Avinash Ghodke

Screenwriter and Lyricist with 20 years of experience in Bollywood and Marathi cinema.His creative writing examines the contradictions of lived experience, while his journalism uncovers humanism beneath headlines.

कोल्हापुरी चप्पल Controversy नंतर Prada चे लोक कोल्हापुरात दाखल – भविष्यात स्थानिक कारागिरां सोबत करार होणार

इटलीतील प्राडा (Prada) या जगप्रसिद्ध लक्झरी फॅशन ब्रँडने त्यांच्या नवीन कलेक्शनमध्ये ‘कोल्हापुरी स्टाइल’ चप्पल लाँच केल्या. मात्र, या चप्पलवर त्यांनी ‘मेड इन इटली’ असा ठसा लावल्यामुळे कोल्हापूरमधील कारागीर व व्यावसायिकांत नाराजीचा सूर उमटला.महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स च्या पाठपुराव्या नंतर Prada ची टीम कोल्हापुरात दाखल झाली आहे.Kolhapuri and Prada issue resolved

कोल्हापुरी चप्पल Controversy नंतर Prada चे लोक कोल्हापुरात दाखल - भविष्यात स्थानिक कारागिरां सोबत करार होणार

इटलीच्या Prada प्रतिनिधींची कोल्हापूर भेट ही स्थानिक कारागिरांसाठी आशेचा किरण

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक समृद्धीचे प्रतीक ठरलेल्या कोल्हापुरी चप्पल या पारंपरिक हस्तकलेला जागतिक पातळीवर मान्यता मिळत असतानाच, नुकत्याच घडलेल्या एका वादामुळे कोल्हापूरची चर्चा नव्या पद्धतीने झाली. आता Prada ची टीम कोल्हापुरात दाखल झाल्याने या वादाची परीणीती व्यावसायिक सामंजस्यात होईल असे आशादायक चित्र निर्माण झाले आहे.

वाद कशामुळे झाला?

कोल्हापुरी चप्पलांना भौगोलिक निर्देशांक (GI Tag) मिळालेला आहे. या चप्पलांचे पारंपरिक डिझाईन, त्यांच्या तयार करण्याची कला आणि विशिष्ट प्रकारचे कातडं वापरण्याची पद्धत ही सर्व कोल्हापूर आणि कर्नाटकातील काही जिल्ह्यांपुरती मर्यादित आहे.प्राडाने या पारंपरिक डिझाईनवर आधारित चप्पल तयार करून त्यांना ‘ऑथेंटिक’ (Authentic)असे संबोधल्यामुळे कोल्हापुर च्या स्थानिक कोल्हापुरी चप्पल उत्पादकांनी आक्षेप घेतला होता. त्यांनी असा दावा केला की, हे केवळ कोल्हापूरच्या कारागिरांचे हस्तकौशल्य आहे आणि परदेशी ब्रँड्सने त्याचा वापर करून चुकीच्या पद्धतीने ‘मालकी’ सांगणे योग्य नाही.(Kolhapuri and Prada issue resolved)

महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सची मध्यस्थी

कोल्हापूरमधील उद्योजक आणि चप्पल संघटनांनी या प्रकरणाची दखल घेण्यासाठी महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर यांच्याकडे धाव घेतली.महाराष्ट्र चेंबर्सने या प्रकरणात दोन्ही बाजूंशी संवाद साधून तोडगा काढण्याचे ठरवले. त्यांनी प्राडा कंपनीला औपचारिक पत्र पाठवले आणि कोल्हापुरी चप्पलचा पारंपरिक वारसा समजावून सांगितला. या चेंबरने प्राडाला भारतात येऊन प्रत्यक्ष अनुभव घेण्याचे आमंत्रण दिले.

Maharashtra chambers of commerce चे अध्यक्ष ललित गांधी यावेळी पत्रकारांना संबोधित करत म्हणाले की प्राडाची टीम कोल्हापुरात आल्यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष कोल्हापूरच्या या पारंपरिक व्यवसायाकडे आकर्षित झाले आहे. कोल्हापूरच्या स्थानिक कारागिरांचा विकास हा झालाच पाहिजे व त्यासाठी प्राडाने कोल्याब्रेशन (Collaboration)तत्वावर काम करावे ही भूमिका यावेळी त्यांनी मांडली.ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्राडाच्या उच्च अधिकार्यांचे एक मंडळ पुन्हा कोल्हापूरला येणार आहे असेही सूतोवाच त्यांनी केले.

प्राडाच्या चार सदस्यीय समितीची कोल्हापूर भेट

महाराष्ट्र चेंबर्सच्या पुढाकारानंतर प्राडाची चार सदस्यीय समिती कोल्हापूरला आली.या प्रतिनिधींमध्ये प्राडाच्या प्रोडक्ट डिझाईन हेडपासून ते सप्लाय चेन विभागातील अधिकारी होते.त्यांनी कोल्हापुरातील शिरोली एमआयडीसी, चप्पल गल्ली, तसेच अनेक छोट्या कारागीरांचे वर्कशॉप प्रत्यक्ष पाहिले. तिथे कसे हाथसडीवर चामड्याची नक्षीकाम केली जाते . कसलीही झीज न होण्यासाठी खास प्रकारचा तेलाचा वापर केला जातो, हे त्यांनी जवळून पाहिले.तेथील काही कारागिरांनी त्यांच्या पिढ्यान् पिढ्या चालत आलेल्या कौशल्याची गोष्ट Prada team ला सांगितली. प्राडाच्या प्रतिनिधींनी या कलेला व कारागिरांच्या निष्ठेला मनापासून दाद दिली.

संभाव्य सामंजस्य करार

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राडा व महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स यांच्यात सकारात्मक चर्चा झाली असून, भविष्यात प्राडा कोल्हापुरी चप्पलच्या खास संग्रहासाठी थेट कोल्हापूरमधून खरेदी किंवा कोलॅबोरेशन करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.यामुळे स्थानिक कारागिरांना जागतिक बाजारपेठ खुली होईल व त्यांच्या उत्पादनाला प्रीमियम दर्जा मिळेल.(Kolhapuri and Prada issue resolved)

MAHARASHTRA CHAMBERS OF COMMERCE चेअध्यक्ष ललित गांधी यांनी MCC ची भूमिका मांडली

पत्रकारांना संबोधित करत गांधी म्हणाले की प्राडाची टीम कोल्हापुरात आल्यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष कोल्हापूरच्या या पारंपरिक व्यवसायाकडे आकर्षित झाले आहे. कोल्हापूरच्या स्थानिक कारागिरांचा विकास हा झालाच पाहिजे व त्यासाठी प्राडाने कोल्याब्रेशन तत्वावर काम करावे ही भूमिका यावेळी त्यांनी मांडली.ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्राडाच्या उच्च अधिकार्यांचे एक मंडळ पुन्हा कोल्हापूरला येणार आहे असेही सूतोवाच त्यांनी केले.

कोल्हापुरी चप्पलचा जागतिक प्रवास

हे लक्षात घेण्यासारखे आहे की, कोल्हापुरी चप्पल केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिलेली नाही. तिच्या टिकाऊपणामुळे आणि खास डिझाईनमुळे युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलियासह अनेक देशांत तिची मागणी वाढली आहे.मात्र, आता प्रत्यक्ष जगप्रसिद्ध ब्रँड कोल्हापूरला भेट देऊन येत आहे, हे कोल्हापूरसाठी मोठे यश आहे.

निष्कर्ष

कोल्हापुरी चप्पल हा केवळ फॅशनचा ट्रेंड नाही तर हा आपल्या संस्कृतीचा वारसा आहे. या वादातून पुढे निर्माण होणारे नवे व्यावसायिक दुवे कोल्हापूरच्या हस्तकलेला जागतिक व्यासपीठावर नेण्यासाठी मोलाचे ठरतील.या सर्व घडामोडींनी कोल्हापूरमधील स्थानिक कारागिरांमधे नवा आशेचा किरण निर्माण झाला आहे.

हे ही वाचा

➡️Prada Chai perfume: चहाचा सुगंध बाटली बंद केलाय Prada ने – luxury perfume ची किंमत एकूण म्हणाल ‘चाय ला !’…

➡️Prada Kolhapuri ची किंमत स्कूटर एवढी – नफ्यातून कोल्हापुरी चप्पल कारागिरांना मोफत प्रशिक्षण देणार प्राडा

About The Author

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment