Dr Babasaheb Ambedkar and Dilip Kumar: पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे खास व निकटवर्तीय असलेले Bollywood अभिनेते दिलीप कुमार हे Dr Ambedkar यांना मात्र प्रभावित करू शकले नाहीत. सिनेसृष्टीतील अनैतिकतेच्या मुद्यावरून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलीप कुमार यांची हजेरीच घेतली..
कशी झाली भेट Dr Babasaheb Ambedkar व Dilip Kumar यांची
50 च्या दशकाचा सुरूवातीचा काळ होता. स्थळ औरंगाबाद येथील रेल्वे हॉटेल. हे रेल्वे हॉटेल म्हणजे आत्ताचे अशोका हॉटेल. याच हॉटेलमधे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या पत्नीसह उतरले होते. डॉक्टर आंबेडकरंची यांची संस्था या काळात औरंगाबादमधे मिलिंद कॉलेज चे बांधकाम करत होती व याच मिलिंद कॉलेजसाठी डॉक्टर आंबेडकर फंड गोळा करण्याच्या कामासाठी औरंगाबाद येथे आले होते . डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मेहुणे बाळू कबीर हे ही आंबेडकरांसोबत यावेळी होते. एकदा शहरातून हॉटेलवर परतताना कबीर यांना हॉटेल समोर लोकांची गर्दी उभी दिसली.
चौकशी केल्यावर त्यांना असे समजले की अशोक हॉटेलवर प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेते दिलीप कुमार हेही उतरले आहेत. या काळात दिलीप कुमार हे भारतातील सर्वात प्रसिद्ध असे नट होते. त्यांचे अनेक चित्रपट गाजत होते. आपल्या आवडत्या अभिनेत्याला पहायला औरंगाबादच्या लोकांनी हॉटेल समोर गर्दी केली होती. बाळू कबीर यांनीही दिलीप कुमार यांची भेट घेतली. त्यांनी दिलीप कुमार यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच हॉटेलमध्ये वरच्या मजल्यावर उतरले आहेत व आपण त्यांची भेट घ्यावी असे सुचवले. दिलीप कुमार ही या भेटीस उत्सुक होते. बाळू कबीर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची परवानगी घेऊन दिलीप कुमार यांना भेटण्यासाठी घेऊन आले.
खर्या महानायकाची व पडद्यावरच्या महानायकाची भेट

Dr Babasaheb Ambedkar and Dilip Kumar :पद दलित समाजाचा खरा महानायक व पडद्यावरच्या महानायकाची ही भेट होती. हॉल मधले लोक उत्सुकतेने पाहत होते. या दोघांमध्ये काय संभाषण होते याकडे सगळ्यांचे लक्ष होते.
दिलीप कुमार आपल्या परिचित अदबशील शैली ने डॉक्टर आंबेडकर यांच्या समोर येवून बसले व त्यांच्याशी संवाद करू लागले. काही वेळाच्या संभाषणानंतर दिलीप कुमार यांना डॉक्टर आंबेडकर हे मिलिंद कॉलेजच्या कामानिमित्त औरंगाबादेस आले आहेत हे लक्षात आले. हाच धागा पकडून त्यांनी आंबेडकरांना विनंती केली की मी आपल्या मिलिंद कॉलेज साठी काही डोनेशन देऊ इच्छितो. दिलीप कुमार यांच्या मागणीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मात्र अनपेक्षित पणे धुडकावून लावले
संवादात उडालेली ठिणगी
डॉक्टर आंबेडकर यांनी आपल्या प्रखर स्वभावास अनुसरून स्पष्टपणे दिलीप कुमार यांना सांगितले की मी सिनेमासृष्टीतल्या व्यक्तीकडून मिलिंद कॉलेज साठी कुठलेही डोनेशन घेणार नाही. डॉक्टर आंबेडकर यांच्या नकाराने दिलीप कुमार अचंबित झाले. डॉक्टर आंबेडकर पुढे म्हणाले की “तुमच्या सिनेमासृष्टीतले लोक हे अनैतिक जीवन जगतात. अशा लोकांचा पैसा कॉलेजसाठी घेऊन मी विद्यार्थ्यांपुढे चुकीचे आदर्श ठेवू इच्छित नाही!”
हॉलमध्ये आता तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. दिलीप कुमार यांनी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करत “ सिने सृष्टी बद्दल आपले पूर्वग्रह आहेत!” असे म्हटले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मात्र आपल्या म्हणन्यावर ठाम होते. आपण कशाच्या आधारावर हे विधान करत आहोत हे स्पष्ट करण्यासाठी डॉक्टर आंबेडकरांनी दिलीप कुमार यांच्यापुढे चित्रपट सृष्टीतील लोकांची तपशीलवार नावे घेत त्यांच्या अनैतिकतेचा पाढाच वाचला.
दिलीप कुमार आता प्रत्यक्ष बॅरिस्टर आंबेडकरांपुढे काय प्रतिपक्ष मांडतात याकडे सर्वांचे लक्ष होते.
दिलीप कुमार आपली अदबशीलता कायम ठेवत डॉक्टर आंबेडकरांना म्हणाले “ तुम्ही असे म्हणता तरी सर्वच सिनेमा सृष्टीतले लोक अनैतिक आहेत असे म्हणता येणार नाही!”
यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले “ म्हणजे मी म्हणतो ते बरोबर आहे!”
डॉक्टर आंबेडकरांच्या या वाक्यानंतर दिलीप कुमार निरुत्तर झाले. एक हताश व उद्विग्न भाव घेऊन ते सरळ उठले व बाहेर निघून गेले.
हॉल मधले सर्व लोक हे तणाव नाट्य पाहत होते. डॉक्टर आंबेडकरांचे मेहुणे बाळू कबीर आता पुढे झाले. ते डॉक्टर आंबेडकर यांना म्हणाले “साहेब तुम्ही असे का केले?.. दिलीप कुमार यांच्याकडून आपल्या कॉलेज साठी हजारो रुपये देणगी आपल्याला मिळाली असते!”
यावर डॉक्टर आंबेडकरांनी उत्तर दिले की “ माझी संस्था बंद झाली तरी चालेल पण चरित्रहीन लोकांकडून मला एक रुपया ही नको.. !”
Dr Babasaheb Ambedkar and Dilip Kumar यांच्यातील हा प्रसंग डॉक्टर बाबासाहेब यांच्या आठवणींची संकलन असलेल्या ‘बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहवासात’ या पुस्तकात नमूद आहे.








1 thought on “डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दिलीप कुमार यांची तणावपूर्ण भेट : 1 जबरदस्त किस्सा”