संत तुकाराम आणि शेक्सपियर – 8 वर्षांची समकालीनता -ब्रिटिशांनी छापली पहिल्यांदा गाथा
संत तुकाराम आणि शेक्सपियर हे 1608 ते 1616 या आठ वर्षांच्या काळात या पृथ्वीतलावर समकालीन म्हणून जगत होते. कर्मस्थळे व लेखन क्षेत्रे भिन्न असली तरी जोरकस आक्रमक व ‘दबंग’ शैली व माणूसपणा ला केंद्र स्थानी ठेवण्याची त्यांची वृत्ती एकच होती






