधानी कलकत्त्याहून दिल्लीला हलवण्याची घोषणा करण्यात आली.

1911 च्या दिल्ली दरबारात कोणती ऐतिहासिक राजकीय घोषणा करण्यात आली?

१९११ च्या दिल्ली दरबारात King George V th (पंचम जॉर्ज) यांच्या राज्यारोहणाची अधिकृत घोषणा करण्यात आली.

1911 चा दिल्ली दरबार हा शेवटचा दिल्ली दरबार होता का?

होय .. 1911 चा दिल्ली दरबार हा ब्रिटिशांचा भारतातील तिसरा व शेवटचा दरबार होता

हे ही वाचा:▶️ 150 वर्षांपूर्वी शोधली मुंबई मिल कामगारांनी पावभाजी -Pav Bhaji ची Link अब्राहम लिंकन पर्यंत जाते ▶️भोपाळ चे एक वकील आहेत फ्रांसचे राजा – Nepoleon 4 – French king

About The Author

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment