Avinash Ghodke

Screenwriter and Lyricist with 20 years of experience in Bollywood and Marathi cinema.His creative writing examines the contradictions of lived experience, while his journalism uncovers humanism beneath headlines.

Charlie Chaplin यांना आवडला होता हा मराठी चित्रपट – म्हणाले होते It has a soul !..

भारतीय चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ असलेल्या १९३०च्या दशकात, V Shantaram यांच्या प्रभात फिल्म कंपनीने एक असा चित्रपट बनवला जो सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचा होता. या चित्रपटाने Charlie Chaplin या महान आंतरराष्ट्रीय कलाकाराचं लक्ष वेधून घेत वैश्विक सिने संस्कृती मधे मराठी सिनेमाची ओळख निर्माण केली .

Manus 1939 Marathi film poster courtesy Google

V Shantaram यांचा माणूस चित्रपट Charlie Chaplin यांना आवडला होता. माणूस चित्रपटात ‘आत्मा’ आहे असे ते म्हणाले होते.

V. Shantaram यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट, एका आदर्शवादी पोलीस हवालदाराच्या संघर्षाची कथा सांगतो. त्याच्या जीवन दृष्टीमधे त्याने माणुसकीला दिलेलं स्थान, आणि समाजातील वाईट प्रवृत्तींविरोधात त्याने दिलेली निःशब्द लढाई . या सगळ्याचा एकत्रित परिणाम इतका प्रभावी होता, की तो थेट चार्ली चॅपलीनसारख्या महान कलाकाराच्या काळजाला भिडला.

चित्रपटाचा सारांश : ‘माणूस’ म्हणजे माणुसकीचा आरसा

मुख्य पात्र गणपत, एक सद्सद्विवेकबुद्धी असलेला पोलीस कॉन्स्टेबल. तो एका कलावंतिणीच्या रूपा मध्ये माणूसपण पहातो आणि तिच्या उद्धारासाठी प्रयत्न करतो. त्याचा हा प्रवास सोपा नसतो. समाजाचा विरोध, स्वतःचे भावनिक संघर्ष आणि नैतिक पेच .या सगळ्याचा सामना करत गणपत पुढे चालत असतो.

चित्रपटात कुठेही उपदेश नाही, तरीही प्रत्येक फ्रेम आपल्याला अंतर्मुख करते. प्रेम, करूणा, नीतिमत्ता आणि रूढी वादी ,दांभिक समाजाचं स्वरूप यांचा हळुवार वेध घेत ‘माणूस’ आपल्याला विचार करण्यास भाग पाडतो

आपण खरोखर माणूस आहोत का?

Charlie Chaplin यांना आवडला होता हा मराठी चित्रपट - म्हणाले होते It has a soul !..

चार्ली चॅपलीन यांची प्रतिक्रिया : IT HAS SOUL

Charlie Chaplin, यांनी आपल्या मूक चित्रपटांमधून मूक अभिनय आणि सूक्ष्म भावभावनांच्या माध्यमातून जागतिक प्रेक्षकांपर्यंत माणुसकीचाच संदेश पोचवला होता. त्यामुळेच V Shantaram यांचा ‘माणूस‘ हा मराठी चित्रपट त्यांना फार आवडला होता.

Filmindia या जुन्या मासिकात आणि काही ऐतिहासिक दस्तावेजांमध्ये असा उल्लेख आहे की चॅपलीन यांनी हा चित्रपट पाहून ‘It has soul’ अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यांच्या दृष्टीने, माणूस हा चित्रपट फक्त एक कथानक नव्हता, तर तो एका संस्कृतीची, त्या संस्कृतीतील लोकांची आणि त्यांच्या भावविश्वाची ओळख होता.

जगाच्या पटलावर मराठी चित्रपट

माणूस हा चित्रपट मराठी सिने जगतासाठी एक अभिमानाची बाब आहे. जेव्हा Charli Chaplin सारख्या एका जागतिक पातळीवरील चित्रपटकाराकडून कौतुक मिळतं, तेव्हा त्या चित्रपटाचं मूल्य केवळ ‘सिनेमा’ म्हणून मर्यादित राहत नाही तर तो एक सांस्कृतिक अभिमान बनतो.

१९३९ साली V Shantaram यांनी मांडलेलं चित्रण, मास्तर कृष्णरावांचं संगीत, आणि के. नारायण काळे यांची गीते या सगळ्यांनी मिळून ‘माणूस‘ (1939)हा मराठी चित्रपट काळाच्या कसोटीवर उतरलेला ‘अजरामर’ चित्रपट ठरला आहे.

आज आपण सोशल मीडियाच्या झगमगाटात, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या भरवश्यावर, भरपूर कंटेंट निर्मितीत रमलो आहोत. पण असे काही कालातीत चित्रपट असतात, जे अजूनही आपल्या मनाच्या कोपऱ्यात अस्वस्थता निर्माण करतात व‌ आपल्यातील माणूसपणाला साद देतात.

चार्ली चॅपलीन यांच्यासारखा जगप्रसिद्ध कलाकाराने व्ही शांताराम यांच्या माणूस या मराठी चित्रपटाला दिलेली दाद ही स्वाभिमानाने मिरवण्यासारखी गोष्ट नक्किच आहे. आज मराठी चित्रपट Box office वर नवनवे उच्चांक गाठत आहे. माणूस चित्रपटाप्रमाणे जागतिक पातळीवर ही तो लवकरच मोहर उमटवेल


लेखक टिप:
जर आपल्याला असे वाटत असेल की माणूस पाहावा, समजून घ्यावा, तर तो Shemaroo Marathi Bana या youtube channel वर उपलब्ध आहे.

आपण १९३७ सालचा चित्रपट पाहत आहोत व त्याकाळच्या तांत्रिक मर्यादां चे‌ भान ठेवून पाहिल्यास रसग्रहण सोपे होईल.

.मोठ्या पडद्यावर पहायचे असल्यास पुण्याच्या Film Archive मधे व मुंबई च्या Films Division च्या Film museum ( पेडर रोड , वरळी)येथे चौकशी करून तो पाहता येईल.


हे ही वाचा

हिटलर च्या वंशवादाला अवैज्ञानिक ठरवणारी महिला वंशशास्त्रज्ञ

येशू ख्रिस्त भारतात आले होते का?

प्यासा मधला गुरूदत्त यांचा दरवाजातला शॉट -किस्सा Pyasa Cinematogrphy चा

मराठी कलाकार एवढे जबरदस्त काम करतात पण त्यांच्या कामाचा गवगवा का नाही? – नवाजुद्दिन सिद्दीकी यांनी व्यक्त केलेली खंत!

Apple iPhone Logo Design मधे’ सफरचंद’ चावा घेतलेले का दिसते? – जाणून घ्या

About The Author

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment