Birth of Jesus या अर्थाने Christmas सण साजरा का होतो?
Birth of Jesus— मतमतांतरांचा चिकित्सक आढावा
केवळ ख्रिस्त धर्मियच नाही तर सारे जग दरवर्षी 25 डिसेंबर रोजी ख्रिसमस मोठ्या उत्साहात साजरा करते.
या मागे सर्व सामान्य पणे असा समज आहे की याच दिवशी येशू ख्रिस्तांचा जन्म झाला.
पण इतिहास, बायबल अभ्यास आणि रोमन कालगणना यांचा अभ्यास केला तर Birth of Jesus बाबत अभ्यासकांमध्ये मतमतांतरे दिसतात.
खरं पाहता येशू ख्रिस्तावरील असीम प्रेमामुळेच लोकांना त्याचा जन्म दीन साजरा करायचा होता. अडचण ही होती की येशू जन्माची निश्चित अशी जन्मतारीखेची नोंद खुद्द बायबल मधे ही नव्हती. पण म्हणून हा प्रभू येशूचा जन्म दिन साजरा करायचा नाही का? असा valid प्रश्न होता …या प्रश्नाला उत्तर कसे मिळाले हे सांगणारा हा लेख ….
इतिहास काय सांगतो याचा अभ्यासपूर्ण आढावा या लेखात थोडक्यात घेतलेला आहे.
येशू ख्रिस्ताचा जन्म – बायबल नेमकं काय सांगतं?
सर्वप्रथम एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी —
बायबलमध्ये येशूच्या जन्माची नेमकी तारीख कुठेही दिलेली नाही.
New Testament मधील दोन महत्वाचे ग्रंथ —
- Gospel of Matthew
- Gospel of Luke
येशूच्या जन्मकथेचा उल्लेख करतात, पण दिवस, महिना किंवा वर्ष यात सांगितलेले आढळत नाही. या बायबल मधील Matthew लिखित उतार्यांत एका राजाचा (Herod) उल्लेख आहे.ज्याच्या काळात प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्म झाला. Luke च्या उतार्यात भौगोलिक स्थान व विशिष्ट ऋतू चा उल्लेख आढळतो.
Gospel of Matthew मधे Matthew ने स्पष्ट पणे लिहिले आहे की —
येशूचा जन्म राजा Herod the Great च्या काळात झाला.

ऐतिहासिक तथ्य हे आहे की Herod राजा चा मृत्यू इ.स.पू. 4 मध्ये झाला.यहूदी इतिहासकार Josephus यांच्या नोंदींनुसार राजा Herod the Great चा मृत्यू इ.स.पू. 4 मध्ये झाला.
म्हणजेच येशूचा जन्म इ.स.पू. 6 ते 4 या दरम्यान झाला असावा,
असा आजच्या घडीला बहुतेक इतिहासकारांचा निष्कर्ष आहे.
मग 25 डिसेंबर ही तारीख कुठून आली?
थोडक्यात उत्तर —
25 डिसेंबर ही Birth of Jesus संदर्भात ऐतिहासिक तथ्य सांगणारी तारीख नाही, तर तो एक धार्मिक–सांस्कृतिक निर्णय म्हणावा लागेल.
हा निर्णय कधी झाला?
- चौथ्या शतकात (इ.स. 330–350 दरम्यान)
- (Britannica च्या ऐतिहासिक अभ्यासानुसार 25 डिसेंबर ही तारीख चौथ्या शतकात निश्चित करण्यात आली.)
- पहिला स्पष्ट उल्लेख: इ.स. 336 – रोम
हा निर्णय कोणी घेतला?
- रोमन ख्रिस्ती चर्च ने हा अधिकृत निर्णय जाहीर केला
- चर्च चे हे पादरी येशूचे थेट शिष्य नव्हते
25 डिसेंबर निवडण्यामागची प्रमुख कारणे
1) रोमन सूर्यपूजेचा प्रभाव
रोममध्ये 25 डिसेंबर हा दिवस Sol Invictus
(अजेय सूर्यदेव) च्या उत्सवाचा होता.
सूर्य कधीही पराभूत होत नाही असे रोमन मानत. मावळल्यानंतर तो पुन्हा उगवतोच. या दैवी व अपराजीत सूर्याच्या अजेयत्वाचा उत्सव Sol Invictus या दिवशी केला जायी.
हा उत्सव हिवाळी अयन-अंता नंतर प्रकाश वाढण्याचा काळ मानला जायचा. थोडक्यात भारतातील मकर संक्रांतीच्या सण जसा आपण सूर्याचे उत्तरायण सुरू झाल्यावर साजरा करतो तसाच हा पारंपारिक रोमन सण होता. हा लोकप्रिय उत्सव रोम मधे खूप उत्साहाने साजरा होत असे.
ख्रिस्ती धर्मप्रचारकांनी विचारपूर्वक घेतलेला निर्णय —
Sol Invictus हा लोकांचा जुना लोकप्रिय सण काढून टाकण्याऐवजी,
त्यालाच नवा आध्यात्मिक अर्थ द्यावा.
सूर्य → Light of the World → अशा प्रकारे रोमन चर्च ने येशू ख्रिस्ताला जगाला प्रकाश देणार्या सूर्याच्या रूपात पाहिले.
2) धार्मिक प्रतीकात्मक अर्थ
“मी जगाचा प्रकाश आहे.”
“अंधारातून प्रकाशाकडे नेणारा दिवस” अशा अर्थाने
= 25 डिसेंबर हा Sol Invictus या सणाचा दिवस Birth of Jesus मानला गेला.
हा अर्थ प्रतीकात्मक आहे, ऐतिहासिक पुरावा नव्हे.
3) गर्भधारणेचा धार्मिक तर्क- गर्भ धारणेचे 9 महिने
दुसरा एक तर्क असा मांडला गेला की
“दैवी पुरुषांचा मृत्यू ज्या दिवशी होतो त्याच दिवशी त्यांचे आत्मबीज गर्भ धारणा प्रक्रीयेत रुजते व पूढील 9 महिन्यांनी त्यांचा जन्म होतो.”
या तर्कातील मृत्यूतारीख ही ऐतिहासिक तथ्य किंवा इतिहासातून ठरवली नसून, प्रतीकात्मक गणनेतून गृहित धरलेली आहे. याला आपण जरी hypothetical calculation म्हटले तरी.. रोमन चर्च च्या दष्टीने
Integral Age theory व
Sacred Symmetry
या धार्मिक विचारांवर आधारीत ही तारीख गणना केलेली आहे.
हा तर्क धर्मशास्त्रीय आहे, ऐतिहासिक नाही.
25 डिसेंबरला Jerusalem च्या ज्यूदिया भागात आज ही अती तीव्र थंडी असते
Luke च्या वर्णनानुसार त्या 25 डिसेंबर च्या रात्री मेंढपाळ शेतात/कुरणात होते व आपल्या मेंढ्यांची राखण करत होते.
पण ज्यूदिया या डोंगराळ भागा मध्ये डिसेंबरमध्ये अती तीव्र अशी थंडी असते.अशा उणे तापमानात मेंढपाळ आपल्या गुरांसह बाहेर पडण्याची शक्यता फारच कमी किंवा अशक्य आहे. हे Luke ने केलेले डिसेंबर चे हे वर्णन साहित्यिक असावे असे म्हणताना इतिहास अभ्यासक म्हणतात “25 December is liturgical, not climatological.”
म्हणून अनेक अभ्यासक मानतात —
येशूचा जन्म वसंत (Spring) किंवा शरद (Autumn) ऋतूत झाला असावा.
रोमन कॅलेंडर ख्रिस्तजन्मापासून सुरू झाले का?
नाही. अजिबात नाही.
प्राचीन रोममध्ये कालगणना —
- AUC (Ab Urbe Condita) – रोम शहर स्थापनेपासून AUC कालगणना सुरू झाली
- किंवा त्या वर्षीच्या रोमन कौंसल्सच्या नावावरून
ख्रिस्तजन्मावर आधारित कालगणना
इ.स. 525 मध्ये
Dionysius Exiguus या ख्रिस्ती भिक्षूने सुरू केली.आज इतिहासकार मानतात की Exiguus च्या या कालगणनेतही 4–6 वर्षांची चूक झालेली आहे.
निष्कर्ष
- येशूचा जन्म 25 डिसेंबरला झाला याचा ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नाही
- 25 डिसेंबर ही केवळ धार्मिक–प्रतीकात्मक तारीख आहे
- येशूचा जन्म बहुधा इ.स.पू. 6–4 दरम्यान झाला असावा
- रोमन कॅलेंडर ख्रिस्तजन्मापासून सुरू झालेले नाही
शेवटचा विचार
25 डिसेंबर ही प्रभू येशू ची जन्म तारीख आहे हा इतिहासाचा दावा नसून, मानवाने आपल्या श्रद्भा भावनेला करून दिलेली वाट आहे.
इतिहास तारीख शोधतो,श्रद्धा आपल्या भावनांची शूभ्र फुले वाहायला पुण्य वेदी शोधत असते. काळ नदीच्या काठावर श्रद्धेने वेदी शोधली आहे… अर्थात 25 डिसेंबर हा दिवस….या वेदीवर येशूसाठी श्रदधाफूल वाहणे अनुचित नाही .
संदर्भ व अभ्यास साहित्य
- Bible – Gospel of Matthew & Luke
- Encyclopaedia Britannica – Christmas History
- History of Roman Calendar – Dionysius Exiguus
हे ही वाचा– येशू ख्रिस्त भारतात आले होते का? Did Christ visit India? || Santa Claus ला पत्र पाठवायचंय? हा घ्या त्याच्या गावचा पत्ता -हो सांता personally उत्तर ही पाठवेल..








खूप छान माहिती मिळाली.
Thanks 🙏 Merry Christmas 🎄🎁