खेळ,कला-संस्कृती ची परंपरा असलेले सांगली स्मृती मंधाना मुळे पुन्हा प्रकाशात
महाराष्ट्राच्या नकाशावर सांगली शहर हे ऊस, तंबाखू आणि हातमागासाठी ओळखले जाते. पण सध्या सांगली शहर एका नावामुळे जगभरात गाजत आहे -ते आहे – स्मृती मंधाना.
3 नोव्हेंबर 2025 ला भारताचा पहिला महिला विश्वचषक जिंकणार्या भारतीय महिला क्रिकेट संघाची ही डावखुरी फलंदाज आज जगभरात प्रसिद्ध झाली आहे, पण तिची मुळे अजूनही तिच्या मातीशी, तिच्या सांगलीशी जोडलेली आहेत.
लहानपण: चेंडू आणि बॅटचे खेळ
Smriti Madhana यांचा जन्म १८ जुलै १९९६ रोजी मुंबईत झाला, पण वयाच्या दुसऱ्याच वर्षी तिचे कुटुंब सांगलीत येवून स्थायिक झाले. तिचे वडील श्री. निरंजन मंधाना आणि आई स्मिता मंधाना यांनी तिला लहानपणापासूनच क्रिकेटचे वातावरण दिले. स्मृती आणि तिचा भाऊ श्रवण यांचे क्रिकेटचे शिक्षण सांगलीतल्या मैदानावरच झाले. तिच्या वडिलांचीच प्रेरणा होती, ज्यांनी लहान वयातच तिला क्रिकेटचे साहित्य दिले आणि प्रशिक्षणासाठी प्रोत्साहन दिले.
कुटुंब व सांगलीचा मजबूत पाठिंबा
मंधाना कुटुंब हे सांगलीच्या माधवनगर भागातील एक सामान्य मध्यमवर्गीय कुटुंब आहे. स्मृतीचे वडील निरंजन यांनी तिच्या क्रिकेट प्रवासातील सर्व स्पर्धा आणि सरावासाठी अथक परिश्रम घेतले. तर आई स्मिता यांनी घर आणि क्रिकेट अशा दोन्ही front ला सांभाळले. स्मृतीने एका मुलाखतीत सांगितले होते की, “माझे वडील आणि आई यांनी माझ्या स्वप्नासाठी आपले सर्व काही त्याग केले. मी जेव्हा लहान होते, तेव्हा वडील मला सरावासाठी दूरदूरच्या मैदानावर न्यायचे.” तिचा भाऊ श्रवण हा तिचा साथीदार तसेच स्पर्धकही होता. दोघांनी एकमेकांशी सराव करत सांगली आणि आसपासच्या खेड्यांतील मैदानांवर आपले क्रिकेट कौशल्य वाढवले.
शिक्षण आणि क्रिकेटचा समतोल
स्मृती ने आपले शालेय शिक्षण सांगलीतून पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी सांगलीतील प्रतिष्ठित चिंतामण राव कॉलेज ऑफ कॉमर्स, साइन्स अँड आर्ट्स मधून उच्च शिक्षण घेतले. कॉलेजमधून तिला पूर्ण सहकार्य मिळाले, ज्यामुळे शिक्षण आणि क्रिकेट यामध्ये योग्य समतोल राहिला. सांगलीच्या साध्या वातावरणात मोठ्या झालेल्या स्मृतीमध्ये आजही साधेपणा आणि मृदुपणा जपलेला दिसतो.
आंतरराष्ट्रीय कारकीर्द: सांगलीचा दबदबा
Smriti Madhana हिने फक्त ९ वर्षांच्या वयात महाराष्ट्र राज्य संघासाठी पदार्पण केले. २०१४ मध्ये स्मृती मंधाना ने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले आणि लवकरच आपल्या आक्रमक फलंदाजीची छाप पाडली. २०१८ मध्ये तिला ICC वूमन्स क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २०२१ मध्ये ती ऑस्ट्रेलियाच्या महिला बिग बॅश लीग मध्ये खेळणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली. प्रत्येक यशानंतर ती सांगलीत परतते आणि सांगलीकर तिचे जोशाने स्वागत करतात.
सांगलीची खेळ परंपरा -सांगली हे दिग्गज क्रिकेटर विजय हजारे यांचे ही गाव
सांगली च्या मातीत अनेक क्रिकेटपटू घडले आहेत. The great cricketer विजय हजारे (सर डॉन ब्रॅडमन यांची तीनदा विकेट घेणारे गोलंदाज आणि माजी कर्णधार), विठ्ठल जोशी, विजय भोसले यांनी क्रिकेटमध्ये सांगलीचे नाव रोषण केले- Sangli cricketers
सांगली जिल्ह्याने इतरही अनेक खेळांमध्ये देशभरात ओळख निर्माण केली आहे. सांगलीला कुस्तीचीही मोठी परंपरा आहे . हिंदकेसरी मारुती माने, भारतभीम जोतिराम सावर्डेकर, व्यंकाप्पा बुरुड, गणपत खेडकर (पहिले डबल महाराष्ट्र केसरी) आणि चंद्रहार पाटील (२००७ आणि २००८ चे महाराष्ट्र केसरी) सारख्या पैलवानांनी जिल्ह्याचा लौकिक देशभरात केला आहे .
“बुद्धिबळाचे गाव” म्हणून ओळख
सांगलीला “बुद्धिबळाचे गाव” म्हणून ही ओळखले जाते आणि याचे श्रेय भाऊसाहेब पडसलगीकर यांना दिले जाते . त्यांनी ५० वर्षे सलग बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्याचा विक्रम केला . नूतन बुद्धिबळ मंडळ (स्थापना १९४१) सारख्या संस्थांमुळे सांगलीतून भाग्यश्री साठे-ठिपसे, स्वाती घाटे सारख्या आंतरराष्ट्रीय खेळाडू घडले . १९८६ मध्ये सांगलीत झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत विश्वनाथन आनंद हजर होते .
सांगली: कला संस्कृती चा वारसा सांगणारी नाट्यपंढरी
सांगली शहर “नाट्यपंढरी” म्हणून ओळखले जाते आणि त्याची संगीत परंपरा खूप मोठी आहे .अर्वाचीन मराठी रंगभूमीवर पहिले नाटक “सीता स्वयंवर” सांगलीत ५ नोव्हेंबर १८४३ रोजी सादर झाले . गोविंद बल्लाळ देवल (ज्यांनी ‘शारदा’ लिहिले) आणि कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर सारखे महान नाटककार सांगलीचे होते .सांगलीत ‘सदासुख’ नाट्यगृह १८८७ मध्ये बांधण्यात आले . पृथ्वीराज कपूर यांनी येथे हिंदी नाटके ही सादर केली.
स्मृती मंधाना चे सांगली शी अतूट नाते
स्मृती मंधाना हिच्या प्रत्येक चेंडूफेकीमागे सांगलीच्या मैदानांवरचे असंख्य सरावसत्रे आणि कुटुंबियांच्या प्रेमाचा आधार आहे. Smriti Madhana हे केवळ एक नाव नाही, तर महाराष्ट्राच्या व विशेषतः सांगलीच्या मातीचा गौरव आहे.आज जगभरात झळकत असतानाही स्मृती आपले नाते सांगलीशी तुटू देत नाही. स्मृती सांगलीत ‘SM18 स्पोर्ट्स कॅफे‘ नावाचा कॅफे चालवते, ज्यामुळे ती तिथल्या युवकांशी थेट संपर्कात राहते. सांगलीकर आज स्मृतीकडे फक्त क्रिकेटपटू म्हणून नव्हे तर त्यांच्या Sangali शहराचा अभिमान म्हणून पाहतात.

हे ही वाचा: Paris च्या Eiffel tower वर सायकल चढविण्याचा विक्रम करणारा तरूण – कोल्हापुरी चप्पल: इटली च्या Prada ने चोरली design








Apratim lekh👏🏻
Thanks Vaishali 🙏