मौसमक्रिकेटऑपरेशन सिंदूरक्रिकेटस्पोर्ट्सबॉलीवुडजॉब - एजुकेशनबिजनेसलाइफस्टाइलदेशविदेशराशिफललाइफ - साइंसआध्यात्मिकअन्य

Avinash Ghodke

Screenwriter and Lyricist with 20 years of experience in Bollywood and Marathi cinema.His creative writing examines the contradictions of lived experience, while his journalism uncovers humanism beneath headlines.

ट्रंप यांचे TARIFF WAR

ट्रंप यांनी सुरू केलेले ग्लोबल ट्रेड वॉर हे त्यांच्या tax धोरणामुळे आता Tariff War म्हणवले जावू लागले आहे. अमेरिकेच्या हितासाठी आयात मालावर अधिकतम कर लावून देशी उद्योगांना बळकटी देण्याची त्यांची नीती आहे. याच वेळी अमेरिकेतील नोकरदार NRI ना कामावरून कमी करून भारतात पाठविण्याचा कार्यक्रम NO HIRE तत्वावर ट्रंप यांनी हाती घेतला आहे.

अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केलेले TARIFF WAR

अमेरिकी उपराष्ट्रपती जे डी व्हान्स आपल्या भारतीय वंशीय पत्नीसोबत भारतभेटीवर

नुकतेच अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष J D व्हान्स भारत भेटीवर आले आहेत. व्हान्स यांना युक्रेनिन अध्यक्ष झेलेन्सकी यांच्याशी शाब्दिक युद्ध करताना Oval office Meeting मधे‌ जगाने पाहिले आहे. त्यांच्या या attack dog role नंतर आपल्या लेकरा बाळांबरोबरची भारत भेट उग्र प्रतिमेवर थंड शिडकावा मारावा अशी आहे. J D व्हान्स यांच्या पत्नी ऊषा व्हान्स भारतीय वंशाच्या (आंध्र प्रदेश) आहेत. यामुळे ही व्हान्स कुटुंबाची भारत भेट भारत-अमेरिका संबंधाबाबत दिलासा दायक चित्र निर्माण करते.

ट्रंप यांनी जो ९० दिवसांचा वाढीव आयात शुल्काला दिलेला pause आहे त्या काळात भारत अमेरिके मधे वाटाघाटी होण्याची अपेक्षा आहे.फेब्रुवारी मधे झालेल्या ट्रंप व मोदी चर्चे नंतर भारताने त्वरित अमेरिकेकडून Crude oil, Liquified Natural gas, High tech weapons अशा मालांची मोठ्या प्रमाणात खरेदी करण्याचे करार केले.भारताने पुढे जावून अमेरिकन मोटरसायकल हर्ले डेव्हिडसन व केंटुकी बर्बन यांसारख्या महागड्या उत्पादनांवरचे आयात कर कमी करून टाकले.

Tariff King चा मुकुट भारताकडून अमेरिकेकडे

आयात मालावर भरमसाट कर लावण्याच्या धोरणामुळे भारताची Tariff King ही प्रचलित इमेज आता बदलण्यास अमेरिकेने भारतास भाग पाडले आहे व Tariff King चा मुकुट स्वतः च्या मस्तकावर अमेरिका अर्थात ट्रंप मिरवत आहेत.

भारताचे पंतप्रधान मोदी हे आशियाचे एक प्रमुख व प्रभावशाली नेते आहेत. जगाच्या नकाशावर ही Global South विभागाचे ते नेते म्हणून मान्यता पावले आहेत. अशा परिस्थितीत भारताशी वाटाघाटी करून Tariff War वर तोडगा काढणे अमेरिकेसाठी गरजेचे आहे. भारता सारखी अती प्रचंड बाजारपेठ गमावणे अमेरिकेला परवडण्या सारखे नाही. ही कसरत म्हणजे चीन विरुद्ध सक्षम होण्यासाठी केलेले Bulwark आहे व‌ अमेरिका ते करत आहे.

इलाॅन मस्क यांची मध्यस्ती

व्हाईट हाऊस चे सल्लागार एलाॅन मस्क ही लवकरच भारत भेटीवर येणार आहेत. त्यांनाही त्यांची प्रसिद्ध TESLA कार भारतीय बाजारपेठेत उतरवायची आहे.एलाॅन मस्क यांच्या मातोश्री माये मस्क यांनीही आपल्या आपल्या आत्मचरित्राचा हिंदी अनूवाद प्रकाशित करण्याच्या निमित्ताने मुंबई गाठली व थेट प्रभादेवी च्या सिद्धिविनायकापुढे मस्तक टेकले.

Conclusion

आर्थिक नीतीच्या पातळीवर कितीही मतभेद असले तरी भारताचा अध्यात्मिक बंध हा वैश्विक आहे व तो त्याचे बलस्थान ही आहे. वाटाघाटी होत रहातील. मोठ्या हितासाठी एक पाऊल मागे घेवून निर्णय घ्यावे लागतील. भारत देशाला चाणाक्यांच्या राज नीती चा वारसा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ही पुरंदर चा तह केला होता पण ते हरले नव्हते तर तो एक विराम होता.

About The Author

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment