PCMC निगडी – दुर्गा टेकडी वर बिबट्या दिसल्याची नागरीकांकडून वनविभागाला सूचना
दुर्गा टेकडी हे PCMC मधील निगडी उपनगरातील एक अत्यंत लोकप्रिय आणि निसर्गरम्य असे उद्यान आहे.
शहराच्या टोकाला, MIDC परिसराच्या अगदी शेजारी वसलेले हे उद्यान
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने नियोजनबद्ध पद्धतीने झाडे, वृक्षलागवड आणि नैसर्गिक रचना जपून विकसित केले आहे. या टेकडीवरील वनात नियमित व्यायाम व फिरण्यासाठी नागरिक येत असतात. काही नागरीकानी या संरक्षित वन उद्यानात 8 जानेवारी 2026 रोजी बिबट्या दिसल्याची वन अधिकार्यांना सूचना दिली आहे. यानंतर वनखाते सतर्क झाले आहे.
निगडीतील दुर्गा टेकडी : निसर्गसंपन्न व संरक्षित वनक्षेत्र
निगडीतील दुर्गा टेकडी हे केवळ उद्यान नसून, एक प्रकारचे संरक्षित वनक्षेत्र मानले जाते.
येथील कातळाच्या खोल दरीत असलेला तलाव, त्यामध्ये पोहणारी बदके,
झाडांवर मुक्तपणे वावरणारी माकडे, दुर्गा देवीचे शांत आणि प्रसन्न मंदिर
आणि मुलांसाठी उभारलेली खेळण्याची उद्याने — यामुळे हे ठिकाण
निगडीसह आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरले आहे.
दररोज अनेक कुटुंबे, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि निसर्गप्रेमी येथे फिरण्यासाठी,
मन:शांती मिळवण्यासाठी भेट देतात.
PCMC निगडी – दुर्गा टेकडी वर बिबट्या दिसल्याची माहिती-वन अधिकार्यांकडून तातडीने सुरक्षेचे उपाय
8 जानेवारी रोजी दुर्गा टेकडी परिसरात आलेल्या काही नागरिकांनी
या भागात बिबट्या दिसल्याची माहिती वन अधिकाऱ्यांना दिली.
ही माहिती मिळताच वनविभाग तातडीने सक्रिय झाला असून,
परिसरात आवश्यक त्या सर्व सुरक्षा उपाययोजना राबविण्यात येत आहेत.
या पार्श्वभूमीवर, नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने
दुर्गा टेकडी उद्यान तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे.
वनविभागाची कारवाई आणि अधिकृत नोटीस

वनविभागाने दुर्गा टेकडीच्या प्रवेशद्वारावर याबाबतची
अधिकृत नोटीस लावली आहे.
या नोटीसमध्ये भांबुर्डा ,वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे स्पष्ट आवाहन केले आहे.
तसेच वन खात्याकडून दुर्गा टेकडी परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून
सतत व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू करण्यात आले आहे,
जेणेकरून बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवता येईल.
नागरिकांसाठी वनविभागाचे महत्त्वाचे सुरक्षा निर्देश
वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी दुर्गा टेकडी आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांना
खालीलप्रमाणे सूचना केल्या आहेत :
- पहाटे आणि संध्याकाळच्या वेळी लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांनी घराबाहेर पडताना विशेष काळजी घ्यावी.
- अंधाऱ्या, गवताळ किंवा झुडपे असलेल्या भागात जाणे शक्यतो टाळावे.
- संध्याकाळच्या वेळी पाळीव प्राणी घराबाहेर नेऊ नयेत.
- घराच्या आसपास वाढलेले गवत व झुडपे काढून परिसर स्वच्छ ठेवावा.
लोकप्रिय दुर्गा टेकडीवर सध्या जाणे टाळण्याचे आवाहन
निगडीतील दुर्गा टेकडी हे नागरिकांमध्ये अत्यंत लोकप्रिय ठिकाण आहे.
दररोज पहाटे योगा, मॉर्निंग वॉक आणि व्यायामासाठी येथे मोठी गर्दी असते.
संध्याकाळी टेकडीवरील पॉईंटवरून दिसणारा मनोहारी सूर्यास्त पाहण्यासाठी
अनेक जण छोटासा ट्रेक करत येथे येतात.
मात्र, PCMC निगडी – दुर्गा टेकडी वर बिबट्या दिसल्याच्या पार्श्वभूमीवर
निगडी व आसपासच्या परिसरातील नागरिकांनी काही दिवस तरी
या उद्यानाकडे जाणे टाळणे आवश्यक आहे.
वनविभागाने दिलेल्या सतर्कतेच्या सूचनांचे पालन करणे
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत गरजेचे आहे.
हे ही वाचा : कसबा मेट्रो स्थानका वरून पुण्याचे मानाचे ५ गणपती अगदी जवळ आहेत- चालत इतर ही महत्वाच्या गणपतींचे दर्शन घेवू शकाल || Shaniwar Wada : travelogue ||







