मौसमक्रिकेटऑपरेशन सिंदूरक्रिकेटस्पोर्ट्सबॉलीवुडजॉब - एजुकेशनबिजनेसलाइफस्टाइलदेशविदेशराशिफललाइफ - साइंसआध्यात्मिकअन्य

Avinash Ghodke

Screenwriter and Lyricist with 20 years of experience in Bollywood and Marathi cinema.His creative writing examines the contradictions of lived experience, while his journalism uncovers humanism beneath headlines.

PCMC ‘सोनेरी दिवस’-2000 सालीची Reel पहिलीत ? Telco Road वरून बस प्रवास..एकदा पहाच

PCMC आज एक Smart City म्हणून आकार घेत आहे. Metro ची connectivity आज शहराला वेग देतेय पण २५ वर्षांपूर्विचा निवांत मोकळेपणा कुठेतरी हरवलेला आहे. – 2000 सालचा Telco Road चा बस प्रवासाचा हा video एक सूखद Nostalgia देतो

PCMC -2000 सालची Nostalgic Reel

Instagram च्या @Sthal PCMC या अकाऊंट वर 25 वर्षांपूर्वीचा विदेशी व्यक्ती ने रेकॉर्ड केलेला एक व्हिडिओ शेअर केला आहे. आजच्या भाषेत आपण याला Reel ही म्हणू शकतो.

TELCO road वरील एका premises च्या गेट मधून ही व्यक्ती अस्खलित इंग्रजी बोलणार्या पुणेकर तरुणीचे मार्गदर्शन घेत Telco Road वर चालत येताना दिसते.बालगंधर्व ला जाण्यासाठी 396 क्रमांकाची Bus ते पकडतात असे या video मधे चित्रित झाले आहे. मोकळा परिसर, हिरवळ व निवांत अशा भागातून ही बस पुढे जाते.

मॉडर्न ला उतरून बाल गंधर्व ला….

अतिशय Candid Vibe असलेल्या या video मधे नकळत 25 वर्षांपूर्वीच्या पुणे PCMC परिसराचा मोकळेपणा व इथल्या माणसांचा साधेपणा कालकुपीत बंद करून ठेवला गेला आहे.

प्रेम भावाने नमस्कार करणारे गेट वरचे security वाले काका, ST बस ड्रायव्हर चे भावपूर्ण अभिवादन. “मॉडर्न च्या स्टॉप वर उतरून बाल गंधर्व साठी चालत जावे लागेल!” असे अदबशीर सांगत रंगीत तिकिट देणारे कंडक्टर. अशी आज आभावानेच दिसणारी पुण्याची माणसे या video मधे दिसतात.

पुणेकरांच्या nostalgic अशा comment

पुणेकरांनी हां व्हिडिओ पाहून nostalgic अशा comment केलेल्या दिसतात.

एकाने कमेंट मधे.. ” सोनेरी दिवस! ” असे लिहिले आहे.

“तेंव्हा प्रवास करताना मजा यायची.. आता अंगावर काटा येतो” असे ही एकाने म्हटले आहे.

PCMC आज smart city झाली असली तरी अडीज दशकांपूर्वीचा गोडवा व माणुसकी कुठेतरी हरवलेली आहे हे हा video पहाताना जाणवते.

About The Author

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment