मौसमक्रिकेटऑपरेशन सिंदूरक्रिकेटस्पोर्ट्सबॉलीवुडजॉब - एजुकेशनबिजनेसलाइफस्टाइलदेशविदेशराशिफललाइफ - साइंसआध्यात्मिकअन्य

जगदीश माळी। veteran Bollywood still photographer । Its life …..YOU KNOW !!! ।

Its life…you know !!!
RIP Jagdish Mali ..
रुपारेल कॉलेज ला नाटक वेडया मित्रांना भेटायला जायचो. एक  मित्र एकदा  दुरून जाणाऱ्या गोर्यापान मुलीकडे बघत म्हणाला …ही जगदीश माळीनची मुलगी… अंतरा . जगदीश माळी यांची फोटोग्राफी खूप आवडायची मला ..ते स्टार फोटोग्राफर होते. एका मित्राच्या  फोटो सेशन च्या निमित्ताने त्यांची भेट झाली. वर्सोवा ,आराम नगर येथे एका रो हाउस मध्ये त्यांचा स्टुडीओ होता. गेट वर लेटर बॉक्स म्हणून त्यांनी पोस्टाचाच लाल डबा आणून लावला होता . आत मुख्य हॉल खणून थोडा खोल केला होता . त्याला चारी बाजूनी सलग संगमरवरी उतरत्या पायर्या होत्या. या रचणे मुळे हॉल ला मंदिराचा फील येत होता. पोनी टेल बांधलेले , दाढी मिशी वाले माळी एका कोपर्यात स्लीवलेस टी शर्ट आणि शॉर्टस घालून बसले होते. माळी एखाद्या फकीरा सारखे दिसत होते.पण त्यांच बोलणं मात्र एखाद्या कॉलेज कुमारासारख होतं . आम्ही त्यांना त्यांची फी विचारली तर ते हसत म्हणाले ‘आम्ही माणसं बघून पुड्या बांधतो .. माणूस कुठल्या गाडीत बसून आलाय त्यावर डिपेंड असत ‘ ..यावर मी म्हणालो आम्ही तर बस मधून आलोय. बहुतेक त्यांना आधीज अंदाज आला असावा म्हणून त्यांनी विशेष प्रतिक्रिया दिली नाही. मी पुढे म्हणालो ‘रुपारेल ला अंतरा दिसते कधी कधी ‘ …यावर माळी म्हणाले ‘अरे ती फटाकडी आहे ‘ ..  माळी यांनी काढलेले रेखाचे पोर्टरेट प्रसिद्ध होते.. स्टुडीओत ही एका भिंतीवर रेखाचा ह्यूज पोर्टरेट होता. मी त्यांना विचारले ..’रेखा तुमची फेवरीट अभिनेत्री का ?’ त्यांच्या ‘असं काही नाही रे ‘ या उत्तरावर मी जरा उडालोच.
माळींनि नंतर  रो हाउस समोरच्या ग्राउंड वर  मित्राचे फोटोसेशन केले. मधेच तिथे पतंग उडवणार्या मुलांकडे जावून त्यांनी पतंग उडवली. समोरून जाणाऱ्या ग्यास सिलिंडर वाल्याची सिलिंडर ने भरलेली तिचाकी सायकल  त्यांनी फोटो मध्ये पार्श्वभूमीत वापरून घेतली.  फोटो टिपावा तसा माळी आयुष्याचा आला क्षण ही टिपत होते .. बोलण्यात सतत येणाऱ्या “यु नो!!! ” या शब्दांव्यतिरिक्त..त्यांच्याकडे जगण्याचा कुठ्लांही अभिनिवेश नव्हता. ते आपल्याच विश्वात रमलेले होते. माळी यांना मी नंतर ही एक दोन वेळा भेटलो. ते नेहमी माझ्याशी आस्थेने बोलले.
    काही दिवसांपूर्वी आराम नगरच्याच रस्तावर एका अभिनेत्री ने त्यांना भणंग-निष्कांचन अवस्थेत पाहिले.ते भ्रमिष्ट झाले  होते म्हणे  . अभिनेत्रीने सलमान ला फोन लावला. सलमान ने माळीनसाठी गाडी पाठवली .  सलमान ने त्यांना ‘काय झालं?’ असं विचारलं असेल ..ते म्हणाले असतील ‘कुठे काय..इट्स लाईफ यु नो  ??’
काल अखेर क्यामेर्यात रोल भरून फोटो काढणारा हा अवलिया कलाकार गेला.
रोल संपला .. पण उमटलेल्या ज्या काही प्रतिमा आहेत त्या अस्सल आहेत… यु नो !!

About The Author

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment