
भारताच्या चित्रपट व्यावसायाने 2026 च्या पहिल्या सहामाहीत ₹6,398 कोटींचा व्यवसाय केला. त्यात मराठी सिनेमाचा वाटा 4% म्हणजे त्या वाट्याचे मूल्य साधारणतः ₹256 कोटी इतके ठरते. हा मराठी सिनेमाचा post-pandemic काळातील सर्वोच्च वाटा आहे. या यशात‘राजा शिवाजी’ आणि ‘देऊळ बंद 2’ यांसारख्या चित्रपटांची महत्वपूर्ण भूमिका आहे.
Marathi film Box Office collection 2026: मराठी सिनेमाची ही latest Box Office झेप पाहता 2016 च्या milestone ठरलेल्या ‘सैराट’सिनेमाचा उल्लेख अपरिहार्य ठरतो. 2016 मध्ये नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ने मराठी चित्रपटसृष्टीच्या बॉक्स ऑफिसचा एक नवा अध्याय लिहिला. 100 कोटींचा टप्पा ओलांडणारा तो पहिला मराठी चित्रपट ठरला होता. देशभर प्रदर्शित होणार्या हिंदी चित्रपटांची सुद्धा त्या वेळी 100 crore Club मधे entry करताना दमछाक व्हायची अशा वेळी सैराट सारख्या प्रादेशिक सिनेमाने 100 कोटीं चा टप्पा गाठला होता.
दशकभरानंतर आता ‘राजा शिवाजी’ने ₹100 कोटींच्या पुढे मजल मारत ‘सैराट’चा विक्रमही मागे टाकला आहे. मे, 2026 मध्ये ‘राजा शिवाजी’ या छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील ऐतिहासिक चित्रपटाची जागतिक कमाई ₹114.80 कोटींवर पोहोचली होती आणि राजा शिवाजी चित्रपट सैराटचा ₹110 कोटी lifetime worldwide gross मागे टाकून सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट ठरल्याचे नमूद आहे.ऑगस्ट 2026 मध्ये तीच Worldwide gross कमाई 117.97 कोटी एवढी झाली आहे.
Marathi film box office collection 2026 ची मोठी झेप
2026 च्या पहिल्या सहामाहीत धुरंधर सारख्या blockbuster हिंदी फिल्म बरोबरच एकूणच भारतीय सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ₹6,398 कोटींचा टप्पा गाठला. Ormax Media च्या अहवालानुसार ‘post-pandemic’ (Covid नंतर)काळातील कुठल्याही वर्षाच्या पहिल्या सहामाहीतील ही सर्वाधिक देशांतर्गत box office कमाई आहे.
मागील वर्षीच्या (2025) पहिल्या सहामाहीच्या तुलनेत ही कमाई 10% अधिक आहे आणि महत्त्वाचं म्हणजे या यशात मराठी सिनेमाचा लक्षणीय वाटा आहे. संपूर्ण भारतीय बॉक्स ऑफिस कमाईत Marathi cinema चा share 4% झाला आहे. त्यामुळे 4% पर्यंत झालेली ही वाढ छोटी म्हणता येणार नाही.काही सिनेमांचे अपवाद वगळता मराठी प्रेक्षक सिनेमा थिएटर कडे वळण्यास फारसा उत्सुक नसतो असा एक समज होता.या समजाला ‘राजा शिवाजी’ व ‘देऊळ बंद-2’ च्या यशाने नक्कीच धक्का दिला आहे.
या 4% वाट्यात कोणत्या चित्रपटांचे योगदान?
मराठी चित्रपटसृष्टीच्या 2026 मधील box office business कडे पाहिले तर दोन चित्रपट ठळकपणे समोर येतात –
- राजा शिवाजी
- देऊळ बंद 2
Ormax च्या मे 2026 च्या अहवालानुसार, पहिल्या सहामाहीत या दोन चित्रपटांनी मिळून 2026 मधील एकूण मराठी सिनेमाच्या box office कमाईपैकी 77% हिस्सा मिळवला होता. म्हणजेच मराठी सिनेमाची 4% राष्ट्रीय हिस्सेदारी केवळ या दोन चित्रपटांमुळे निर्माण झाली, असे म्हणता येणार नाही. इतर मराठी चित्रपटांचाही उर्वरित 23% वाटा आहे. मात्र ‘राजा शिवाजी’ व ‘देऊळ बंद -2‘ चित्रपटांनी मराठी box office ला दिलेली मोठी चालना 77%च्या आकड्यावरून स्पष्ट होते.
‘राजा शिवाजी’ आणि ‘देऊळ बंद 2’ची कमाई
| चित्रपट | India Net | India Gross | Worldwide Gross |
|---|---|---|---|
| राजा शिवाजी (2026) | ₹96.39 कोटी | ₹113.70 कोटी | ₹117.97 कोटी |
| देऊळ बंद 2 (2026) | ₹74.35 कोटी | ₹87.11 कोटी | ₹87.11* कोटी |
टीप: ‘देऊळ बंद 2’ साठी उपलब्ध tracking नुसार ‘Overseas collection शून्य’ असल्याने India Gross आणि Worldwide Gross चे आकडे टेबल मधे समान आहेत.
राजा शिवाजी’ आणि ‘देऊळ बंद 2’चे हे आकडे Sacnilk च्या उपलब्ध tracking वर आधारित आहेत. Ormax च्या 4% language share साठी मात्र Gross Box Office हे एकसमान मोजमाप वापरले आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणची आकडेवारी थेट एकमेकांशी तुलना करता येत नाही
‘राजा शिवाजी’च्या कमाईत त्याच्या हिंदी आवृत्तीचाही वाटा आहे. Ormax च्या व Sacnilk च्या अहवालानुसार, चित्रपटाच्या gross box office पैकी सुमारे 27% हिस्सा हिंदी आवृत्तीचा होता. त्यामुळे या चित्रपटाचे यश मराठी सिनेमाच्या भाषिक बाजारपेठे पलीकडे जाण्याचेही उदाहरण ठरते.
फक्त दोन चित्रपटांचे वैयक्तिक यश की मराठी सिनेमाची व्यापक वाढ?
हा प्रश्न महत्त्वाचा आहे. एकीकडे 2026 मधील मराठी box office ला ‘राजा शिवाजी’ आणि ‘देऊळ बंद 2’ यांनी मोठी चालना दिली आहे. दुसरीकडे, Ormax च्या मे 2026 च्या अहवालानुसार, मराठी सिनेमाने 2026 मध्ये आतापर्यंत ₹220 कोटींपेक्षा जास्त gross box office कमावला होता. ही कमाई संपूर्ण 2025 मध्ये मराठी सिनेमाने मिळवलेल्या ₹96 कोटींपेक्षा दुपटीहून अधिक आहे.
2026 हे मराठी सिनेमासाठी सर्वकालीन सर्वोत्तम वर्ष ठरण्याच्या मार्गावर असल्याचे Ormax ने म्हटले होते. सध्या हा विक्रम 2022 मधील ₹268 कोटींचा आहे. त्याच अहवालानुसार, ‘राजा शिवाजी’ आणि ‘देऊळ बंद 2’ या दोन चित्रपटांनी मिळून 2026 मधील मराठी box office पैकी 77% हिस्सा दिला होता. म्हणजेच या दोन चित्रपटांचे योगदान मोठे असले, तरी Marathi film Box Office collection 2026 ची कामगिरी केवळ या दोन चित्रपटांपुरती मर्यादित म्हणता येणार नाही. उरलेले 23% योगदान इतर मराठी फिल्म्स चे आहे हे विसरून चालणार नाही.
भारतीय बॉक्स ऑफिसच्या 5% वाढीत हिंदी बरोबर मराठी सिनेमाची भूमिका
इथे आणखी एक महत्त्वाची आकडेवारी समोर येते. 2026 च्या पहिल्या सहामाहीत भारतीय सिनेमागृहांमधील footfalls( प्रेक्षक थिएटरमध्ये येण्याचे प्रमाण)5% वाढले आहेत.
- 2025 च्या पहिल्या सहामाहीतील 36.2 कोटी
- 2026 मध्ये ही संख्या 37.8 कोटी
Ormax च्या मते या वाढीला मुख्यतः Hindi आणि Marathi या दोन्ही चित्रपटांचे योगदान आहे. मात्र त्या 5% वाढीत नेमके किती टक्के प्रेक्षक मराठी चित्रपटांमुळे होते हे सांगता येत नाही. त्यासाठी स्वतंत्र आकडा उपलब्ध नाही.मात्र एवढे निश्चित म्हणता येते की राष्ट्रीय स्तरावर theatrical footfall वाढवणाऱ्या प्रमुख भाषिक उद्योगांमध्ये मराठी सिनेमाचाही समावेश आहे.
मराठी film business देशपातळीवर आपले खाते उघडत आहे का?
मराठी सिनेमाचा भारतीय box office मध्ये 4% share हा निश्चितच लक्षवेधी आहे.मात्र या आकड्याचे महत्त्व केवळ “4% Share” इतकेच नाही. गेल्या काही वर्षांत 1-2%च्या आसपास असलेला share 4% पर्यंत पोहोचला आहे. त्याच वेळी मराठी चित्रपटांनी आधीच्या म्हणजे 2025 च्या संपूर्ण वर्षापेक्षा 2026 मध्ये काही महिन्यांतच दुपटीहून अधिक gross business केला आहे. त्यामुळे प्रश्न आता केवळ “मराठी चित्रपट किती कोटी कमावतात?” एवढाच राहिलेला नाही.आता मराठी चित्रपटाचा ‘आवाका’ वाढत आहे. नुसती प्रादेशिक कमाई नाही तर देशव्यापी ओळखीमुळे Market अधिक विस्तृत होत आहे असे म्हणता येईल.मराठी सिनेमा राष्ट्रीय बॉक्स ऑफिस आकडेवारी मधे आपले योगदान देत आहे.आता प्रश्न एवढाच आहे .मराठी सिनेमाचा हा 4% share एक तात्पुरता spike आहे की नव्या राष्ट्रीय प्रवासाची सुरुवात?
2016 मध्ये ‘सैराट’ने सुमारे ₹110 कोटींची worldwide gross कमाई करत इतिहास रचला. ₹100 कोटींचा टप्पा ओलांडणारा तो पहिला मराठी चित्रपट ठरला. जवळपास दशकभरानंतर ‘राजा शिवाजी’ने पुन्हा(world wide)₹117.97 कोटींच्या पुढे मजल मारत Marathi films box office collection 2026 ची ही नवी उंची गाठली.
सैराट | राजा शिवाजी | देऊळ बंद 2 –
एक तुलनात्मक आढावा
| चित्रपट | India Net | India Gross | Worldwide Gross |
|---|---|---|---|
| सैराट (2016) | ₹80.98 कोटी | उपलब्ध आकडा स्पष्ट नाही | ₹110 कोटी |
| राजा शिवाजी (2026) | ₹96.39 कोटी | ₹113.70 कोटी | ₹117.97 कोटी |
| देऊळ बंद 2 (2026) | ₹74.33 कोटी | ₹87.09 कोटी | ₹87.09 कोटी |
टीप: वरील आकडे उपलब्ध box-office tracking वर आधारित आहेत. ‘राजा शिवाजी’मध्ये मराठी आणि हिंदी अशा दोन्ही आवृत्त्यांचा समावेश आहे. Box-office estimates स्रोतांनुसार थोडेफार बदलू शकतात.
देशपातळीवर Box Office मधे 4% वाटा! आता पुढील आव्हान काय?
९० च्या दशकात प्रसिद्ध हिंदी चित्रपट दिग्दर्शक अशोक गायकवाड यांनी जॅकी श्रॉफ अभीनित हिंदी चित्रपट ‘दूध का कर्ज’ मराठी मधे डब करून प्रदर्शित केला होता.पण हा चित्रपट मराठीत यशस्वी झाला नव्हता. आता रितेश देशमुख याचा राजा शिवाजी हा मराठी चित्रपट हिंदीत डब होवून प्रदर्शित झाला आहे व तो बर्यापैकी चालला आहे अशी आकडेवारी सांगते. असे प्रयोग पुढे ही निर्मात्यांनी करायला हवेत. तामिळ व मल्याळम सिनेमाचे देशव्यापी असे एक niche market आहे तसे मराठी सिनेमानेही निर्माण करायला हवे. चांगले content व चांगली production value ठेवल्यास हे शक्य आहे.
मराठी सिनेमासाठीही पुढील आव्हान तेच आहे . फक्त काही मोठे चित्रपट प्रेक्षकांना थिएटरमध्ये आणतात हे चांगलेच आहे पण संपूर्ण Marathi film slate मजबूत करणे तितकेच गरजेचे आहे.जर ते साध्य झाले, तर आजचा 4% share हा मराठी सिनेमाच्या राष्ट्रीय बॉक्स ऑफिस प्रवासाची मर्यादा नसून सुरुवात ठरू शकते.
संदर्भ सूची:
- Ormax Media — The India Box Office Report: Jan–Jun 2026
- Ormax Media — The India Box Office Report: May 2026
- Sacnilk — Raja Shivaji (2026) Box Office
- Sacnilk — Deool Band 2 (2026) Box Office
FAQ
2026 मध्ये पहल्या सहामाहीत मराठी सिनेमाचा भारतीय बॉक्स ऑफिसमधील वाटा किती आहे?
2026 च्या पहिल्या सहामाहीत मराठी सिनेमाचा वाटा 4% राहिला आहे.
एकूण ₹6,398 कोटी या भारतीय बॉक्स ऑफिस कलेक्शन मधे मराठी सिनेमाचा वाटा किती होतो?
परसेंटेज अनुसार तो सुमारे ₹256 कोटी होतो.
‘राजा शिवाजी’ या मराठी चित्रपटाची बॉक्स ऑफिस कमाई किती आहे?उपलब्ध trackingनुसार त्याची India Net कमाई सुमारे ₹96.39 कोटी आहे.
उपलब्ध tracking नुसार त्याची India Net कमाई सुमारे ₹96.39 कोटी आहे.
‘देऊळ बंद-2’ची बॉक्स ऑफिस कमाई किती आहे?उपलब्ध trackingनुसार त्याची India Net कमाई सुमारे ₹74.35 कोटी आहे.
उपलब्ध tracking च्या अनुसार देऊळ बंद-2 ची India Net कमाई सुमारे ₹74.35 कोटी आहे.
‘सैराट’चे मराठी सिनेमाच्या बॉक्स ऑफिस इतिहासात काय महत्त्व आहे?
‘सैराट’ हा ₹100 कोटींचा टप्पा ओलांडणारा पहिला मराठी चित्रपट ठरला आणि त्याने मराठी सिनेमाच्या व्यावसायिक क्षमतेचा नवा मापदंड निर्माण केला.
हे ही वाचा:
➡️या नटाची स्तुती ऐकून Charlie Chaplin उदास झाले – म्हणाले ‘मी त्याला काम दिलं होतं!’
➡️शोले original 70 MM नव्हता ?आता Odyssey चा IMAX अनुभव ही खोटाच? – वाचा Cine Technique चा झोल

