Bollywood चे महान संगीतकार S D Burman यांनी संगीतकार म्हणून नाव कमावले ते त्यांच्या सायन स्टेशन जवळच्या घरातील वास्तव्यात
कुर्ल्याहून निघालेली CST स्टेशन ची लोकल काही मिनीटांत सायन(Sion) स्टेशन ला थांबे. लोकल मधून उजव्या बाजूला एका छोट्याशा टेकडीवर वैशिष्ट्यपूर्ण असे स्थापत्य असलेली व हेरिटेज बिल्डिंग वाटावी अशी इमारत दिसे (अजूनही दिसते) या इमारतीबद्दल नेहमीच मनात कुतूहल होते . पुढे असे कळले की या इमारतीत प्रसिद्ध संगीतकार एस डी बर्मन रहात होते.
४० च्या दशकातील बंगालचा दुष्काळ
S D Burman यांनी मुंबईस येण्याचा निर्णय कुठल्या परिस्थितीत घेतला हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल .४० च्या दशकातल्या बंगालच्या भयानक दुष्काळाने बंगाल मधे हजारो गरीब लोक उपासमारीने मृत्यू पावत होते. यंत्रणा कोलमडली होती. S D बर्मन तसे सुस्थापित राजवंशातील व्यक्ती पण एकूण दुष्काळग्रस्त परिस्थिती पाहता एस डी बर्मन यांनी मुंबईला येण्याचे ठरवले आणि मुंबईच्या Bollywood ला एस डी बर्मन हे थोर संगीतकार मिळाले .
याच काळात मुंबई ने सायनची वेस ओलांडली
बंगालच्या दुष्काळाने अजून एक गोष्ट मुंबई ला दिली आणि ती म्हणजे चेंबूर व सायनला जोडणारा हायवे. त्या पूर्वी मुंबई फक्त सायन पर्यंतच सीमित होती. सायनचे मूळ नाव शिव (boundary ) वेस या अर्थाने आहे. ब्रिटिश सरकारने फक्त दोन वेळच्या जेवणाच्या मोबदल्यात बंगालमधील दुष्काळग्रस्त गरीब मजुरांना चेंबूर- सायन हा मार्ग बांधण्याच्या कामावर रुजू केले व या खाडीत भराव टाकून बांधलेल्या मार्गामुळे मुंबई सायनच्या वेशी पुढेही विस्तारित होवू शकली.
इच्छा नसताना मुंबई कडे आले
बंगाल मधे दुष्काळ पडला नसता तर कदाचित एस डी बर्मन मुंबई कडे फिरकले नसते. आपण फक्त बंगाली चित्रपटांत संगीत द्यायचे असे त्यांनी पक्के ठरवले होते . 1942 ला रणजीत स्टुडिओ चे मालक सरदार चंदुलाल शहा यांचे आमंत्रण ही त्यांनी नाकारले होते. पण बंगालच्या भयानक दुष्काळाने बर्मनंदांना मुंबईची वाट दाखवली.
1944 च्या ऑक्टोबर महिन्यात Bombay Mail ने एस डी बर्मन मुंबईत दाखल झाले. इथे मुंबईच्या लोकांनी त्यांचे आडनाव उच्चाराच्या गफलतीमुळे बर्मन वरून वर्मन करून टाकले. नाव बदलले जाण्याबाबत बर्मनंदांना खंत नव्हती. उलट ते एस डी वर्मन अशी सही ही करू लागले पण आहार बदल त्यांनीं स्वीकारला नाही. त्यांचे आवडते खाद्य मासे खाणे त्यांनीं मुंबईत ही यथेच्छ सुरू ठेवले ..सुरुवातीला मासे खाणे निशिद्ध मानणार्या बोरिवलीतील एका सोसायटी ते राहत. बर्मनदा कायम सोसायटी चा हा कायदा मोडत व कधी घर मालकीण आली की मग लगबगीने उदबत्त्या लावून घरातील माशांचा वास घालवण्याचा खटाटोप केला जाई. वर्षभरानंतर बरमनदांची मुंबईतील पहिली फिल्म ‘शिकारी’ रिलीज झाली . तेव्हाचे नवोदित लेखक सदाअत हसन मंटो या चित्रपटाचे लेखक होते. या चित्रपटाच्या क्रेडिट मध्ये मात्र संगीतकार म्हणून एस डी वर्मन यांचे नाव देण्यात आले नव्हते.
चालीवर गाणे लिहिण्याची प्रथा सुरू केली
या दरम्यान Bollywood Film music history मधे एक नवी प्रथा बर्मनदांमुळे रुजली.
बंगाली बर्मनदांना हिंदी व उर्दू भाषा अवगत नसल्यामुळे बर्मन दा आधी चाली लावत व मग त्या चालींवर गीत लिहिले जाई. ही चालीवर गाणे लिहिण्याची पद्धत प्रथम बर्मन दांनी Bollywood मधे सुरू केली. आज नवीन संगीतकार सर्रासपणे या पद्धतीने गाणी संगीतबद्ध करताना दिसतात.
सायनच्या घरातील वास्तव्य
SD Burman यांना संगीतकार म्हणून नाव मिळवून दिले ते 1947 च्या ‘दो भाई’ या यशस्वी चित्रपटाने आणि यानंतरच त्यांनी त्यांच्या Sion च्या घरात प्रवेश केला . सायन च्या R V Santorium housing society च्या चार बेडरूम च्या प्रशस्त फ्लॅट मधे एस डी बर्मन शिफ्ट झाले. इथूनच त्यांचा संगीतकार म्हणून यशस्वी प्रवास ही सुरू झाला.विशेष म्हणजे महंमद रफी यांचा गायक म्हणून ही हा पहिला चित्रपट होता. सायन स्टेशन जवळच्या याच R V Santorium सोसायटी च्या घरात आल्यावर एस डी बर्मन हे फिल्मिस्तान स्टुडिओच्या करारातून मुक्त झाले. याच घरात आल्यावर एस डी बर्मन यांचा चित्रपटाच्या नामावलीत “संगीतकार -कुमार सचिन देव वर्मन” असा रितसर उल्लेख होवू लागला. एका चित्रपटात तर त्यांनी अभिनेते राज कपूर यांच्या कडून ही गाणे गावून घेतले.
अपयशी चित्रपटामुळे सायनचे घर सोडावे लागले पण पुन्हा भरारी घेतली
सायनच्या घरात दोन वर्षे सर्व व्यवस्थित चालले पण १९४९ चा ‘कमल के फूल’ हा त्यांचा चित्रपट पडला. पुढे आर्थिक विवंचना आली . एस डी बर्मन यांनी आता सायन च्या घराच्या चार बेडरूम पैकी दोन बेडरूम भाड्याने दिले. पुढे त्यांनी सायन चे घर सोडले व माहीम च्या एव्हर ग्रीन हॉटेल मधे राहू लागले.
१९५१ ला मात्र त्यांचे नशीब पालटले. ‘बाजी’ चित्रपट सुपरहिट झाला. मरीन लाईन्स च्या सी ग्रीन हॉटेल पासून ते थेट बांद्र्याच्या लिंकिंग रोड च्या जेड बंगल्यात त्यांनी प्रवेश केला.
मुंबई च्या लोकल ट्रेन शी जुळलेली संगीत लय
एस डी बर्मन यांनी Film music director म्हणून नाव कमावले ते सायन रेल्वे स्टेशन जवळ च्या त्यांच्या R V Santorium housing society मधील घरामधे. बांद्रा स्टेशन वर एकदा रेल्वे रुळांवर काम करणारे मजूर त्यांचे गाणे म्हणत कष्ट करताना पाहून ते एवढे तल्लीन झाले की त्यांची मालाड ट्रेन सुटली. अशाप्रकारे,आपली गाणी लोकप्रिय होत आहेत याची प्रचिती ही एस डी बर्मन यांना मुंबई च्या लोकल ट्रेन च्या स्थानकावर आली.
मुंबई च्या लोकल ट्रेनची आणि संगीताची लय एक करणारी आणखी एक घटना अशीच Sion रेल्वे स्टेशन वरून सुटलेल्या लोकल मधे घडली होती. मराठीतले प्रसिद्ध गीतकार मंगेश पाडगावकर ही सायन उपनगराचे रहीवासी. एकदा भर उन्हाळ्यात त्यांनी सायन स्टेशन वरून लोकल पकडली. मुंबई च्या दमट हवेत ते एकीकडे घामाघूम झाले होते आणि दुसरी कडे त्यांना काव्यं सुचत होते…”श्रावणात घन निळा बरसला “ पाडगावकरांचे हे गीत मराठी film music history मधे अजरामर झाले आहे.
हे ही वाचा
चार्ली चॅपलीन यांना आवडलेला मराठी चित्रपट
अमिताभ बच्चन- न मिटणारी दगडावरची रेघ







