Avinash Ghodke

Screenwriter and Lyricist with 20 years of experience in Bollywood and Marathi cinema.His creative writing examines the contradictions of lived experience, while his journalism uncovers humanism beneath headlines.

Bollywood still photographer जगदीश माळीं चा शेवट दु:खद होता । Its life …..YOU KNOW !!!

जगदीश माळी – Bollywood Still Photographer 



रुपारेल कॉलेज ला नाटक वेडया मित्रांना भेटायला जायचो. एक  मित्र एकदा  दुरून जाणाऱ्या गोर्यापान मुलीकडे बघत म्हणाला …ही जगदीश माळींची
मुलगी… अंतरा!” . जगदीश माळी यांची फोटोग्राफी खूप आवडायची मला ..ते स्टार फोटोग्राफर होते.
 

जगदीश माळींची पहिली भेट

 
एका मित्राच्या  फोटो सेशन च्या निमित्ताने त्यांची भेट झाली. वर्सोवा ,आराम नगर येथे एका रो हाउस मध्ये त्यांचा स्टुडीओ होता. गेट वर लेटर बॉक्स म्हणून त्यांनी पोस्टाचाच जुना लाल डबा आणून लावला होता . आतमधे मुख्य हॉल खणून थोडा खोल केला होता . त्याला चारी बाजूनी सलग संगमरवरी उतरत्या पायर्या होत्या. या रचने मुळे हॉल ला मंदिराचा फील येत होता. पोनी टेल बांधलेले , दाढी मिशी वाले माळी एका कोपर्यात स्लीवलेस टी शर्ट आणि शॉर्टस घालून बसले होते. माळी एखाद्या फकीरा सारखे दिसत होते.पण त्यांच बोलणं मात्र एखाद्या कॉलेज कुमारासारख होतं . आम्ही त्यांना त्यांची फी विचारली तर ते हसत म्हणाले ‘आम्ही माणसं बघून पुड्या बांधतो .. माणूस कुठल्या गाडीत बसून आलाय त्यावर डिपेंड असत ‘ ..यावर मी म्हणालो आम्ही तर बस मधून आलोय. बहुतेक त्यांना आधीज अंदाज आला असावा म्हणून त्यांनी विशेष प्रतिक्रिया दिली नाही. मी पुढे म्हणालो ‘रुपारेल ला अंतरा दिसते कधी कधी ‘ …यावर माळी म्हणाले ‘अरे ती फटाकडी आहे ‘ .. 
 

रेखा फेवरेट असं काही नाही 

 
Bollywood still photographer जगदीश माळी यांनी काढलेले रेखाचे अनेक पोर्ट्रेट प्रसिद्ध होते.. स्टुडीओत ही एका भिंतीवर रेखाचा ह्यूज पोर्ट्रेट होता. मी त्यांना विचारले ..’रेखा तुमची फेवरीट अभिनेत्री का ?’ त्यांच्या ‘असं काही नाही रे ‘ या अनपेक्षित उत्तरावर मी जरा उडालोच कारण माळींवर लिहून आलेल्या अनेक लेखांमधे ते रेखा ला photogenic मानतात असं मी वाचलं होतं.
 

फोटोग्राफी ची सहज शैली 

डेव्हिड नावाचा उंच जाडा मेकअपमन माळीं च्या शूट ला हजर असे. हा डेव्हिड हरहुन्नरी होता. तो मेकअप सोबतच माळींसोबत creative director सारखं ही काम करत असे. Model ला तो साभिनय विविध पोज करून दाखवी.चेहर्यावरचे भाव सांगी. मेकअप बरोबरच डेव्हिड ची या कामात ही हुकूमत होती. माळींनी ही त्याला पूर्ण मोकळीक दिली होती. 
स्टूडिओ नंतर  रो हाउस समोरच्या ग्राउंड वर open day light मधे माळींनी मित्राचे फोटोसेशन केले. मधेच तिथे पतंग उडवणार्या मुलांकडे जावून त्यांनी पतंग उडवली. समोरून जाणाऱ्या ग्यास सिलिंडर वाल्याची सिलिंडर ने भरलेली तिचाकी सायकल  त्यांनी फोटो मध्ये पार्श्वभूमीत वापरून घेतली.  फोटो टिपावा तसा माळी आयुष्याचा आला क्षण ही टिपत होते .. बोलण्यात सतत येणाऱ्या “यु नो!!! ” या शब्दांव्यतिरिक्त..त्यांच्याकडे जगण्याचा कुठ्लांही अभिनिवेश नव्हता. ते आपल्याच विश्वात रमलेले होते. माळी यांना मी नंतर ही एक दोन वेळा भेटलो. ते नेहमी माझ्याशी आस्थेने बोलले.
 

दु:खद शेवट- रोल संपला पण..


    जिथे जगदीश माळी यांचा स्टूडिओ होता त्याच आराम नगरच्या रस्तावर एका अभिनेत्री ने त्यांना भणंग-निष्कांचन अवस्थेत पाहिले.ते भ्रमिष्ट झाले  होते म्हणे  . अभिनेत्रीने सलमान ला फोन लावला. सलमान ने जगदीश माळीं साठी गाडी पाठवली .  सलमान ने त्यांना ‘काय झालं?’ असं विचारलं असेल .. बहुतेक ते म्हणाले असतील ‘
..इट्स लाईफ यु नो  ??’
काही कालावधीतच माळी गेल्याची बातमी येवून थडकली.
रोल संपला .. पण त्यांनी आपल्या कॅमेर्यात उमटवलेल्या ज्या काही प्रतिमा शिल्लक आहेत त्या अस्सल आहेत… You know !!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment