Avinash Ghodke

Screenwriter and Lyricist with 20 years of experience in Bollywood and Marathi cinema.His creative writing examines the contradictions of lived experience, while his journalism uncovers humanism beneath headlines.

भूमी स्पर्श मुद्रा कशी करावी – बुद्धांची सहज सोपी Bhumi Sparsha Mudra आणि त्यामागील कथा जाणून घ्या…

How to do Bhumi Sparsh Mudra:भगवान बुद्ध यांनी आकाश तत्वापेक्षा पृथ्वी तत्वाला महत्व दिले होते असे एका पुरातन बौद्ध साहित्यातील कथेत दिसून येते. ही कथा रूपकात्मक असली तरी गौतम बुद्धांची Bhumi Sparsha Mudra सत्य व कल्याणकारी आहे.

भूमी स्पर्श मुद्रा Buddhist Yoga Mudra – पृथ्विचे महत्व सागणारी बुद्ध कथा..

Bhumi Sparsh Mudra of Buddha

कथा-भगवान बुद्ध यांनी भूमि स्पर्श करून मार राक्षसाला दिली होती पृथ्वी ची साक्ष

घनदाट वनात वृक्षा खाली बसलेल्या ध्यानस्थ बुद्धा पुढे मार राक्षस थयथयाट करत होता . ” तू कसला ज्ञानी ..‌? तुझ्यापेक्षा मी मोठा ज्ञानी! ” माराच्या असंख्य पाठिराख्यांनी आता त्याचा जयघोष केला . बुद्ध अविचल व शांत होता. मार चिडला . बुद्धावर ओरडून म्हणाला ” हे हजारो पाठिराखे पुरावा देतील माझ्या श्रेष्ठत्वाचा . पाठिराख्यांनी माराचा पुन्हा जयजयकार केला. बुद्ध अजूनही शांत होता. मारानी आता बुद्धाला थेट प्रश्न केला ..”या घनदाट जंगलात एकटाच झाडाखाली डोळे मिटून बसला आहेस..! कुणी आहे का तुझ्या पाठिशी? जर असशील महाज्ञानी तर कोण देणार तुझ्या तपस्वी पणाची साक्ष ? भगवान बुद्ध यांनी आता शून्यमुद्रेतला आपला उजवा हात उचलला आणि बोटांनी धरणी ला स्पर्श करत ते म्हणाले.
” ही पृथ्वी साक्ष आहे!”

पृथ्वीची साक्ष देताना व तिला स्पर्श करत भगवान बुद्ध यांनी जी मुद्रा केली तीच आहे भूमी स्पर्श मुद्रा Buddhist Yoga Mudra.

मनातलं देवत्व..आणि पृथ्वी ची साक्ष..!

बुद्धानी आकाश व आकाशातल्या देवांपेक्षा पृथ्वीला महत्व दिले. हे त्यांच्या विचारांमधले वेगळेपण व वैशिष्ट्य आहे. वरील कथा रूपकात्मक आहे. मार राक्षस म्हणजे काम, क्रोध,लोभ, मोह,मद, मत्सर या षड्-रिपूंचे प्रतीक आहे. गौतम बुद्धांची भूमिस्पर्श मुद्रा हे मात्र सत्य आहे. ही Bhumi Sparsha Mudra बुद्ध स्वतः ध्यानधारणे मधे करायचे.

सहज सोपी भूमिस्पर्श मुद्रा- How to do Bhumi Sparsha Yoga Mudra

उजव्या हाताचा तळवा गुडघ्यावरून खाली सोडत बोटांनी भूमिला केलेला स्पर्श -असे चित्रण केलेल्या गांधार शैलितील अनेक बुद्ध मूर्ती पहायला मिळतात. यातील गुडघ्यावरून सोडलेला तळवा ही एक सहज क्रिया नसून ती योगिक मुद्रा आहे. अशा चित्रणात बुद्धांची बोटे भूमिला स्पर्श करताना दिसतात. मूर्ती मधे बोटांचा भूमीस्पर्श नसेल तर ती कलाकाराची तपशीलातली चूक असते. अशी मुद्रा धारण करून ध्यान केल्यास विचारांमधील negativity पृथ्वी तत्वात विलीन होते असे योग अभ्यासक मानतात.

वेदिक धर्माचे पृथ्वी ला देवत्व पण गौतम बुद्धांसाठी पृथ्वी ही अंतीम सत्य

वेदिक धर्मात निसर्ग तत्वांना देव मानले गेले होते. पुढे सनातन धर्मात ही हा विचार अंतर्भूत केला गेला. याला अनुसरून विष्णू पुराणातील खालील मंत्रात पृथ्वी ला ही देवत्व दिले गेले. या श्लोकात पृथ्वी ला भगवान विष्णू ची पत्नी मानले गेले आहे. मंत्र पुढीलप्रमाणे आहे.

समुद्रवसने देवि पर्वतस्तनमण्डले।
विष्णुपत्नि नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे॥ 

हा श्लोक सकाळी उठल्यावर पृथ्वीला पायाने स्पर्श करण्यापूर्वी क्षमा मागणारा सनातन धर्मातील एक प्रचलित श्लोक आहे .

गौतम बुद्धांनी मात्र याहीपुढे जावून पृथ्वी हीच अंतीम सत्य आहे असे मान्य केले आहे. गौतम बुद्धांनी पृथ्वी चे कुठल्याही आकाशस्थ देवाशी नाते प्रस्थापित केले नाही व तिला एक स्वतंत्र आणि एकमेव ऊर्जा स्थळ मानले.

आकाश व आकाशातल्या देवांपेक्षा पृथ्वी ला महत्व देवून तिला Endorsing final Authority मानणारे हे फक्त गौतम बुद्धच आहेत.  भूमिस्पर्श मुद्रा ही Buddhist Yoga Mudra भारतीय योग परंपरेला भगवान बुद्ध यांनी दिलेली एक अमूल्य ठेव आहे. या मुद्रेत Yoga आणि आध्यात्मिक विचाराचा संगम आहे.

कशी करावी भूमीस्पर्श मुद्रा

सूखासनात बसून पाठिचा कणा ताठ ठेवावा.

  • डाव्या हाताचा तळवा उघडा ठेवून तो पाहता येईल असा डाव्या मांडीवर ठेवावा.
  • उजव्या हाताचा तळवा उलटा करत गुडघ्यापुढे नेऊन बोटे भूमीला स्पर्श करतील अशा पद्धतीने उजवा हात मांडीवर ठेवावा.
  • डोळे मिटून सुरूवातीला ५ ते १० मिनीट या मुद्रा स्थितीत ध्यान करावे

ध्यान धारणेत गौतम बुद्धांची ही सहज सोपी Bhumi Sparsha Mudra केल्यास मनातली नकारात्मकता पृथ्वी तत्वात विलीन होईल‌ व मनाला शांती लाभेल.

हे ही वाचा : Buddha Paurnima 2025: बुद्धांचा जन्म, तत्वज्ञान आणि भविष्यातील मैत्रेय बुद्ध

About The Author

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment