Avinash Ghodke

Screenwriter and Lyricist with 20 years of experience in Bollywood and Marathi cinema.His creative writing examines the contradictions of lived experience, while his journalism uncovers humanism beneath headlines.

भारतीय कुटुंबाने गाई घरात पूजल्या म्हणून Texas वासी संतप्त – Cow Boys च्या देशात गाईंना घरात आणने असंस्कृत

अमेरिकेचे Texas हे राज्य Cow Boys country असं सांस्कृतिक बिरूद मिरवते . याच Texas मधे एका भारतीय कुटुंबाने गृहप्रवेश पूजेसाठी व Gau Seva करण्यासाठी गाईंना घरात आणल्याचा वीडियो पाहून टेक्सास च्या लोकांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे.

काय होता वीडियो

जानेवारी २०२६ मधे Dallas या Texas च्या उपनगरात एका भारतीय कुटुंबाने गृहप्रवेश पूजेचा केलेला video “Texas Gaushala’ या संस्थेच्या FACEBOOK पेजवर पोस्ट करण्यात आला होता.या पोस्टमध्ये “गौ माता’ घरात येणे म्हणजे परमेश्वरी आशिर्वाद व समृद्धीचे लक्षण आहे” असे म्हटले होते.

Texas Gau Seva -मूळ व्हिडिओ चा Screen shot

हा व्हिडिओ डल्लास(Dallas)उपनगरातील एका भारतीय कुटुंबाच्या नवीन घरातील आहे. त्यात एक हिंदू कुटुंब, पारंपरिक ‘गृहप्रवेश’ पूजा विधी चा भाग म्हणून, दोन गायींना घरात आणून त्यांची पूजा करताना दिसत आहे. गाईला प्रेमाने घरात आणतानाचे दृश्य यात आहे. या गाईला डोक्यावर गजरा माळल्याचे ही यात पहायला मिळते. गाईला नवीन घराच्या मुख्य हॉल मधे फिरवून तिची पूजा करण्यात येत आहे असे या video मधे चित्रित झाले आहे.

Texas Gau Seva – मूळ व्हिडिओतील screen shot

जानेवारी मधे फेसबुक वर आधी पोस्ट झालेला हा Gau Seva video काही दिवसांपूर्वी X ( Tweeter) वर पुन्हा पोस्ट करण्यात आला. यावेळी हा वीडियो viral झाला. स्थानिक Texas वासियांनी व्हिडिओ मधील गाईंना घरात घेण्याच्या कृतीला प्रागैतिहासिक व असंस्कृत म्हणत आपला तीव्र आक्षेप नोंदवला आहे

काय म्हणतात विरोधक?


एकात्मतेचा अभाव: एका X युजरने हा एकात्मतेचा अभाव आहे असे म्हटले आहे. तर एका यूजरने थेट ” ही अश्मयुगीन मानसिकता आहे.” असे म्हणून आपली नापसंती दर्शवली आहे.

भारतीयांनी मात्र ” रात्री घरात दारू पार्टी करण्याहून ही पूजा जास्त सुसंस्कृत आहे” असे उत्तर दिले आहे.

हे ही वाचा: ▶️No Kings आंदोलन: ८० लाख अमेरिकन रस्त्यावर उतरले- Donald Trump विरोधात जोरदार निदर्शने▶️Apple logo ची जन्म कथा आणि लोक कथा ▶️अंजीर झाडाचे धार्मिक महत्त्व- Fig Tree

About The Author

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment