
New Panvel Karjat train route : पनवेल ते कर्जत दरम्यानच्या उपनगरीय Railway Corridor चे बांधकाम जोरात सुरू आहे. हा Railway connectivity project आता अंतिम टप्प्यात आहे.
पनवेल, खोपोली, कर्जत किंवा नजीकच्या परिसरात रहात असलेल्या नागरिकांना व तसेच मुंबईहून कर्जत या Holliday Destination कडे जाणार्या मुंबई करांसाठी सुद्धा ही सुखद बातमी आहे…
सध्याची स्थिती: ८५ टक्के काम पूर्ण, शेवटचा टप्पा
चांगली बातमी अशी की, हा New Panvel Karjat train route प्रकल्प आता ८५ टक्के पूर्ण झाला आहे . मुंबई रेल्वे विकास महामंडळ (MRVC) या प्रकल्पाला वेगाने पूर्णत्वाकडे नेत आहे. फेब्रुवारी २०२६ च्या अखेरीपर्यंतच्या माहितीनुसार, बहुतांश सिव्हिल कामे पूर्णत्वास गेली आहेत.
या 29.6 किलोमीटर लांबीच्या दुहेरी मार्गिकेवर एकूण 5 स्थानके आहेत:
· पनवेल
· चिखले
· पोयजे-महोपे
· चौक
· कर्जत
या मार्गिकेवरील बोगद्यांचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. विशेष म्हणजे २.६३९ किलोमीटर लांबीचा वावर्ये बोगदा हा मुंबई उपनगरीय रेल्वे विभागातील सर्वात लांब बोगदा ठरणार आहे . याशिवाय नाधळ आणि किरावळी येथेही बोगदे बांधण्यात आले आहेत.
प्रकल्पाची खास वैशिष्ट्ये व आधुनिक सुविधा
महाराष्ट्र सरकार व भारतीय रेल्वे मंत्रालयाने या प्रोजेक्ट मधे ५०:५० अशी भागिदारी केलेली आहे. तसेच AIIB (Asian Infrastructure Investment Bank) या बॅंकेने प्रकल्पाला वित्त सहाय्य दिले आहे.
2,782 करोड रुपये खर्च असलेला हा प्रोजेक्ट एक सामान्य Train route नसून यात अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरले जात आहे. त्यामुळे प्रवाशांना निश्चितच fast and safe प्रवासाचा अनुभव मिळेल.
· पहिला Ballast less Track: या मार्गिकेवरील बोगद्यांमध्ये प्रथमच सबअर्बन विभागात ‘बॅलास्टलेस ट्रॅक’ (स्लॅब ट्रॅक) बसवण्यात येत आहे. पारंपारिक Railway Track हे खडी (Ballast) च्या थरांवर स्थिर केले जातात पण आधुनिक Ballast less Track हे Cement Concrete च्या पायावर बांधले जातात. यामुळे Panvel Karjat Track ची देखभाल कमी करावी लागेल आणि रेल्वे प्रवाशांचा प्रवास यावर अधिक smooth होईल .
· अभिनव जलवाहिनी (Aqueduct): चौक येथे रेल्वे मार्गावरून पाणी नेण्यासाठी एक खास जलवाहिनी बांधण्यात आली आहे. मुंबई उपनगरीय रेल्वेवर ही अशा प्रकारची पहिलीच निर्मिती आहे .
· सुरक्षेला प्राधान्य: वावर्ये बोगद्यात आपत्कालीन परिस्थितीसाठी प्रत्येक ५० मीटर अंतराने सुरक्षित आश्रयस्थान (Refuge Area) करण्यात आले आहेत .
· पूल आणि रस्ते: या मार्गिकेवर ८ मोठे पूल, ३२ लहान पूल, ५ Railway Over bridge आणि १५ Road Under Bridge बांधण्यात आले आहेत. महत्वाचे म्हणजे Mumbai Pune Express Way खालून जाणारा एक महत्त्वाचा Underpass ही या New Panvel Karjat train route मार्गावर तयार करण्यात आला आहे .
या नव्या Train route मुळे होणारे फायदे
ही लोकल सेवा सुरू झाली की प्रवाशांचा कर्जतहून मुंबई कडे जाण्याचा प्रवास सोपा व कमी वेळात होईल.
· वेळेची बचत: सध्या पनवेलवरून कर्जतला जाण्यासाठी रस्ते मार्गाने तब्बल दीड तास लागतो. पण रेल्वे सेवा सुरू झाल्यास हा प्रवास फक्त ४० मिनिटांत पूर्ण होईल .
· गर्दीतून सुटका: सध्या लोकल ट्रेन ने मुंबईहून कर्जतला जाण्यासाठी कल्याण मार्गे जावे लागते. या नवीन पनवेल मार्गामुळे CSMT वरून कर्जतला जाण्याचा वेळ २० ते २५ मिनिटांनी कमी होईल . महत्वाचे म्हणजे कल्याण स्थानकावरील प्रचंड गर्दीवरही नियंत्रण मिळेल.
· नवी मुंबई विमानतळाशी संपर्क: ही मार्गिका नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाशी चांगली कनेक्टिव्हिटी देईल, विशेषतः पुण्याहून येणाऱ्या प्रवाशांसाठी हे अतिशय सोयीचे ठरेल .
काम कधी पूर्ण होणार ?
सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो की, हे स्वप्न प्रत्यक्षात कधी येणार? MUTP अर्थात Mumbai Urban Transport अंतर्गत येणारा हा प्रकल्प Mumbai Railway Vikas Corporation(MRVC) विकसित करत आहे MRVC चे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या प्रकल्पाचे ८५ टक्के काम पूर्ण झाले असून, जून किंवा जुलै २०२६ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता आहे . या वर्षाच्या अखेरीपर्यंत प्रवाशांना या मार्गिकेवर लोकलचा प्रवास करता येईल, अशी आशा आहे .
थोडक्यात, पनवेल-कर्जत उपनगरीय रेल्वे मार्ग (New Panvel Karjat train route) हा केवळ एक रेल्वे प्रकल्प नसून तो कोकण आणि नवी मुंबईला जोडणारा एक नवा दुवा ठरणार आहे. यामुळे केवळ प्रवास सुखकर होणार नाही, तर कर्जत परिसराच्या विकासालाही चालना मिळेल.
तुम्हाला ही माहिती कशी वाटली? तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. आमच्या News and Trends विभागात इतर बातम्या ही वाचा…
हे ही वाचा :▶️ Dhurandhar – हीरो असलेल्या Ranveer Singh पेक्षा Akshay Khanna चा खलनायक का गाजतो आहे? नेमकी चूक काय झाली – सिने लेखकाचा दृष्टिकोण ▶️सरकार कडून 27 Crypto Currency एक्सचेंज ची गैरव्यवहार तपासणी – जगात मात्र Crypto ची 16 अब्ज रुपयांवर जबरदस्त धडक ,▶️Metro 2B line Kurla Update: एका रात्रीत बसवले कुर्ला हलाव पुलावर अजस्र U-Girder, आव्हान फत्ते!







